पंतप्रधान कार्यालय

17 व्या प्रवासी भारतीय दिवसाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांची सुरीनामच्या राष्ट्राध्यक्षांसोबत बैठक

Posted On: 09 JAN 2023 6:37PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 जानेवारी 2023

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 17 व्या प्रवासी भारतीय दिवसाच्या पार्श्वभूमीवर इंदोर येथे सुरिनाम प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष चंद्रिकाप्रसाद संतोखी यांची भेट घेतली. राष्ट्राध्यक्ष संतोखी हे 7-14 जानेवारी  2023 या कालावधीत भारताच्या दौऱ्यावर आहेत आणि 17 व्या प्रवासी भारतीय दिवसासाठी विशेष निमंत्रित आहेत.

या बैठकीत दोन्ही नेत्यांनी हायड्रोकार्बन, संरक्षण, सागरी सुरक्षा, डिजिटल उपक्रम , माहिती आणि  संपर्क तंत्रज्ञान आणि क्षमता बांधणी यांसारख्या परस्पर हिताच्या क्षेत्रांमधील सहकार्यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.

सुरीनामने घेतलेल्या कर्जाबाबत उद्भवलेल्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी भारताने केलेल्या पुनर्रचनेचे सुरीनामच्या अध्यक्षांनी कौतुक केले.

राष्ट्राध्यक्ष संतोखी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याशी चर्चा करणार असून  10 जानेवारी 2023 रोजी प्रवासी भारतीय दिवसाच्या समापन सत्राला आणि प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. इंदूरमध्ये होणाऱ्या जागतिक गुंतवणूकदार संमेलनाच्या उद्घाटन सत्रालाही ते उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर ते अहमदाबाद आणि नवी दिल्लीला भेट देतील.

 

* * *

N.Chitale/B.Sontakke/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1889834) Visitor Counter : 152