संरक्षण मंत्रालय

‘बिटींग द रिट्रिट’ सोहळा 2023 मध्ये शास्त्रीय रागांवर आधारित भारतीय धून वाजवल्या जाणार


स्वदेशी बनावटीच्या 3500 ड्रोनचा समावेश असलेला भारताचा सर्वात मोठा ड्रोन शो प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणार

पहिल्यांदाच होणार थ्री-डी ऍनामॉर्फिक प्रोजेक्शनचे आयोजन

Posted On: 28 JAN 2023 4:46PM by PIB Mumbai

 

यंदाच्याबिटींग रिट्रिटसोहळ्यात भारतीय शास्त्रीय रागांवर आधारित वाजवल्या जाणाऱ्या भारतीय धून कार्यक्रमाचे आकर्षण असणार आहेत. 29 जानेवारी 2023 रोजी नवी दिल्लीच्या केंद्रस्थानी असलेल्या विजय चौक येथे होणाऱ्या या सोहळ्याला राष्ट्रपती आणि तिन्ही सेनादलांच्या प्रमुख द्रौपदी मुर्मु उपस्थित असतील. यावेळी लष्कर, नौदल, हवाई दल आणि राज्य पोलिस आणि केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या(सीएपीएफ) म्युझिक बँडकडून अतिशय आकर्षक आणि ठेका धरायला लावणाऱ्या 29 भारतीय धून वाजवल्या जाणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे देखील या सोहळ्याला उपस्थित राहणार असून स्वदेशी बनावटीच्या 3500 ड्रोनचा सहभाग असलेल्या भारताच्या सर्वात मोठ्या ड्रोन शोचा ते अनुभव घेतील. हा भव्य ड्रोन शो ड्रोनच्या अतिशय अचूक समन्वयाने तयार करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय व्यक्तिमत्वे आणि घटनांच्या आकाराच्या रचनांनी  रायसिना हिल्सचे आकाश उजळून टाकेल. स्टार्ट अप संबंधित व्यवस्थेचे यश, भारताच्या युवा वर्गाचे तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रभुत्व यांचे दर्शन या शोमधून घडेल. मेसर्स बॉटलॅब डायनॅमिक्सने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

बिटींग रिट्रिट’ 2023 दरम्यान पहिल्यांदाच एका थ्री डी ऍनामॉर्फिक प्रोजेक्शनचे नॉर्थ ब्लॉक आणि साऊथ ब्लॉक च्या दरम्यान आयोजन करण्यात आले आहे.

दरवर्षी 29 जानेवारीला विजय चौकामध्येबिटींग रिट्रिटकार्यक्रमाने चार दिवस चालणाऱ्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याची सांगता होतेया कार्यक्रमात सैन्यदलांचे कलर्स आणि स्टँडर्ड्सचे संचलन होत असताना हा कार्यक्रम राष्ट्रीय अभिमानाचा कार्यक्रम ठरला आहे.

या सोहळ्याची सुरुवात 1950 पासून झाली ज्यावेळी भारतीय लष्कराचे मेजर रॉबर्ट्स यांनी सैन्यदलाच्या बँडच्या कौशल्याचे दर्शन घडवणाऱ्या एका कार्यक्रमाची स्वदेशी निर्मिती केली. या कार्यक्रमाला अनेक शतकांची जुनी परंपरा लाभलेली आहे ज्यावेळी युद्धात सहभागी असलेल्या तुकड्या सूर्यास्ताच्या वेळी त्यांच्या तळावर रिट्रिटच्या आवाजानंतर युद्ध थांबवत असत, शस्त्रे खाली ठेवत असत आणि युद्धभूमीवरून तळाकडे परत येत असतध्वज खाली उतरवले जात. हा सोहळा गतकाळाच्या आठवणी जाग्या करतो.

***

S.Kakade/S.Patil/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1894300) Visitor Counter : 180


Read this release in: Tamil , English , Urdu , Hindi , Telugu