पंतप्रधान कार्यालय
काश्मीरची समृद्ध संस्कृती, कला आणि हस्तकलेचे दर्शन घडवणाऱ्या 'वितस्ता' कार्यक्रमाची पंतप्रधानांनी केली प्रशंसा
Posted On:
29 JAN 2023 8:46PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरची समृद्ध संस्कृती, कला आणि हस्तकलेचे प्रदर्शन करणाऱ्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या वितस्ता कार्यक्रमाची प्रशंसा केली आहे.
काश्मीरची समृद्ध संस्कृती, कला आणि हस्तकलेचे प्रदर्शन करण्यासाठी सांस्कृतिक मंत्रालयाने 27 ते 30 जानेवारी 2023 या दरम्यान वितस्ता हा कार्यक्रम आयोजित केला आहे.या कार्यक्रमाद्वारे काश्मीरची ऐतिहासिक ओळख इतर राज्यांपर्यंत पोहोचली असून ते ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ च्या भावनेचे प्रतीक आहे.
अमृतमहोत्सवाच्या ट्विट थ्रेडला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे;
"काश्मीरची समृद्ध परंपरा, विविधता आणि वैशिष्ट्ये यांचा अनुभव देणारी अद्भुत झलक!"
***
N.Chitale/S.Patgaokar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1894556)
Visitor Counter : 247
Read this release in:
Urdu
,
English
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam