सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
ईशान्येतील एमएसएमईच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर आणि भारताला 'आत्मनिर्भर बनवण्यात त्यांच्या योगदानावर केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांचा भर
Posted On:
09 JAN 2023 10:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 जानेवारी 2023
केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी त्रिपुराचे मुख्यमंत्री, प्रा. (डॉ.) माणिक साह आणि केंद्रीय राज्यमंत्री भानू प्रताप सिंह वर्मा यांच्यासह त्रिपुरा मधील आगरतळा येथे आज, 'ईशान्य क्षेत्रातील (NER) सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या शाश्वत विकासावरील प्रादेशिक परिषदेचे अध्यक्षस्थान भूषवले. मंत्रालयाच्या विविध योजनांची जनजागृती करण्यासाठी एमएसएमई मंत्रालयाने या परिषदेचे आयोजन केले होते. परिषदेला संबोधित करताना नारायण राणे यांनी ईशान्येतील एमएसएमईची महत्त्वपूर्ण भूमिका आणि भारताला 'आत्मनिर्भर बनवण्यात त्यांच्या योगदानावर भर दिला. ते म्हणाले की त्रिपुरा ही कृषी उत्पादनांची भूमी आहे आणि अन्न प्रक्रिया उद्योगांमध्ये एमएसएमईसाठी मोठी क्षमता आहे आणि विद्यमान उद्योगांना बळकट करताना एमएसएमईसाठी अधिक पर्यटन संधी विकसित करण्याचा सल्ला त्रिपुरा सरकारला दिला.
उद्योजकांनी योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री भानू प्रताप सिंह वर्मा यांनी केले. या परिषदेत भारत सरकारच्या एमएसएमई मंत्रालय आणि त्रिपुरा राज्य सरकारच्या विविध उपक्रमांच्या शुभारंभाचे प्रदर्शन करण्यात आले.
रोजगार निर्मिती आणि उपजीविका सुधारण्यात एमएसएमई क्षेत्र महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. सध्या, यात 11 कोटींहून अधिक लोकांना रोजगार देणारी 6 कोटींहून अधिक युनिट्स आहेत, जी जीडीपीमध्ये सुमारे 30% योगदानासह आर्थिक वाढीत महत्त्वपूर्ण योगदान देतात.
आपल्या अर्थव्यवस्थेवर एमएसएमईचा प्रभाव लक्षात घेता, तरुणांमध्ये उद्योजकतेला चालना देण्यासाठी आणि 5 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था साकारण्यासाठी भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासात अविभाज्य भूमिका निभावणारी अनुकूल परिसंस्था निर्माण करण्यासाठी निर्धारित प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे.
देशाच्या आर्थिक कल्याणासाठी एमएसएमई क्षेत्राचे संवर्धन महत्त्वाचे आहे. शाश्वत विकास आणि जागतिक मूल्य शृंखला सुसंगत होण्याकरिता एमएसएमईच्या सक्षमीकरणासाठी एमएसएमई मंत्रालय सातत्याने कार्य करत आहे.
* * *
N.Chitale/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1889884)
Visitor Counter : 163