ऊर्जा मंत्रालय

एचपीसीएल रिफायनरीज आणि इतर व्यावसायिक युनिट्ससाठी अक्षय ऊर्जा व्यवसाय आणि हरित ऊर्जेकरिता एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड आणि एचपीसीएल दरम्यान सामंजस्य करार

Posted On: 04 JAN 2023 9:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 जानेवारी 2023

 

एनजीईएल आणि एचपीसीएलसाठी अक्षय ऊर्जा प्रकल्पांच्या विकासाच्या क्षेत्रात सहयोग आणि सहकार्य करण्यासाठी सामंजस्य करार हे पहिले पाऊल आहे जे एचपीसीएलला त्याच्या स्वच्छ ऊर्जा वचनबद्धतेची पूर्तता करण्यात मदत करेल.

अक्षय ऊर्जा क्षेत्रातील व्यवसाय संधींचा धांडोळा घेण्यासाठी आणि एचपीसीएलच्या ऊर्जा गरजेसाठी अव्याहत 400 मेगावॅट चा अक्षय ऊर्जा पुरवठा करण्याकरिता अक्षय ऊर्जा आधारित ऊर्जा प्रकल्पांच्या विकासासाठी एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड (एनजीईएल) ने 03-01-2023 रोजी नवी दिल्ली येथे हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) सह सामंजस्य करारावर (एमओयू) स्वाक्षरी केली आहे. या सामंजस्य करारावर एनजीईएलचे वित्त प्रमुख नीरज शर्मा आणि एचपीसीएलचे जैवइंधन आणि अक्षय ऊर्जा कार्यकारी संचालक शुभेंदू गुप्ता यांनी स्वाक्षरी केली.

या सामंजस्य करारावर एनटीपीसी चे मुख्य व्यवस्थापकीय संचालक गुरदीप सिंग, एनटीपीसी चे वाणिज्यिक संचालक सी. के. मंडोल, एनटीपीसी चे वित्त संचालक जे श्रीनिवासन, एनजीइएल चे मुख्य कार्यकारी अधिकारी मोहित भार्गव, एचपीसीएल चे कार्यकारी संचालक- सीएसपी आणि बीडी डी. के. शर्मा, एचपीसीएल चे मुख्य महाव्यवस्थापक कुशल बॅनर्जी आणि एनटीपीसी आरईएल चे मुख्य महाव्यवस्थापक राजीव गुप्ता यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आली.

हा सामंजस्य करार एनजीइएल आणि एचपीसीएल साठी नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांच्या विकासाच्या क्षेत्रात सहयोग आणि सहकार्य करण्यासाठी पहिले पाऊल आहे जे एचपीसीएल ला स्वच्छ ऊर्जा वचनबद्धतेची पूर्तता करण्यास मदत करेल.

 

* * *

S.Patil/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1888715) Visitor Counter : 135


Read this release in: Kannada , English , Urdu , Telugu