संरक्षण मंत्रालय

स्टार्ट अप 20 प्रारंभिक बैठक – नीओचे प्रकल्प प्रदर्शित

Posted On: 28 JAN 2023 5:40PM by PIB Mumbai

 

भारताच्या G20 अध्यक्षतेखाली आयोजित स्टार्टअप 20 एन्गेजमेंट ग्रुपच्या प्रारंभिक बैठकीत नेव्हल इनोव्हेशन अँड इंडिजनायझेशन ऑर्गनायझेशनने (NIIO) भारतीय नौदल अधिकाऱ्यांच्या वैद्यकीय नवोन्मेषाली संकल्पनांचे प्रदर्शन केले

'आद्यंत' ऑक्सिजन रीसायकलिंग सिस्टम (ओआरएस), 'स्पंदन' कमी किमतीचा डिजिटल स्टेथोस्कोप आणि 'नेबिरो' स्मार्ट पोर्टेबल नेब्युलायझरसह विविध वैद्यकीय नव संकल्पना यावेळी प्रदर्शित करण्यात आल्या.

जी 20 देशांचे प्रतिनिधी आणि जी 20 शेर्पा अमिताभ कांत आणि नीती आयोगाचे प्रमुख कार्यकारी अधिकारी परमेश्वरन अय्यर यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी, नौदल अधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि भारतीय नौदल राष्ट्र उभारणीसाठी नव उन्मेष" या संकल्पनेअंतर्गत भारतीय नौदलाने केलेल्या अभिनव कार्याची प्रशंसा केली.

भारताच्या जी20 अध्यक्षतेखाली आयोजित हा दोन दिवसीय कार्यक्रम 28-29 जानेवारी 23 रोजी हैदराबाद येथे होत आहे. स्टार्ट-अप्सना पाठबळ देण्यासाठी आणि स्टार्ट-अप उद्योग, गुंतवणूकदार, नवोन्मेष संस्था आणि त्याच्याशी संबंधित इतर प्रमुख भागधारक यांच्यातील समन्वय सक्षम करण्यासाठी स्टार्ट अप 20 संपूर्ण जगासमोर आपला आदर्श निर्माण करण्याची आकांक्षा बाळगत आहे.

***

S.Kakade/S.Patgoankar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1894315) Visitor Counter : 141


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu