खाण मंत्रालय
हिंदुस्तान कॉपर कंपनीने केला त्रिपक्षीय वेतन करार
Posted On:
04 JAN 2023 5:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 जानेवारी 2023
केंद्रीय खाण मंत्रालयाच्या अखत्यारीतील केंद्रीय सार्वजनिक उपक्रम असलेल्या हिंदुस्तान कॉपर या मिनिरत्न 1 श्रेणीच्या कंपनीने कामगारांचे वेतन आणि इतर भत्ते यांच्यात सुधारणा करण्यासाठी त्रिपक्षीय आठवा वेतन करार केला आहे. कोलकात्याच्या उप मुख्य कामगार आयुक्त (केंद्रीय) रूपा भारत यांच्या उपस्थितीत 3 जानेवारी 2023 रोजी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

हिंदुस्तान कॉपर कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अरुण कुमार शुक्ला, परिचालन विभागाचे संचालक संजय पंजियार, खनन विभागाचे संचालक संजीव कुमार सिंग, कंपनीचे अर्थ संचालक घनश्याम शर्मा तसेच हिंदुस्तान कॉपर कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कंपनीचे महाराष्ट्रातील टीसीपी युनिट (आयएनटीयुसी) राजस्थानातील केसीसी युनिट(एआयटीयुसी), मध्य प्रदेशातील एमसीपी युनिट (बीएमएस), झारखंडमधील आयसीसी युनिट (एआयटीयुसी) आणि कोलकाता यथील कॉर्पोरेट कार्यालय (आयएनटीटीयुसी) यांतील मान्यताप्राप्त कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी 01 नोव्हेंबर 2017 पासून 10 वर्षांसाठी लागू असलेल्या या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
* * *
S.Patil/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1888603)
Visitor Counter : 177