संरक्षण मंत्रालय
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह अंदमान निकोबार द्वीप समूहांच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर रवाना
प्रविष्टि तिथि:
05 JAN 2023 12:16PM by PIB Mumbai
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज (5 जानेवारी 2023) अंदमान आणि निकोबार कमांड (एएनसी) च्या दोन दिवसीय भेटीसाठी नवी दिल्लीहून रवाना झाले. या भेटीदरम्यान, संरक्षण मंत्री कमांडच्या कार्य सज्जतेचा आणि कमांडच्या कार्यक्षेत्राच्या भागातील आणि बाहेरच्या क्षेत्रातील युनिट्सच्या (केंद्रांच्या) पायाभूत सुविधांच्या विकासाचा आढावा घेतील.
संरक्षण मंत्री कॅम्पबेल बे, कार्निक आणि दिगलीपूर इथल्या एएनसी युनिट्सला देखील भेट देतील आणि या ठिकाणी तैनात लष्कराच्या जवानांशी संवाद साधतील.
****
सुवर्णा बेडेकर/ राजश्री आगाशे/सी.यादव
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1888821)
आगंतुक पटल : 181