अर्थ मंत्रालय
मिशन मोड मध्ये कामगारांना रोजगारक्षम कौशल्ये आणि ज्ञानाने सुसज्ज करण्यासाठी सरकार वचनबद्ध
राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये व्यावसायिक शिक्षण आणि कौशल्य विकासावर विशेष भर
राष्ट्रीय प्रशिक्षणार्थी प्रोत्साहन योजनेअंतर्गत 31 डिसेंबर 2022 पर्यंत 21.4 लाख प्रशिक्षणार्थीची उद्योगामध्ये नियुक्ती
कारागीर प्रशिक्षण योजने अंतर्गत 30 ऑक्टोबर 2022 पर्यंत 91.7 लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले
केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री, निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत आर्थिक सर्वेक्षण 2022-23 अहवाल मांडला.
Posted On:
31 JAN 2023 8:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 जानेवारी 2023
सर्वेक्षणात असे म्हटले आहे की, केंद्रीय मंत्रालयाच्या स्थापनेसह, सरकारने राष्ट्रीय कौशल्य विकास मिशन तसेच कौशल्य विकास आणि उद्योजकता राष्ट्रीय धोरण सुरू केल्यामुळे कौशल्य परिसंस्था सुधारण्याच्या आणि त्याला लागू करण्याच्या प्रयत्नांना वेग आला. राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) 2020 मध्ये देखील देखील, व्यावसायिक शिक्षण आणि कौशल्य विकासावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. व्यावसायिक शिक्षणाला सामान्य शिक्षणाबरोबर जोडणे आणि व्यावसायिक शिक्षणाला मुख्य प्रवाहात आणणे, देशाच्या शिक्षण व्यवस्थेतील प्रमुख सुधारणा म्हणून ओळखली गेले आहे.
आर्थिक वर्ष 21 चा लेबर फोर्स सर्व्हे (PLFS) अर्थात कामगार सर्वेक्षण हे दर्शविते की आर्थिक वर्ष 19 आणि आर्थिक वर्ष 20 च्या तुलनेत आर्थिक वर्ष 21 मध्ये तरुणांमधील औपचारिक व्यावसायिक/तांत्रिक प्रशिक्षण (वय 15- 29 वर्षे) आणि कामकाज सक्षम लोकसंख्या (वय 15-59 वर्षे) यामध्ये सुधारणा झाली आहे. ग्रामीण आणि शहरी दोन्ही क्षेत्रांतील पुरुष आणि महिलांमध्ये कौशल्य विकास झाला आहे.
औपचारिक कौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या आस्थापनांची (24.7 टक्के ) आणि नोकरीवर प्रशिक्षण देणाऱ्या आस्थापनांची (31.6 टक्के) अंदाजित टक्केवारी आरोग्य क्षेत्रात क्षेत्रात सर्वाधिक होती, त्यापाठोपाठ आर्थिक सेवा (औपचारिक प्रशिक्षण देणारी 20.4 टक्के आस्थापने आणि 26.4 टक्के नोकरीवर प्रशिक्षण देणारी) क्षेत्र होते.
स्किल इंडिया मिशन (कौशल्य भारत मिशन)
स्किल इंडिया मिशन अल्पकालीन आणि दीर्घकालीन प्रशिक्षण कार्यक्रमांद्वारे कौशल्य प्रशिक्षण (स्किलिंग), कौशल्य-पुनर्प्रशिक्षण (री-स्किलिंग) आणि कौशल्य-वृद्धी प्रशिक्षण (अप-स्किलिंग) यावर लक्ष केंद्रित करते. या मिशन अंतर्गत, सरकार 20 पेक्षा जास्त केंद्रीय मंत्रालये/विभागांच्या माध्यमातून देशभरात विविध कौशल्य विकास योजना राबवत आहे. मुद्रित माध्यमे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे आणि राज्य सरकारांच्या मोहिमांद्वारे या कार्यक्रमाचा प्रचार केला जातो. कौशल्य परीसंस्थेच्या सर्वसामान्य चौकटीत जास्तीतजास्त प्रदेशाचा समावेश केला जात आहे, जेणेकरून सरकारी कौशल्य कार्यक्रमांचा प्रभाव संपूर्ण कौशल्य परिसंस्थेमध्ये एकसमान दिसून येईल.
* * *
N.Chitale/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1895177)
Visitor Counter : 347