अर्थ मंत्रालय

प्रसिद्धीपत्रक


‘6.65% खते कंपन्यासाठीचे विशेष सरकारी रोखे 2023’ मधील रकमेची परतफेड

Posted On: 04 JAN 2023 2:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 जानेवारी 2023

 

‘6.65% खत कंपन्यांसाठी  जारी करण्यात आलेले विशेष सरकारी रोखे 2023’च्या शिल्लक थकबाकीची रक्कम कंपन्यांना  27 जानेवारी, 2023 रोजी होणे (28 आणि 29 जानेवारी 2023 या दिवशी अनुक्रमे शनिवार आणि रविवार येत असल्यामुळे) विहित आहे.विहित तारखेनंतरसंबंधित  रकमेवर कोणतेही व्याज जमा होणार नाही.परतफेड करण्याच्या दिवशी,  कोणत्याही राज्य सरकारला सुटी जाहीर करावी लागली तर निगोशिएबल इन्स्ट्रुमेन्ट्स कायदा 1881 नुसार त्या राज्य सरकारच्या भरणा कार्यालयांकडून विहित तारखेच्या आदल्या दिवशी थकबाकी दिली जाईल.

सरकारी रोखे नियमन 2007 मधील उप-नियम 24(2) आणि 24(3) नुसार,  सरकारी रोखे ज्याच्याकडे आहेत त्या नोंदणीकृत कंपनीकडे अनुदानविषयक सामान्य खातेवही किंवा घटक अनुदानविषयक खातेवही किंवा शेअर प्रमाणपत्र या स्वरुपात असल्यास संबंधित परिपक्वता रकमेचा भरणा त्या खातेदाराला त्याच्या बँकेचे तपशील सादर केल्यानंतर पेऑर्डरच्या स्वरूपात अथवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने रक्कम हस्तांतरित करण्याची सुविधा असलेल्या बँकेच्या खात्यात थेट जमा करून देण्यात येईल. रोख्यांच्या संदर्भातील रकमेचा भरणा करण्यासाठी सरकारी रोख्यांचा मूळ ग्राहक किंवा नंतरचे धारक यांनी आगाऊ स्वरुपात त्यांच्या बँक खात्याचे तपशील सादर करणे आवश्यक आहे.

मात्र, संबंधित बँक खात्याचा तपशील किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने रक्कम हस्तांतरित करण्यासाठी आवश्यक आदेश दिलेला नसेल तर अशा परिस्थितीत कर्जाची परतफेड नियत तारखेला सुलभतेने होण्यासाठी, धारकाने परतफेडीच्या नियत तारखेच्या 20 दिवस अगोदर सार्वजनिक डेट कार्यालये, कोषागार/उपकोषागार तसेच भारतीय स्टेट बँकेच्या शाखा (जेथे धारकाने व्याज मिळण्यासाठी मुखांकित अथवा नोंदणी केलेली असेल ती शाखा)  या ठिकाणी परतफेडीसाठी योग्य निकषांची पूर्तता केलेले रोखे जमा करावेत.

रोख्यांची संपूर्ण रक्कम मिळण्यासाठीच्या प्रक्रियेचे संपूर्ण तपशील उपरोल्लेखित कोणत्याही भरणा कार्यालयातून मिळवता येतील.

 

* * *

Jaydevi PS/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1888518) Visitor Counter : 167