संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत आणि इजिप्तमधील पहिला संयुक्त प्रशिक्षण सराव सायक्लॉन -I ला राजस्थानमधील जैसलमेर इथे सुरूवात

प्रविष्टि तिथि: 20 JAN 2023 11:19AM by PIB Mumbai

राजस्थानमधील जैसलमेर इथे भारत आणि इजिप्तच्या लष्करांच्या विशेष दलांमध्ये 'एक्सरसाइज सायक्लॉन-I' हा संयुक्त सराव सुरू आहे.  14   जानेवारी  2023   पासून सुरु झालेला हा सराव, दोन्ही देशांमधील पहिलाच संयुक्त लष्करी सराव आहे. परस्परांमधील  संरक्षणविषयक सहकार्य वाढवणे तसेच वाळवंटी प्रदेशात दहशतवादविरोधी, हेरगिरी, छापे  आणि यासोबतच इतर विशेष मोहिमा राबवताना विशेष दलांची व्यावसायिक कौशल्ये परस्परांसाठी उपयोगात आणणे तसेच आणि परस्पर समन्वयाने मोहीमांचे  कार्यान्वयन करता येण्यावर भर देणे हे या सरावाचे उद्दीष्ट आहे.

'एक्सरसाइज सायक्लॉन-I' हा दोन्ही देशांच्या विशेष दलांना एकाच व्यासपीठावर आणणारा अशा प्रकारचा पहिलाच संयुक्त लष्करी सराव आहे. राजस्थानच्या वाळवंटात  14    दिवस हा सराव चालणार आहे. दोन्ही देशांच्या विशेष दलांच्या कौशल्यात वृदधी व्हावी म्हणून  या सरावात स्नायपिंग, कॉम्बॅट फ्री फॉल, लक्ष्यशोध, टेहळणी आणि लक्ष्याची निश्चिती, शस्त्रास्त्रे, उपकरणे, नवकल्पना, रणनीती, तंत्र आणि कार्यपद्धती यावरील माहितीचे आदानप्रदान यांचा  समावेश केला आहे. विशेष दलांच्या मोहीमांसाठी,अतिरेक्यांचे तळ / लपण्याची ठिकाणे अशा ठिकाणी सर्जिकल स्ट्राईक आणि महत्वाच्या लक्ष्यभेदासाठी स्नायपिंग तसेच रणगाडे आणि शस्त्रसामग्रीच्या वेगवान हालचालींशी संबंधित यांत्रिक पद्धतीच्या युद्धस्थितीसाठीसंयुक्त नियोजन आणि सरावाचा यात समावेश केला आहे.


या संयुक्त सरावामुळे भारत आणि इजिप्तला परस्परांची लष्करी संस्कृती आणि मूल्यू समजून घेता येतील, यातून परस्पर राजनैतिक संबंध अधिक दृढ करत, लष्करी सहकार्य आणि आंतरकार्यक्षमतेला चालना द्यायलाही मदत होऊ शकेल.

***

Sonali K/Tusar P/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji   Image result for facebook icon /PIBPanaji    /pib_goa   pibgoa[at]gmail[dot]com  /PIBGoa


(रिलीज़ आईडी: 1892427) आगंतुक पटल : 400
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Tamil , Telugu