दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

भारताकडे आशियाई प्रशांत टपाल संघटनेचे नेतृत्व

Posted On: 03 JAN 2023 7:39PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 3 जानेवारी 2023

 

भारत या महिन्यापासून थायलंडमधील बँकॉक येथे मुख्यालय असलेल्या आशियाई प्रशांत टपाल संघटनेचे (एपीपीयू) नेतृत्व स्वीकारणार आहे. बँकॉक येथे ऑगस्ट-सप्टेंबर 2022 दरम्यान झालेल्या 13व्या एपीपीयू काँग्रेसच्या यशस्वी निवडणुकांनंतर, टपाल सेवा मंडळाच्या सदस्य (कार्मिक), डॉ. विनया प्रकाश सिंग 4 वर्षांच्या कार्यकाळासाठी संघटनेच्या महासचिवपदाचा कार्यभार स्वीकारतील. 

आशियाई प्रशांत टपाल संघटना (एपीपीयू) ही आशियाई-प्रशांत प्रदेशातील 32-सदस्य देशांची आंतरशासकीय संस्था आहे. संयुक्त राष्ट्रांची विशेष संस्था असलेल्या युनिव्हर्सल पोस्टल युनियनची (यूपीयू), एपीपीयू ही एकमेव प्रदेशांशी बांधील निर्बंधयुक्त  संघटना आहे. सदस्य देशांमधील टपाल संबंध वाढवणे, सुलभ करणे आणि सुधारणे तसेच टपाल सेवा क्षेत्रात सहकार्य वाढवणे हे एपीपीयूचे उद्दिष्ट आहे. विविध यूपीयू प्रकल्पांसाठी प्रादेशिक केंद्र म्हणून, यूपीयूचे सर्व तांत्रिक आणि कार्यान्वित प्रकल्प या प्रदेशात पूर्ण होतात ना? जेणेकरून हा प्रदेश जागतिक टपाल जाळ्यामधे शक्य तितक्या चांगल्या प्रकारे एकत्रित केला जाईल हे सुनिश्चित करण्यात एपीपीयू पुढाकार घेते. संघटनेच्या कामकाजाचे नेतृत्व महासचिव करतात आणि आशियाई प्रशांत टपाल महाविद्यालयाचे (एपीपीसी) संचालक देखील आहेत. एपीपीसी या प्रदेशातील सर्वात मोठी आंतरशासकीय टपाल प्रशिक्षण संस्था आहे.

 

* * *

S.Patil/V.Ghode/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1888410) Visitor Counter : 255