पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय

राष्ट्रीय नैसर्गिक इतिहास संग्रहालयाच्या वतीने हरियाणा राज्यातील शाळेच्या मुख्याध्यापकांसमवेत परीक्षा पे चर्चा- लाइफ अभियानावरील संवादात्मक सत्र आयोजित

Posted On: 16 JAN 2023 4:56PM by PIB Mumbai

 

पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालया अंतर्गत असलेल्या राष्ट्रीय नैसर्गिक इतिहास संग्रहालयाने, हरियाणा राज्यातील शाळांच्या मुख्याध्यापकांसाठी लाईफ (LiFE) अभियानाच्या(पर्यावरणस्नेही जीवनशैली) अनुषंगाने परीक्षा पे चर्चा या विषयावर ऑनलाइन संवादात्मक सत्राचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात 55 जण सहभागी झाले. परीक्षेच्या तणावावर मात करण्याच्या दृष्टीने मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना मदत करावी असे जिल्हा शिक्षण अधिकारी इंदू बोकेन यांनी मुख्याध्यापकांना संबोधित करताना सांगितले.

राष्ट्रीय नैसर्गिक इतिहास संग्रहालयाचे (एनएमएनएच) पश्चिम प्रादेशिक केंद्र असलेल्या राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील राजीव गांधी प्रादेशिक नैसर्गिक इतिहास संग्रहालयाच्या (आरजीआरएमएनएच) वतीने हा लाइफ अभियान जागरूकता कार्यक्रम आयोजित केला होता. याचाच एक भाग म्हणून 13 जानेवारी 2023 रोजी ऊर्जाबचत, लाईफ अभियानावर हरित चर्चासत्र, हरित प्रतिज्ञा, रांगोळी आणि चित्रपट यांसारखे उपक्रम  आयोजित करण्यात आले यामध्ये  2,643 हून अधिक विद्यार्थी, शिक्षक आणि अभ्यागतांनी सक्रिय सहभाग घेतला.

 

Mission LiFE awareness programmes organised by RGRMNH, Sawai Madhopur.

***

N.Chitale/S.Chavan/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1891598) Visitor Counter : 141