वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
तेराव्या भारत-अमेरिका व्यापार धोरण मंचात सहभागी होण्यासाठी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल 9-11 जानेवारी 2023 दरम्यान न्यूयॉर्क आणि वॉशिंग्टन डीसीला भेट देणार आहेत.
मंत्री गोयल अमेरिकेच्या व्यापार धोरण संबंधी (USTR) राजदूत कॅथरीन टाय यांचीही भेट घेतील आणि अमेरिकेच्या वाणिज्य सचिव जीना रायमोंडो यांच्याशी द्विपक्षीय बैठक घेतील
पीयूष गोयल न्यूयॉर्कमधील कार्यकारी अधिकारी सीईओ), उद्योजक, विचारवंत (थिंक टँक) आणि उद्योगांना भेट देतील
दोन्ही राष्ट्रांमधील व्यापार आणि गुंतवणुकीचे संबंध आणखी दृढ करण्यासाठी ही भेट महत्त्वपूर्ण ठरणार
Posted On:
08 JAN 2023 12:56PM by PIB Mumbai
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल भारत-अमेरिका व्यापार धोरण मंचात सहभागी सहभागी होण्यासाठी 9-11 जानेवारी 2023 दरम्यान न्यूयॉर्क आणि वॉशिंग्टन डीसीच्या अधिकृत भेटीवर जाणार आहेत.
दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात मंत्री नामांकित बहुराष्ट्रीय उद्योगांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संवाद साधतील, तसेच सामुदायिक कार्यक्रमात सहभागी होतील, यावेळी ते उद्योजक, व्यवसायिक आणि विचारवंत यांच्याशी गोलमेज बैठकांमध्ये सामील होतील आणि न्यूयॉर्कमधील विवीध उद्योगांना भेट देतील.
ते 11 जानेवारी 2023 रोजी वॉशिंग्टन डीसी येथे 13 व्या व्यापार धोरण मंचाच्या (TPF) बैठकीला उपस्थित राहतील. शिष्टमंडळ स्तरावरील चर्चेपूर्वी ते अमेरिकेच्या व्यापार धोरण संबंधी(USTR) राजदूत कॅथरीन टाय यांच्याबरोबर वन टू वन(प्रत्यक्ष) बैठक देखील घेतील.
23 नोव्हेंबर 2021 रोजी 12 वी व्यापार धोरण मंचाची (टीपीएफ) मंत्रीस्तरीय बैठक चार वर्षांच्या कालावधीनंतर नवी दिल्ली येथे झाली होती. गेल्या मंत्रिपदानंतर कार्यगट पुन्हा सक्रिय झालेआहेत. व्यापार धोरण मंच(TPF) हा दोन देशांमधील व्यापाराच्या क्षेत्रात सतत संलग्नता ठेवण्यासाठी आणि दोन्ही देशांमधील व्यापार आणि गुंतवणूक संबंधांना अधिक वृद्धिंगत करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करतआहे.या बैठकीसाठी दोन्ही देश उत्सुक आहेत आणि व्यापाराच्या मुद्द्यांवर प्रगती करण्याचा विश्वास व्यक्त करत आहेत. या व्यापार धोरण मंचाच्या बैठकीचे अध्यक्षपद भारताच्या वतीने वाणिज्य आणि उद्योग मंत्री तर अमेरिकेच्या वतीने अमेरिकेच्या व्यापार धोरण संबंधी(USTR) राजदूत भूषवतील.
वॉशिंग्टन डीसीमध्ये पियुष गोयल अमेरिकेच्या वाणिज्य सचिव जीना रायमोंडो यांच्याशी द्विपक्षीय बैठकही घेणार आहेत. तसेच ते काही उद्योगांच्या प्रमुखांसोबत संवाद साधतील.
भारत आणि अमेरिका हे दोन्ही देश पारंपारिक भागीदार आहेत आणि ते परस्परांशी व्यापारपूरक आहेत, त्यांच्यात दीर्घकालीन धोरणात्मक आणि आर्थिक संबंध आहेत, परसपर लोकांशी संपर्क आहे तसेच दोन्ही देश लोकशाहीचे पुरस्कर्ते आहेत. दोन्ही देश क्वाड (QUAD), आय2यू2 (I2U2) (इंडिया-इस्रायल/ युएइ-युएसए) आणि आयपीइएफ IPEF (इंडो-पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क) अंतर्गत देखील सहकार्य करत आहेत. नेतृत्व-स्तरावरील नियमित देवाणघेवाण हा विस्तारत असलेल्या द्विपक्षीय सहभागाचा अविभाज्य घटक आहे. या भेटींमधून पुढे येणारे सकारात्मक परिणाम दोन्ही देशांमधील बहुआयामी संबंध अधिक दृढ करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहेत.
****
M.Jaybhaye/V.Yadav/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1889562)
Visitor Counter : 233