सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मेड इन इंडिया तंत्रज्ञानाच्या महत्त्वाचा पुनरूच्चार करत केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) मंत्री नारायण राणे यांनी केले इंटेलिजंट ट्रे रिट्रीव्हल सिस्टम (आयटीआरएस) चे उद्घाटन

Posted On: 04 JAN 2023 8:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 जानेवारी 2023

 

केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) मंत्री नारायण राणे यांनी आज मेसर्स एसजेके इनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने तयार केलेल्या इंटेलिजेंट ट्रे रिट्रीव्हल सिस्टम (आयटीआरएस) चे दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन  केले. गोव्यात मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही प्रणाली स्थापन केली आहे आणि एसजेके इनोव्हेशन्स या मेक इन इंडिया एमएसएमई कंपनीने ही प्रणाली विकसित केली आहे. आयटीआरएस ही कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित पूर्णपणे स्वयंचलित मशीन आहे. हे मशीन प्रगत स्क्रीनिंग तंत्रज्ञानासह प्रवासी सुरक्षा प्रदान करण्यासाठी मदत करते. ते प्रगत साधनांसह प्रतिमा विश्लेषण सॉफ्टवेअरसह सुसज्ज आहे. त्यामुळे स्क्रीनरला प्रत्येक सामानाबाबत योग्य निर्णय घेणे सोपे जाते. यामुळे पारंपरिक मशिन्सच्या तुलनेत अधिक जलद आणि सोप्या पद्धतीने स्क्रीनिंग पूर्ण करायला मदत होते. मशिनमध्ये उच्च धोक्याच्या सामानासाठी एक समर्पित मॉड्यूल देखील आहे. त्याकडे विमानतळावर त्वरित लक्ष देणे आवश्यक आहे. आयटीआरएस मशीन प्रवाशांना विमानतळावर हँड बॅगेजच्या तपासणीदरम्यान अनोखा अनुभव देते.

जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पंतप्रधान सातत्याने करत असलेल्या प्रयत्नांचा पुनरुच्चार राणे यांनी यावेळी केला.

“गोव्यासाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि वाहतूक सुविधा असलेले मोठे विमानतळ व्हावे, अशी आमची गेल्या अनेक वर्षांपासून मागणी आहे. 11 डिसेंबर 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवंगत सहकारी मनोहर पर्रिकर यांचे नाव दिलेल्या गोव्याच्या मोपा या विमानतळाचे उद्घाटन केले. आणखी एक आनंददायी बाब म्हणजे मोप्यात आज स्थापित झालेली आयटीआरएस  प्रणाली एका एमएसएमई कंपनीची  'मेड इन इंडिया' प्रणाली आहे आणि तिला भारतात पेटंट देखील प्राप्त आहे. आमच्यासाठी ही दुहेरी अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे.”, असे नारायण राणे म्हणाले.

 

* * *

S.Patil/P.Jambhekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1888673) Visitor Counter : 177


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu