रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या अंमलबजावणीसंदर्भातील सध्याच्या आंतर-मंत्रालयीन समस्यांचे निराकरण करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली पायाभूत सुविधा समिती गटाची 10 वी बैठक संपन्न
Posted On:
24 JAN 2023 8:08PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 जानेवारी 2023
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री, नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली आज विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या अंमलबजावणीसंदर्भातील सध्याच्या आंतर-मंत्रालयीन समस्यांचे निराकरण करण्यासाठी, पायाभूत सुविधा समिती गटाची 10 वी बैठक आयोजित करण्यात आली होती. गडकरी म्हणाले की, पंतप्रधान गती शक्ती योजनेच्या प्रगतीला चालना देण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे असे गडकरी म्हणाले.

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, केंद्रीय रेल्वे, दूरसंवाद, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल आणि कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव, रस्ते वाहतूक आणि महामार्ग आणि नागरी हवाई वाहतूक राज्य मंत्री जनरल (डॉ.) व्ही. के. सिंह (निवृत्त), बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक, आणि संरक्षण आणि पर्यटन राज्यमंत्री अजय भट या बैठकीला उपस्थित होते.

सध्या चालू असलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या प्रगतीला गती देण्यासाठीच्या अनेक मुद्द्यांना चर्चेमध्ये प्राधान्य देण्यात आले. प्रलंबित वन आणि पर्यावरण परवानग्या, कामाच्या परवानग्या/मंजुऱ्यांची सुविधा, जमीन वाटप/हस्तांतरण सुनिश्चित करणे आणि निधी जारी करणे, या मुद्द्यांशी संबंधित विषयांचा या चर्चेत समावेश होता. पर्यावरण/वन/वन्यजीव मंजुरी, रेल्वे आणि उर्जा, यासह इतर धोरणांशी संबंधित विषयांवरही चर्चा झाली. पर्यावरण विषयक मंजुरी आणि रेल्वे आणि रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाची जमीन धोरणे, आणि पर्यावरण आणि वन मंजुरीसाठी सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्त्वे तयार करणे या मुद्द्यांवरही यावेळी विस्तृत चर्चा झाली.

संबंधित अधिकाऱ्यांनी वरील बाबींची मंजुरी आणि अंमलबजावणीची प्रक्रिया जलद गतीने करावी असे निर्देश यावेळी देण्यात आले. संबंधित मंत्रालये/विभागांनी पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्यासाठी उपस्थित केलेल्या विविध समस्यांकडे लक्ष देण्याचे आणि त्यांचे निराकरण करण्याचे मान्य केले.
S.Kane/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1893388)
Visitor Counter : 208