वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय स्टार्ट अप पुरस्कार 2022 च्या विजेत्यांना पुरस्कार वितरण करून स्टार्ट अप इंडिया नवोन्मेष सप्ताहा’चा समारोप

Posted On: 16 JAN 2023 5:38PM by PIB Mumbai

 

राष्ट्रीय स्टार्ट अप दिनाच्या प्रसंगी आज राष्ट्रीय स्टार्ट अप पुरस्कार 2022 च्या विजेत्यांना पुरस्कार प्रदान करून स्टार्ट अप इंडिया नवोन्मेष सप्ताहाचा समारोप  झाला. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री  पीयूष गोयल यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री सोम प्रकाश यांच्या उपस्थितीत हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

भारताच्या विकासाच्या परिवर्तनकारी यशोगाथेमध्ये एक अध्याय रचणाऱ्या, केवळ आर्थिक लाभाच्या बाबतीतच नव्हे तर समाजावर दृश्य स्वरूपात केलेल्या प्रभावी परिणामांबद्दल आणि उल्लेखनीय क्षमता सिद्ध करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या स्टार्टअप्स आणि सक्षमकर्त्यांना राष्ट्रीय स्टार्ट अप पुरस्कार 2022 ने सन्मानित करण्यात आले.

उद्योजकतेचे चैतन्य  साजरे  करण्यासाठी देशभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. स्टार्टअप, इनक्यूबेटर, गुंतवणूकदार आणि परिसंस्था  विकसित  करणाऱ्यांसाठी, गुजरात सरकारचा स्टार्टअप विभाग आणि आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाइल उत्कृष्टता केंद्र  (iACE) यांनी स्टार्टअप इंडियाच्या भागीदारीत गांधीनगरमध्ये संयुक्तपणे आज एक दिवसीय कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात स्टार्टअप इंडिया पुढाकार, बीज निधी योजना, स्टार्टअप परिसंस्था, उद्योग संवेदना, विद्यार्थी उद्योजक आणि उदयोन्मुख उद्योजकांसाठी मार्गदर्शक-मेंटॉर कनेक्ट आणि सहभागी स्टार्टअप्ससाठी मॉक पिचिंग सत्र अर्थात आपली संकल्पना कशी सादर करावी या विषयावर सत्रे होती. यात 150 हून अधिक उद्योजक, मार्गदर्शक, इनक्यूबेटर आणि इतर परिसंस्था विकसित  करणारे सहभागी झाले होते.

स्टार्ट अप इंडियाने सात दिवसांच्या उद्योग केंद्रित वेबिनारच्या मालिकेतील अंतिम वेबिनार - बिलियन डॉलर्सच्या स्वप्नाला प्रत्यक्षात आणणे या विषयावर आयोजित केला होता. स्टार्टअप परिसंस्थेमध्ये स्त्री पुरुष समानतेला चालना देण्यावर वेबिनारमध्ये लक्ष केंद्रित केले गेले जेणेकरून स्टार्टअप साठी निधी उभारण्याच्या प्रक्रियेतील असमानता दूर होईल. वेबिनार येथे पाहता येईल: https://www.youtube.com/watch?v=n37-J_DcPv0

बेंगळुरू, रायसेन, गुरुग्राम, इंदूर, भोपाळ, गांधीनगर, गाझियाबाद, मोहाली, दिल्ली, भुवनेश्वर, जळगाव, नागपूर, कोट्टायम, इम्फाळ, कोलकाता आणि इतर अनेक शहरांमध्ये ऑफलाइन आणि ऑनलाइन कार्यक्रम आयोजित करण्यासाठी विविध केंद्रे स्टार्टअप इंडियामध्ये सहभागी झाली. क्षमता बांधणी कार्यशाळा, तज्ज्ञांचा परिसंवाद, राज्य स्तरीय स्पर्धा आणि आव्हाने, स्टार्ट अप प्रदर्शनं , स्टार्ट अप संमेलने, गोलमेज परिषदा इत्यादी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

***

N.Chitale/B.Sontakke/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1891686) Visitor Counter : 202