मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
गुजरातमध्ये धनगर तरुणांची राष्ट्रीय परिषद
Posted On:
21 JAN 2023 2:00PM by PIB Mumbai
धनगरांच्या आकांक्षा, आव्हाने आणि सरकारशी धोरणात्मक चर्चा करण्याची गरज यावर विचारमंथन करण्यासाठी कच्छ (गुजरात) मधील भूज येथे 16 राज्यांमधून आलेल्या धनगरांची राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. विशेष म्हणजे सहजीवन - हे पशुपालन केंद्र विस्तृत पशुधन उत्पादन व्यवस्थेसाठी अनेक पथदर्शी उपक्रम सुरु करण्यात आघाडीवर आहे.
केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री परषोत्तम रुपाला यांनी बृहद पशुधन उत्पादन प्रणालीच्या व्यापक हितासाठी आवश्यक चर्चासत्र आणि पुढील उपक्रम सुरू केले आहेत:
- राष्ट्रीय पशुधन गणनेचा भाग म्हणून धनगर गणनेचा समावेश;
- समस्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयामध्ये पशुपालक कक्षाची निर्मिती;
- राष्ट्रीय पशुधन अभियाना अंतर्गत विस्तृत पशुधन उत्पादन प्रणाली संबंधित योजना आणि कार्यक्रम समाविष्ट करण्यासाठी प्रारंभिक संशोधन
बंदिस्त वातावरणात ध्वनी आणि उष्णता रोधक स्वदेशी लोकर आणि बिगर-गोजातीय (गाई-म्हशी व्यतिरिक्त) दुधासाठी संस्थात्मक हस्तक्षेपांसह तापमान-संवेदनशील नाशवंत वस्तूंच्या साठवण आणि वाहतुकीमध्ये लोकरीच्या वापराचा भविष्यातील उपक्रमांमध्ये उल्लेख केला जाईल अशी अपेक्षा आहे. स्वदेशी लोकरीचे राष्ट्रीय अभियान, बिगर-गोजातीय दुधाच्या (शेळी, मेंढी, गाढव आणि याक) विपणनासाठी संस्थात्मक मंचाची निर्मिती, धनगर समाजाला ओळख प्रदान करणे आणि पशुपालकांना दुग्धव्यवसाय सुलभ करणे हे प्राधान्यक्रम आहेत.
***
S.Kane/V.Joshi/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1892673)
Visitor Counter : 260