रेल्वे मंत्रालय
या आर्थिक वर्षात डिसेंबर 2022 पर्यंत मालवाहतुकीतून रेल्वेने 120478 कोटी रुपये उत्पन्न मिळवले
गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत मालवाहतुकीचे उत्पन्न 16% ने वाढले आहे.
डिसेंबर 2022 पर्यंत रेल्वेने 1109.38 मेट्रिक टन मालवाहतूक केली
Posted On:
02 JAN 2023 5:53PM by PIB Mumbai
गेल्या वर्षी केलेल्या मालवाहतुकीच्या तुलनेत यावर्षी 8% म्हणजे 1029.96 मेट्रिक टन वाढ झाली आहे.
भारतीय रेल्वेच्या मालवाहतुकीने, मिशन मोडनुसार 2022-23 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत गेल्या वर्षीच्या याच कालावधीत मिळवलेल्या उत्पन्नाची मर्यादा ओलांडली.
एप्रिल ते 2022 डिसेंबर या कालावधीत रेल्वेने एकत्रित आधारावर 1109.38 मेट्रिक टन मालवाहतूक केली, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत 8% नी जास्त आहे. मागच्या वर्षी याच कालावधीत रेल्वेने 1029.96 मेट्रिक टन मालवाहतूक केली होती. गेल्या वर्षीच्या 1,04,040 कोटी रुपयांच्या तुलनेत रेल्वेने यावर्षी 1,20,478 कोटी रुपयांची कमाई केली आहे जी गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 16% नी जास्त आहे.
डिसेंबर 2022 या महिन्यात 130.66 मेट्रिक टन मूळ मालवाहतूक केली जी मागच्या वर्षीच्या तुलनेत 3% नी जास्त आहे. डिसेंबरमध्ये 20210 मध्ये 126.8 मेट्रिक टन इतकी मूळ मालवाहतूक झाली होती. मालवाहतुकीचा महसूल डिसेंबरच्या 2021 त्या मालवाहतुकीच्या 12,914 कोटी रुपये कमाईच्या तुलनेत 14,573 कोटींची कमाई झाली आहे, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत 13% ने वाढलेली आहे.
“हंग्री फॉर कार्गो” या मंत्राला अनुसरून, भारतीय रेल्वेने व्यवसायात सुलभता आणण्यासाठी तसेच स्पर्धात्मक किमतीत सेवा वितरणात सुधारणा करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले आहेत ज्यामुळे पारंपरिक आणि अपारंपरिक अशा दोन्ही प्रकारच्या व्यापार वस्तू प्रवाहातून रेल्वेकडे नवीन वाहतुकीचा ओघ येत आहे. ग्राहक केंद्रित दृष्टीकोन आणि लवचिक धोरण बनवण्याद्वारे समर्थित व्यवसाय विकास घटकांच्या कार्यामुळे रेल्वेला हे महत्त्वपूर्ण यश साध्य करण्यासाठी मदत झाली.
***
S.Patil/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1888089)