कोळसा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोळसा खाणींतील पाण्यामुळे 900 गावांतील 18 लाख लोकांना होत आहे लाभ


कोळसा/लिग्नाईट सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम हरित अभियानाला देत आहेत गती

Posted On: 13 JAN 2023 4:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 13 जानेवारी 2023

 

कोळसा मंत्रालयाच्या निर्देशानुसार, कोळसा/लिग्नाइट पीएसयु अर्थात  सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, खाणीतील  पाण्याचे संवर्धन आणि कार्यक्षम वापर करण्यासाठी अनेक पावले उचलत असून ते त्यांच्या अधिकार क्षेत्रांमधील पाण्याचा वापर पिण्यासाठी आणि सिंचनासारख्या सामुदायिक वापरासाठी करण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहेत. कोळसा/लिग्नाईट सार्वजनिक उपक्रमांद्वारे संचालित खाणींमधून सोडले जाणारे पाणी तसेच वापरात नसलेल्या खाणीमधल्या पाण्याचा, कोळसा खाण क्षेत्राच्या जवळपास असलेल्या 900 गावांमध्ये राहणाऱ्या सुमारे 18 लाख लोकांना या पाण्याचा लाभ मिळत आहे.

चालू आर्थिक वर्षात, कोळसा/लिग्नाईट पीएसयुनी   सामुदायिक वापरासाठी सुमारे 4000 एलकेएल खाणींतील पाणी पुरवण्याची योजना आखली होती, त्यापैकी डिसेंबर 2022 पर्यंत 2788 एलकेएल पाण्याचा पुरवठा करण्यात आला आहे. यातून 881 एलकेएल पाणी  पिण्यासह घरगुती कारणांसाठी वापरण्यात आले आहे.खाणींतील या पाण्याचे लाभार्थी हे प्रामुख्याने आदिवासी आणि दुर्गम भागात राहणारे आहेत.हा प्रयत्न शासनाच्या जलसंधारणाच्या जलशक्ती अभियानाच्या अविरत प्रयत्नांचाच एक भाग आहे. 

2022-23 मध्ये, कोल इंडिया लिमिटेड (CIL) ने 1510 हेक्टर जमिनीवरील  वार्षिक वृक्षारोपणाचे  उद्दिष्ट आधीच पार केले असून वित्तीय वर्ष 23 च्या डिसेंबर अखेरपर्यंत 1600 हेक्टर पर्यंत  याचा विस्तार केला जात आहे आणि त्यानुसार  कोल इंडिया लिमिटेडने चालू आर्थिक वर्षात डिसेंबर 2022 पर्यंत 31 लाख रोपांची लागवड केली आहे.

सीड बॉल प्लांटेशन,ड्रोनद्वारे सीड कास्टिंग आणि विविध खाणींमध्ये मियावाकी पध्दतीने वृक्षारोपण यासारख्या नवीन तंत्रांचा वापर सुरू आहे. उत्खनन केलेले क्षेत्र, ओव्हरबर्डन डंप आणि इतर विस्कळीत क्षेत्रे सक्रिय खाण क्षेत्रामधून अलग झाल्यानंतर लगेचच पुन्हा त्यांचा ताबा घेतला जातो. हे वनीकरण उपक्रम आणि हरित पट्टा विकासाची कामे देखील कार्बन सिंक तयार करत आहेत.यामुळे घनदाट वृक्षांची सावली तयार होऊन वायू प्रदूषण नियंत्रित होण्यास देखील मदत होते, खाणकामादरम्यान  उत्सर्जित धूलिकणांना अटकाव करते.

 

* * *

N.Chitale/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1891008) Visitor Counter : 216