ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

बंगळुरू येथे 5 ते 7 फेब्रुवारी 2023 या कालावधीत होणाऱ्या पहिल्या ऊर्जा संक्रमण कृती गटाच्या (इटीडब्ल्युजी) बैठकीबद्दल केंद्रीय ऊर्जा, नवीन आणि अपारंपरिक ऊर्जा मंत्री आर के सिंह यांनी प्रसारमाध्यमांना दिली माहिती

Posted On: 02 FEB 2023 10:31PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 2 फेब्रुवारी 2023

 

बंगळुरू येथे 5  ते 7 फेब्रुवारी 2023 या कालावधीत होणाऱ्या पहिल्या ऊर्जा संक्रमण कृती गटाच्या (इटीडब्ल्युजी) बैठकीबद्दल केंद्रीय ऊर्जा, नवीन आणि अपारंपरिक ऊर्जा मंत्री आर के सिंह यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली.

आंतरराष्ट्रीय सहकार्याचा प्रमुख मंच असलेल्या प्रतिष्ठेच्या  जी 20 शिखर परिषदेचे भारत या वर्षी यजमानपद भूषवत आहे. जी 20 सदस्य देश जागतिक सकल देशांतर्गत उत्पादना (जीडीपी) च्या सुमारे 85%, जागतिक व्यापाराच्या 75% पेक्षा जास्त आणि जगाच्या लोकसंख्येच्या सुमारे दोन तृतीयांश लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करतात. ते देश सर्व प्रमुख आंतरराष्ट्रीय आर्थिक मुद्द्यांवर जागतिक रचनात्मक चौकट आणि प्रशासनाला आकार देण्यात तसेच त्याला मजबूत करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत असे सिंह यांनी यावेळी सांगितले.

एनर्जी ट्रांझिशन वर्किंग ग्रुप इटीडब्ल्युजी च्या प्राधान्य क्षेत्रांमध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे: (i) तंत्रज्ञानातील त्रुटी दूर करण्यासाठी ऊर्जा संक्रमण (ii) ऊर्जा संक्रमणासाठी कमी दराने वित्तपुरवठा (iii) ऊर्जा सुरक्षा आणि विविध पुरवठा साखळी (iv) ऊर्जा कार्यक्षमता, औद्योगिक कमी कार्बन संक्रमणे आणि जबाबदारीने वापर, (v) भविष्यासाठी इंधन (3F) आणि (vi) स्वच्छ ऊर्जेसाठी सार्वत्रिक प्रवेश आणि न्याय्य, परवडणारे, समावेशी ऊर्जा संक्रमण मार्ग. 

ऊर्जा संक्रमण साध्य करण्यावर हा गट भर देणार असून तो समुदायांच्या गरजांशी तडजोड न करता वेळेवर आणि परवडणाऱ्या किमतीत इतर देशांमध्‍ये ऊर्जा पोहोचवण्‍यासाठी तंत्रज्ञानातील तफावत दूर करणे आणि वित्तपुरवठा करणे याकडेही लक्ष देईल, असे त्यांनी सांगितले.

‘कार्बन कॅप्चर, युटिलायझेशन अँड स्टोरेज (सीसीयुएस)’ या विषयावरील उच्चस्तरीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन या पहिल्या बैठकीत करण्यात आले आहे. नेट-झिरो लक्ष्य साध्य करण्यासाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणार्‍या कार्बन कॅप्चर, वापर आणि स्टोरेजचे महत्त्व अधोरेखित करण्यावर चर्चासत्र लक्ष केंद्रित करेल.

या बैठकीची विषयपत्रिका ठरविण्यासाठी आणि कृती क्षेत्रे निश्चित करण्यासाठी कार्यगटाच्या 4 बैठका आयोजित करेल. खालीलप्रमाणे बैठका होतील:

  • पहिली बैठक – बेंगळुरू, 5-7 फेब्रुवारी, 2023
  • दुसरी बैठक – गांधीनगर, एप्रिल 2-4, 2023
  • तिसरी बैठक – मुंबई, 15-17 मे 2023
  • चौथी बैठक – गोवा, जुलै 19-20 जुलै 2023
  • ईटीएमएम बैठक- गोवा, 22 जुलै 2023

भारत या बैठकांचा यजमान देश असून 19 देश, युरोपियन युनियन आणि 9 अतिथी देशांमधील 150 हून अधिक प्रतिनिधींचे आदरातिथ्य करणार आहे. याव्यतिरिक्त, आघाडीच्या आंतरराष्ट्रीय संस्था आणि प्रादेशिक संस्था आणि ज्ञान भागीदार या बैठकीत सहभागी होतील.

 

* * *

S.Patil/P.Jambhekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1895894) Visitor Counter : 98