गृह मंत्रालय

राष्ट्रपतींकडून विविध जीवन रक्षा पदक मालिका पुरस्कार - 2022 प्रदान करण्यास अनुमोदन

Posted On: 25 JAN 2023 6:20PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 जानेवारी 2023

 

प्रजासत्ताक दिनानिमित्त देण्‍यात येणाऱ्या विविध प्रकारच्या जीवन रक्षा पदक मालिका पुरस्कार 2022 प्रदान करण्यास राष्‍ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी अनुमोदन दिले आहे. यानुसार 2022 मध्‍ये 43 जणांना या पदकाने गौरवण्‍यात येणार आहे. यामध्‍ये सर्वोत्तम जीवन रक्षा पदक 7 जणांना देण्‍यात येईल; तर उत्‍तम जीवन रक्षा पदकाने आठ जणांचा सन्मान करण्‍यात येईल. तर 28 जणांना जीवन रक्षा पदकाने गौरवण्‍यात येईल. चार जणांना हा पुरस्‍कार मरणोत्तर देण्‍यात येणार आहे. पुरस्‍कार विजेत्यांचा तपशील खालील प्रमाणे आहे.

सर्वोत्तम जीवन रक्षा पदक

1. कुमारी अंजली बघेल, मध्‍य प्रदेश

2. नीलाबाठ डी. संगमा, मेघालय

3.चेग्रिक डी. संगमा, मेघालय

4.वालग्रिक एम. मोमिन , मेघालय

5.जिनजॅश डी मारक, मेघालय

6.इमॅन्यएल लालॉमपुईआ, मिझोराम (मरणोत्तर)

7.मोहम्‍मद उमर दार (मरणोत्तर) संरक्षण मंत्रालय

उत्‍तम जीवन रक्षा पदक

1.  मुहम्मद सुफियान, केरळ

2 नीरज के. नित्यानंद, केरळ

3. अतुल बिनेश, केरळ

4. श्रीमती. किरण बैगा, मध्य प्रदेश

5. रविराज अनिल फडणीस, महाराष्ट्र

6. लालछुआनलियाना (मरणोत्तर), मिझोरम

7.लियानझालामा, मिझोरम

8. शेरसिंग, सीमा रस्‍ते संघटना – बीआरओ

जीवन रक्षा पदक

1. त्सेरिंग दोर्जी गोईबा, अरुणाचल प्रदेश

2. घनश्यामभाई प्रभातभाई तडवी, गुजरात

3. गौरव जसवाल, हिमाचल प्रदेश

4. मास्टर अधीन प्रिन्स, केरळ

5. बबीश बी, केरळ

6. सुबोध लाल सी, केरळ पोलीस

7. मास्टर मुहैमिन पी के, केरळ

8. मास्टर मोहम्मद शमिल, केरळ

9. ब्रजेश कुमार साहू, मध्य प्रदेश

10. महेश शंकर चोरमले, महाराष्ट्र

11.सय्यद बाबू शेख, महाराष्ट्र

12.कुमारी रिडोंडोर लिंगडोह, मेघालय

13.अँथनी लालहरुईझेला (मरणोत्तर), मिझोरम

14. लालरामलियाना, मिझोरम

15. आर. खवलियाना, मिझोरम

16.  सोनू कुमार, संरक्षण मंत्रालय

17.  टी अनंत कुमार, संरक्षण मंत्रालय

18.  करमबीर सिंग, सीमा सुरक्षा दल

19. एम उमाशंकर, सीमा सुरक्षा दल

20. बलबीर सिंग, सीमा सुरक्षा दल

21. श्री दर्पण किशोर, सीमा सुरक्षा दल

22. डॉ. हिमांशू सैनी, सीमा सुरक्षा दल

23.  विनोद कुमार, सीमा सुरक्षा दल

24.  जाकीर हुसेन, इंडो-तिबेट सीमा पोलीस

25. शैलेंद्र सिंह नेगी, इंडो-तिबेट सीमा पोलीस

26.  सुरेंदर कुमार, रेल्वे मंत्रालय

27.  जयपाल सिंग, रेल्वे मंत्रालय

28. भूडाराम सैनी, रेल्वे मंत्रालय

स्‍वत:चा जीव धोक्यात घालून दुसऱ्याचे प्राण वाचविल्याबद्दलत्‍या व्यक्तीचा मदत करण्‍याचा विशिष्‍ट स्वभाव लक्षात घेवून त्‍या गुणवत्तेसाठी जीवन रक्षा पदक स्‍वरूपामध्‍ये पुरस्कार दिला जातो. हा सर्वोत्तम जीवन रक्षा पदक, उत्तम जीवन रक्षा पदक आणि जीवन रक्षा अशा तीन श्रेणींमध्ये दिला जातो. या पुरस्कारासाठी सर्व स्तरातील व्यक्ती पात्र आहेत. हा पुरस्कार मरणोत्तरही दिला  जाऊ शकतो. (पदक, केंद्रीय गृह मंत्र्यांची  स्वाक्षरी केलेले प्रमाणपत्र आणि रोख रकमेचे पारितोषिक  असे या पुरस्काराचे  स्‍वरूप आहे.) तसेच लोकांचे प्राण वाचविणाऱ्यांना योग्य सन्मान देवून केंद्रीय मंत्रालय/संस्था/राज्य सरकार अशा संबंधितांकडून पुरस्कार प्रदान केला जातो .

 

 

 

 

S.Patil/S.Bedekar/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1893696) Visitor Counter : 234