युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा- 2022 मध्ये क्रीडापटूंचा अनुभव समृद्ध करणारे विशेष ॲप सुरु ; माऊसच्या एका क्लिकवर स्पर्धेचे वेळापत्रक, ठिकाणे आणि पदक तालिका उपलब्ध होणार; क्रिडापटूंच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी चॅटबॉटही केले तयार
Posted On:
29 JAN 2023 6:30PM by PIB Mumbai
युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2022 साठी एक विशेष मोबाइल ॲप्लिकेशन आणले आहे. या ॲपद्वारे स्पर्धेत सहभागी खेळाडू, प्रशिक्षक, सहाय्यक कर्मचारी, खेळाडूंचे पालक आणि स्पर्धेशी निगडीत सर्व राज्यांतील अधिकारी यांना या खेळांबद्दलची सर्व माहिती बटनच्या एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. खेलो इंडिया युवा क्रिडा स्पर्धेसाठी प्रथमच समर्पित ॲप जारी करण्यात आले आहे.
या ॲपमध्ये एक समर्पित ऍथलीट लॉगिन आहे, जे खेळाडूला त्याच्या किंवा तिच्या स्पर्धेतील नोंदणीच्या वेळेपासून स्पर्धेच्या संपूर्ण कालावधीत सहाय्यक ठरेल. हे ऍप खेळाडूला स्पर्धा सुरू होण्यापूर्वी त्याची किंवा तिची सत्यापित कागदपत्रे अपलोड केली गेली आहेत की नाही हे तपासण्याची संधी देते. यामुळे खेळाडूंच्या नोंदणी प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येईल.
जेव्हा तो किंवा ती क्रिडापटू स्पर्धेसाठी नोंदणी करून त्यानंतर मध्य प्रदेशातील स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचेल तेंव्हा तो किंवा ती, त्यांना दिल्या जाणाऱ्या क्रिडा साहित्य कोणत्या टप्यात आहे, त्यांच्या निवासस्थानाची सोय करण्यात आलेले हॉटेल, निवासस्थान ते स्पर्धेचे ठिकाण आणि परत निवासस्थानापर्यंतच्या प्रवासाची सोय यासह आपत्कालीन परिस्थितीत मदत मिळवण्यासाठी महत्वाचे संपर्क क्रमांक अशी सर्व माहिती या ॲपद्वारे मिळवू शकतात. इतकेच नव्हे तर, स्पर्धेच्या काळात खेळाडूंनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना त्वरित प्रतिसाद मिळतील याची खात्री करण्यासाठी, एक व्हॉट्सॲप चॅटबॉट देखील तयार करण्यात आला आहे.
हे ॲप क्रीडा चाहत्यांना सामन्यांचे वेळापत्रक, पदक तालिका, स्पर्धेच्या ठिकाणांचा पत्ता या माहीतीसह फोटो गॅलरीत प्रवेश प्रदान करेल.
हे ॲप अँड्रॉइड आणि ऍपल दोन्ही प्रकारच्या फोनवर उपलब्ध असून विनामूल्य डाउनलोड केले जाऊ शकते.
खालील लिंक वापरून हे ॲप डाऊनलोड करता येईल.
प्ले स्टोअर.
https://play.google.com/store/apps/details?id=com.sportsauthorityofindia.kheloindiagames
ॲप स्टोअर
https://apps.apple.com/in/app/khelo-india-games/id1665110083
व्हॉट्सॲप चॅटबॉट
https://wa.me/919667303515?text=Hi%21
***
N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1894509)
Visitor Counter : 572