सांस्कृतिक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

‘जय हिंद’ – लाल किल्ल्यावरील या नवीन लाइट आणि साउंड शोचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्या उद्घाटन होणार

प्रविष्टि तिथि: 09 JAN 2023 8:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 जानेवारी 2023

 

ठळक मुद्दे:

  1. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाद्वारे लाल किल्ल्यावरील नवीन लाईट अँड साउंड शोचे नाव 'जय हिंद' असे आहे.
  2. लाल किल्ल्यावरील ‘जय हिंद’ हा लाईट अँड साउंड शो हिंदी आणि इंग्रजी भाषेत प्रदर्शित केला जाईल.
  3. एका वेळेस एकूण 700 प्रेक्षक हा शो पाहू शकतात.

लाल किल्ल्यावर बहुप्रतिक्षित लाइट अँड साउंड शोचे उद्घाटन उद्या संध्याकाळी केंद्रीय  गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे.

‘जय हिंद’ नावाने नव्या रूपात लाल किल्ल्यावरील लाईट अँड साऊंड शो 17 व्या शतकापासून आजपर्यंतच्या भारताच्या शौर्य आणि इतिहासाचे नाट्यमय सादरीकरण असेल. तीन भागांमध्ये विभागलेला एक तासाचा लाईट अँड साउंड शो 'जय हिंद' हा मराठ्यांचा उदय, 1857 चा स्वातंत्र्य संग्राम, आझाद हिंद सेनेचा उदय यासह प्रोजेक्शन मॅपिंग, लाइव्ह अॅक्शन फिल्म्स, लाइट आणि इमर्सिव्ह साउंड, अभिनेते , नर्तक आणि कठपुतळी अशा सर्व प्रकारच्या ललित कला प्रकारांचा वापर करून स्वातंत्र्याचा लढा आणि गेल्या 75 वर्षांत भारताची निरंतर प्रगती असा भारताच्या इतिहासातील महत्वाचा भाग साकार करेल . 3-भागांचा हा कार्यक्रम नौबतखाना ते दीवान-ए-आम ते दिवाण-ए-खास अशा लाल किल्ल्यातील विविध स्मारकात प्रदर्शित केला जाईल.

एका वेळी 700 लोकांच्या आसन व्यवस्थेसह हा शो इंग्रजी आणि हिंदी भाषांमध्ये जनतेला दाखवला जाईल.

सुंदर संकल्पना, पटकथा आणि मांडणी केलेला, सुमारे 1 तास चालणारा हा शो संवादात्मक तंत्रांद्वारे नवीन पिढ्यांसाठी भारताचा समृद्ध इतिहास आणि वारसा अधोरेखित करणारा एक प्रकारचा दृश्य आणि सांस्कृतिक कार्यक्रम आहे.

लाल किल्ल्यातील लाइट अँड साउंड शो तब्बल 5 वर्षानंतर नव्याने सुरू होत आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून, भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाने याआधीच याद-ए-जालियन संग्रहालय, 1857 च्या भारताच्या पहिल्या स्वातंत्र्यसंग्रामावर आधारित संग्रहालय, आझादी के दिवाने आणि लाल किल्ल्यातील नेताजी सुभाष चंद्र बोस संग्रहालय अशी 4 संग्रहालये लाल किल्ल्यात उघडली आहेत. आता नवीन लाइट आणि साउंड शोची भर पडल्याने अभ्यागतांमध्ये देशभक्तीचा अभिमान आणखी जाज्वल्य होईल.

अलिकडच्या वर्षांत, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, देशभरातील स्मारके आणि स्थळांचा गौरव करून त्याद्वारे अभ्यागतांचा अनुभव समृद्ध करून निरंतर कार्य करत आहे, मग ते 100 कोटी लसीकरणाच्या उपलब्धतेच्या वेळी रोषणाई  असो, स्वातंत्र्याच्या 75 वर्षांचा उत्सव किंवा  जी 20 प्रतिनिधींचे स्वागत असो.

 

* * *

N.Chitale/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1889876) आगंतुक पटल : 201
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Telugu , English , Tamil , Urdu , हिन्दी , Punjabi