राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रपतींचा राजस्थान दौरा; जयपूर राजभवन येथे संविधान उद्यानाचे केले उद्घाटन; दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून केले राजस्थानमधील सौर ऊर्जा क्षेत्रांसाठीच्या पारेषण प्रणालीचे उद्घाटन आणि 1000 मेगावॅटच्या बिकानेर सौर ऊर्जा प्रकल्पाची पायाभरणी

Posted On: 03 JAN 2023 4:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 3 जानेवारी 2023

 

राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मु यांनी आज (3 जानेवारी 2023) जयपूरात राजभवन येथे संविधान उद्यान, मयूर स्तंभ, राष्ट्रीय ध्वज चौकी, महात्मा गांधी आणि महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यांचे अनावरण केले. या प्रसंगी, त्यांनी राजस्थानमधील सौर ऊर्जा क्षेत्रांसाठीच्या पारेषण प्रणालीचे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन केले तर एसजेव्हीएन लिमिटेडच्या 1000 मेगावॅटच्या बिकानेर सौर ऊर्जा प्रकल्पाची पायाभरणी केली.

आपली लोकशाही चैतन्याने सळसळती  असून जगातील सर्वात मोठी आहे.  आपली राज्यघटना हा या महान लोकशाहीचा पाया आहे असे त्या यावेळी म्हणाल्या. या कार्यक्रमात सहभागी होऊन संविधान निर्मात्यांना अभिवादन करण्याची संधी मिळाल्याचे त्यांनी सांगितले. कृतज्ञ राष्ट्राच्या वतीने भारतीय राज्यघटनेच्या शिल्पकारांना त्यांनी अभिवादन केले.

उद्यानात प्रदर्शित केलेला संविधान निर्मितीच्या तीन वर्षांचा ऐतिहासिक प्रवास कलात्मक पद्धतीने साकारल्याबद्दल राष्ट्रपतींनी कलाकारांचे कौतुक केले. आपल्या आधुनिक इतिहासाचा एक महत्त्वाचा अध्याय सुबक चित्रे, शिल्पे आणि इतर कलाप्रकारांच्या माध्यमातून संविधान उद्यानात मांडला गेल्याचे त्या म्हणाल्या.

आपल्या संविधान निर्मात्यांनी समाजातील प्रत्येक घटकाप्रती संवेदनशीलता आणि लोकशाहीच्या प्रत्येक स्तरावर तसेच प्रशासनाच्या प्रत्येक पैलूंबद्दल जागरुकता राखत सर्वसमावेशक संविधानाची निर्मिती केली. आपल्या राज्यघटनेच्या द्रष्ट्या शिल्पकारांनी भावी पिढ्यांच्या गरजेनुसार व्यवस्था निर्माण करण्याच्या अधिकारांबद्दलचा विचार स्पष्ट केला होता.  त्यामुळेच घटनादुरुस्तीच्या तरतुदीही घटनेतच समाविष्ट करण्यात आल्या होत्या.  आतापर्यंत एकूण 105 सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आपली राज्यघटना हा एक जिवंत दस्तऐवज आहे जो काळानुरूप लोकांच्या बदलत्या आशा आणि आकांक्षा स्वीकारण्यास आणि त्यांचा अंतर्भाव करण्यास पूर्णपणे सक्षम आहे.

राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा 

 

* * *

S.Patil/V.Ghode/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1888338) Visitor Counter : 249