कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
हिन्दी आणि इंग्रजी व्यतिरिक्त 13 प्रादेशिक भाषांमध्ये पहिल्यांदाच मल्टी-टास्किंग (बिगर – तांत्रिक) कर्मचारी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतल्याबद्दल कर्मचारी निवड आयोगाची केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंग यांच्याकडून प्रशंसा
Posted On:
20 JAN 2023 4:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 जानेवारी 2023
हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त 13 प्रादेशिक भाषांमध्ये मल्टी-टास्किंग (बिगर – तांत्रिक) कर्मचारी परीक्षा 2022 I पहिल्यांदाच घेण्याचा निर्णय घेतल्याबद्दल कर्मचारी निवड आयोगाची (स्टाफ सिलेक्शन कमिशन- एसएससी) केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंग यांनी प्रशंसा केली आहे.
उर्दू, तामिळ, मल्याळम, तेलगू, कन्नड, आसामी, बंगाली, गुजराती, कोकणी, मणिपुरी (मीती), मराठी, ओडिया आणि पंजाबी या तेरा प्रादेशिक भाषांमध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे.
नोकरीसाठी उत्सुक असलेल्या सगळ्यांना समान संधी उपलब्ध करून देणे आणि भाषेच्या अडथळ्यामुळे कोणालाही संधी नाकारली जाऊ नये किंवा कोणीही त्यापासून वंचित राहू नये या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेशी हे पाऊल सुसंगत आहे, असे डॉ जितेंद्र सिंग म्हणाले.
या निर्णयामुळे इंग्रजी आणि हिंदी भाषांमध्ये पूर्वी घेण्यात येणाऱ्या परीक्षा प्रादेशिक भाषांमध्ये घेतल्या जाव्यात ही विविध राज्यांतील उमेदवारांची आणि विशेषतः दक्षिण भारतातील उमेदवारांची प्रलंबित मागणी पूर्ण होईल. याचा फायदा देशभरातील मोठ्या संख्येने उमेदवारांना होण्याची शक्यता आहे, असेही ते म्हणाले.
या ऐतिहासिक वाटचालीनंतर आठव्या अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या सर्व भाषांचा हळूहळू संविधानात समावेश करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
लोकसंख्येच्या विविध घटकांना समान संधी उपलब्ध करून देण्याचा आयोगाचा नेहमी प्रयत्न असतो. आपल्या देशातील प्रादेशिक विषमता दूर करता यावी आणि संविधानाचा आदर्श राखतानाच भाषिक वैविध्य जपता येईल असाही आयोगाचा प्रयत्न असतो असे त्यांनी सांगितले.
स्टाफ सिलेक्शन कमिशन ही केंद्र सरकारच्या, सर्वात मोठी भरती करणाऱ्या संस्थांपैकी एक आहे. केंद्र सरकारची विविध मंत्रालये/विभागांमध्ये सर्व गट ब (अराजपत्रित) आणि गट क (बिगर-तांत्रिक पदांसाठी) भरती करणे हे तिचे मुख्य काम आहे. आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे माध्यम साधारणपणे हिंदी आणि इंग्रजी असते.
R.Aghor/P.Jambhekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1892472)
Visitor Counter : 272