श्रम आणि रोजगार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंग  शेखावत यांनी जोधपूर येथे आयोजित जी-20 समूहाच्या रोजगारविषयक कृती गटाच्या पहिल्या बैठकीला केले मार्गदर्शन


उत्तम काम आणि सर्वसमावेशक विकास यांसाठी अधिक संधींची निर्मिती करताना, अर्थपूर्ण प्रगती करण्याचे केंद्रीय मंत्री शेखावत यांनी केले आवाहन

Posted On: 03 FEB 2023 3:01PM by PIB Mumbai

 

जोधपूर येथे आयोजित बैठकीसाठी आलेल्या जी-20 समूहाच्या रोजगारविषयक कृती गटातील सर्व प्रतिनिधींचे मनःपूर्वक स्वागत करून केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनी आज या कृती गटाच्या कार्यासाठी सर्व प्रतिनिधींनी दिलेल्या योगदानाची प्रशंसा केली. उत्तम काम तसेच सर्वांसाठी समावेशक विकास यांसाठी अधिक संधींची निर्मिती करण्यात अर्थपूर्ण प्रगती करण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाच्या सदस्यांना केले.

केंद्रीय मंत्री शेखावत म्हणाले की जी-20 समूहाच्या रोजगारविषयक कृती गटाच्या पहिल्या बैठकीसाठी भव्य आणि ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या जोधपूर शहरात आलेल्या प्रत्येक प्रतिनिधीचे मी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील मंत्री म्हणून आणि जोधपूरचे खासदार म्हणून, मनःपूर्वक स्वागत करतो. ही बैठक जोधपूरमध्ये आयोजित केल्याबद्दल शेखावत यांनी केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव तसेच आयोजक समितीतील इतर सदस्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

आपले देश आणि आपली जनता यांची समृद्धी आणि स्वास्थ्यासाठी महत्वाच्या असलेल्या अत्यावश्यक रोजगारविषयकसमस्या सोडविण्यासाठीच्या महत्त्वाच्या कार्यक्रमाकरिता यजमान देश म्हणून, भारताला जी-20 समूहाचे नेतृत्व करण्याची संधी मिळणे हा देशाचा सन्मान आहे असे शेखावत यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री शेखावत म्हणाले की, वसुधैव कुटुंबकम किंवा एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य ही भारताच्या जी-20 समूहाच्या अध्यक्षीय वर्षाची संकल्पना आहे आणि आपण जेव्हा आपल्या अर्थव्यवस्था तसेच आपले लोक यांच्यातील परस्पर संबंधांची चर्चा करतो तेव्हा ही संकल्पना विशेष  समर्पक ठरते.ही संकल्पना म्हणजे आपल्या सामायिक मानवतेसाठी आणि सर्वांसाठी अधिक चांगले भविष्य निर्माण करण्याच्या उद्देशाने एकत्र येऊन काम करण्याचे महत्त्व यासाठी एक सामर्थ्यशाली स्मरणपत्र म्हणून कार्य करते असे त्यांनी सांगितले.आपल्यासमोर सध्या असलेल्या श्रम आणि रोजगारविषयक आव्हानांवर केल्या जाणाऱ्या उपाययोजना सर्वसमावेशक, शाश्वत आणि सर्वांसाठी न्याय्य असल्या पाहिजेत हा मुद्दा देखील या संकल्पनेद्वारे अधोरेखित होतो असे ते पुढे म्हणाले.

उद्घाटनपर सत्रानंतर, केंद्रीय मंत्री शेखावत यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना रोजगारविषयक पहिल्या कृतीगटाविषयी थोडक्यात माहिती दिली.

***

S.Bedekar/S.Chitnis/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1895998) Visitor Counter : 274