अर्थ मंत्रालय
आर्थिक वर्ष 2022-23 साठीचे 10.01.2023 पर्यंतचे प्रत्यक्ष कर संकलन
सकल कर संकलन 14.71 लाख कोटी रुपये, गेल्या वर्षी याच काळातील कर संकलनाच्या तुलनेत 24.58% वाढ
Posted On:
11 JAN 2023 9:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 जानेवारी 2023
10 जानेवारी 2023 पर्यंतच्या प्रत्यक्ष कर संकलनाचे तात्पुरते आकडे स्थिर वाढ दर्शवत आहेत. 10 जानेवारी 2023 पर्यंत 14.71 लाख कोटी रुपये प्रत्यक्ष कराचे सकल संकलन झाले आहे. गेल्या वर्षी याच काळातील सकल कर संकलनाच्या तुलनेत यामध्ये 24.58% वाढ झाली आहे.
प्रत्यक्ष कर संकलन 12.31 लाख कोटी रुपये प्रत्यक्ष कर संकलन ( नेट ऑफ रिफंड) असून, गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील निव्वळ संकलनापेक्षा ते 19.55% जास्त आहे. हे कर संकलन आर्थिक वर्ष 2022-23 च्या प्रत्यक्ष कराच्या एकूण अर्थसंकल्पीय अंदाजाच्या 86.68% आहे.
एकूण महसूल संकलनाच्या दृष्टीने, कॉर्पोरेट आयकर (सीआयटी) आणि वैयक्तिक आयकर (पीआयटी) यामधील वाढीचा दर लक्षात घेता, सीआयटी च्या वाढीचा दर 19.72% आहे तर पीआयटी (एसटीटी सह) चा 30.46% आहे. परताव्याच्या समायोजनानंतर, सीआयटी संकलनामधील निव्वळ वाढ 18.33% आहे, तर पीआयटी संकलनामध्ये 21.64% (केवळ पीआयटी) 20.97% (एसटीटी सह पीआयटी) इतकी आहे.
1 एप्रिल 2022 ते 10 जानेवारी 2023 या कालावधीत 2.40 लाख कोटी रुपये परताव्या पोटी जारी करण्यात आले आहेत. आधीच्या वर्षातील याच कालावधीत जारी केलेल्या परताव्यापेक्षा ते 58.74% जास्त आहेत.
N.Chitale/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1890543)
Visitor Counter : 253