रेल्वे मंत्रालय

रेल्वे सुरक्षा बलाने 2022 मध्ये 11268 गुन्हेगारांच्या अटकेसह 7.37 कोटी रुपयांची चोरीला गेलेली रेल्वेची मालमत्ता केली जप्त


वर्षभरात आरपीएफच्या जवानांनी 17,756 मुलांची सुटका केली

194 तस्करांना अटक करून त्यांच्या तावडीतून 559 जणांची केली सुटका

ऑपरेशन नार्कोस( NARCOS) अंतर्गत, रेल्वे सुरक्षा दलाने 1081 गुन्हेगारांना अटक केली आणि सुमारे 80 कोटी रुपये किमतीचे अंमली पदार्थ आणि व्यसनी गुंगी आणणारी औषधे (नारकोटिक्स ड्रग्स साइकोट्रोपिक सब्सटेंस NDPS) जप्त करण्यात यश मिळवले.

Posted On: 25 JAN 2023 2:37PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 जानेवारी 2023

भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाअंतर्गत रेल्वे सुरक्षा बल कायदा, 1957 याअंतर्गत रेल्वेच्या मालमत्तेचे उत्तम प्रकारे संरक्षण आणि सुरक्षितता राखणे, रेल्वे मालमत्तेच्या वाहतुकीतील कोणताही अडथळा दूर करणे आणि रेल्वेत उत्तम प्रकारे संरक्षण आणि सुरक्षितता राखण्यासाठी इतर हितावह कृत्ये करण्यासाठी, रेल्वे संरक्षण बलाची (RPF) स्थापना करण्यात आली आहे. रेल्वेच्या मालमत्तेचे उत्तम प्रकारे संरक्षण आणि सुरक्षितता सांभाळण्यासाठी आरपीएफला रेल्वे मालमत्ता कायदा, 1966(बेकायदेशीर ताबा)याच्या तरतुदींनुसार रेल्वेवरील गुन्ह्यांची प्रकरणे हाताळण्याचा अधिकार आहे दिलेला आहे. 2004 पासून रेल्वे प्रवासी क्षेत्र आणि रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदारी देखील आरपीएफकडे सोपवण्यात आली आहे.  रेल्वे प्रवासी, प्रवासी क्षेत्र आणि रेल्वे मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी, प्रवाशांचा प्रवास सुलभपणे होण्यासाठी  आणि सुरक्षितता सांभाळण्यासाठी,महिला आणि मुलांची तस्करी रोखण्यासाठी आणि रेल्वे क्षेत्रात आढळलेल्या निराधार मुलांचे पुनर्वसन करण्यासाठी योग्य ती कारवाई करण्यासाठी गुन्हेगारांविरुद्ध अविरत लढत हे दल कार्य करत असते. महिलांचा सर्वाधिक नऊ टक्के सहभाग  हे या केंद्रीय बलाचे खास वेगळेपण आहे.

2022 मध्ये आयपीएलने बजावलेली महत्वपूर्ण कामगिरी  

ऑपरेशन "रेल सुरक्षा" - या कार्यवाहीअंतर्गत, रेल्वे मालमत्तेचे रक्षण करण्याच्या आदेशानुसार,आरपीएफने रेल्वे मालमत्तेशी संबंधित अनेक गुन्ह्याविरूद्ध कायदेशीर कारवाई केली.वर्षभरात आरपीएफने रेल्वे मालमत्तेच्या चोरीच्या 6492 गुन्ह्यांची नोंद केली असून त्यामध्ये 7.37 कोटी रुपयांची कमाई करत 11268 गुन्हेगारांना अटक केली.

"उपलब्ध" या कार्यवाहीअंतर्गत दलालांवर कारवाई - रेल्वेचे  तिकीट आरक्षित करणे हे सर्वसामान्यांसाठी खूप कठीण काम आहे कारण अशी  तिकिटे मोठ्या प्रमाणात आधीपासून आरक्षित करून दलाल आपल्याकडेच ती जमवून ठेवतात. रेल्वे आरक्षण ऑनलाइन पद्धतीने निश्चित करण्यासाठी बेकायदेशीर सॉफ्टवेअरचा वापर केल्याने सर्वसामान्यांच्या आरक्षित तिकिटांच्या उपलब्धतेवर विपरित परिणाम होतो.अनधिकृतपणे दलाली (रेल्वे तिकीट खरेदी आणि पुरवठा करण्याचा व्यवसाय चालवणे) करणाऱ्या व्यक्तींवर आरपीएफ कठोर आणि सतत कारवाई करत आहे.  या कारवाईत  5179 दलालांना अटक करून 4884 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.यामध्ये आयआरसीटीसीच्या 1021 अधिकृत एजंट्सचा समावेश आहे ज्यांनी तिकिटे आरक्षित करण्यासाठी बेकायदेशीर मार्ग वापरला आहे.अशाप्रकारे बेकायदेशीर सॉफ्टवेअर्सचा वापर करून 140 हून अधिक बेकायदेशीर सॉफ्टवेअर विकासक, सुपर सेलर्स,घाऊक आणि किरकोळ विक्रेत्यांना अटक करण्यात आली.

ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत बालकांची सुटका - विविध कारणांमुळे हरवलेल्या/ कुटुंबापासून विभक्त झालेल्या, काळजी आणि संरक्षणाची गरज असलेल्या मुलांना ओळखून त्यांची सुटका करण्याचे उदात्त कार्य आरपीएफ करत असते.रेल्वे मंत्रालयाने डिसेंबर 2021 मध्ये अडचणीत असलेल्या परंतु रेल्वेच्या संपर्कात असलेल्या मुलांची चांगली काळजी आणि संरक्षण करण्यासाठी एक सुधारित मानक कार्यप्रणाली जारी केली जी 2022 मध्ये कार्यान्वित केली गेली.यानुसार, सध्या 143 रेल्वे स्थानकांवर CHD कार्यरत आहेत.भारतीय रेल्वेच्या संपर्कात आलेल्या, काळजी आणि संरक्षणाची आवश्यकता असलेल्या त्यांच्या कुटुंबापासून अनेक कारणांमुळे हरवलेल्या/विभक्त झालेल्या मुलांना पुन्हा एकत्र आणण्यात आरपीएफने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.  या संदर्भात, 'नन्हे  फरीश्ते' या नावाने एक वैशिष्ट्यपूर्ण अभियान भारतीय रेल्वेवर  सुरू करण्यात आले आहे आणि त्याचे उल्लेखनीय परिणाम दिसून येत आहेत.वर्षभरात अशा 17,756 मुलांची आरपीएफच्या जवानांनी सुटका केली.

ऑपरेशन आहट(AAHT)– आरपीएफची मानवी तस्करीविरुद्ध कारवाई

संपूर्ण भारतात पोहोचलेल्या राष्ट्रीय वाहिनीचे संरक्षण करत, मानवी तस्करीविरुद्धच्या राष्ट्रीय लढ्यात रेल्वेने आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे.  या दलाने मानवी तस्करीविरुद्ध "ऑपरेशन आहट (AAHT)" नावाची कारवाई सुरू केली आहे. या मानक कार्यप्रणालीनुसार मानवी तस्करांचे प्रयत्न रोखण्यासाठी प्रभावी यंत्रणा तयार केली आहे.

G.Chippalkatti/S.Patgaonkar/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1893582) Visitor Counter : 119


Read this release in: Tamil , Telugu , English , Urdu , Hindi