विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

स्टार्ट-अप्सना बहुआयामी सहाय्य पुरवण्यासाठी केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी दिल्लीतील राष्ट्रीय संशोधन विकास महामंडळ मुख्यालयात "इन्क्युबेशन सेंटर" चे केले उद्घाटन

Posted On: 31 DEC 2022 7:00PM by PIB Mumbai

 

 

केंद्रीय राज्यमंत्री विज्ञान आणि तंत्रज्ञान (स्वतंत्र प्रभार) डॉ जितेंद्र सिंह यांनी स्टार्टअप्सना बहुआयामी सहाय्य पुरवण्यासाठी दिल्लीतील राष्ट्रीय संशोधन विकास महामंडळ येथे "इन्क्युबेशन सेंटर" चे उद्घाटन केले.

महामंडळ  स्टार्टअप्सना आयपी फाइलिंग सहाय्य, एनआरडीसी मुख्यालय, सीएसआयआर-एनएल आणि सीएसआयआर-आयएमएमटीयेथे इन्क्यूबेटरद्वारे स्टार्ट-अप्सना पाठबळ देण्यासाठी इन्क्युबेशन सहाय्य, प्राथमिक टप्प्यातील स्टार्टअप्सना तंत्रज्ञान विकास निधी, सीड फंडिंग, स्टार्ट-अप्सना मान्यता देण्यासाठी उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाबरोबर संलग्नता  तसेच स्टार्ट-अप्सना मार्गदर्शन आणि देखरेख ठेवण्यासाठी आयओसीएल  सह सहभाग यासारख्या विविध उपक्रमांद्वारे स्टार्ट-अप्सना सहाय्य पुरवले जात आहे हे डॉ जितेंद्र सिंह यांनी निदर्शनास आणून दिले.

डॉ जितेंद्र सिंह यांनी राष्ट्रीय संशोधन विकास महामंडळाच्या चमूला राष्ट्रीय स्तरीय सुविधा स्थापन करण्यासाठी सर्वसमावेशक दृष्टीकोन अवलंबण्याचे आवाहन केले , जे देशातील वाढत्या  स्टार्ट-अप परिसंस्थेच्या  सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी एकाच ठिकाणी उपाययोजना प्रदान करेल. भारतीय तंत्रज्ञानासाठी जागतिक बाजारपेठ शोधण्यासाठी, महामंडळाने विशेषत: आफ्रिकन आणि आशियाई देशांना हब आणि स्पोक मॉडेलद्वारे तंत्रज्ञान हस्तांतरण सेवा प्रदान करण्याचे उद्दिष्ट ठेवले पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.

डॉ जितेंद्र सिंह म्हणाले, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभागाअंतर्गत सरकारी उपक्रम म्हणून, एनआरडीसी तंत्रज्ञान मूल्यांकन, मूलभूत अभियांत्रिकी, बाजार सर्वेक्षण इत्यादीसारख्या विविध मूल्यवर्धन उपक्रमांद्वारे बौद्धिक संपदा अधिकार सुरक्षित ठेवण्यावर लक्ष केंद्रित करते आणि भारताला खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर बनवण्यासाठी आपले योगदान देते.

एनआरडीसीने स्टार्ट-अप्सना इनक्यूबेट करण्यासाठी सुविधा निर्माण केल्या आहेत तसेच स्टार्ट-अप्सना निधी, मार्गदर्शन, आयपी सहाय्य आणि इतर संबंधित सेवांच्या बाबतीत मदत पुरवण्यासाठी हितकारक योजनांना प्रोत्साहन देखील देत आहे. गेल्या एका वर्षात, महामंडळाने तीन इनक्युबेशन सेंटर आणि एक आउटरीच सेंटर स्थापन केले आहे. एनआरडीसीने नागरी वापरासाठी संरक्षण आणि आण्विक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पाऊल टाकले आहे. मेड-इन-इंडियाला पाठिंबा देण्याच्या उद्देशाने, महामंडळाने भारतीय तंत्रज्ञानासाठी जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठीयुएसपीटीओ, एएआरडीओ सह पररष्टर सहकार्य प्रस्थापित केले आहे. तसेच, एनआरडीसी हे संशोधन आणि विकास संस्था आणि उद्योग यांच्यात उत्प्रेरक ठरत आहे आणि गेल्या पाच वर्षांत 220 संशोधन आणि विकास संस्था आणि विद्यापीठांशी सामंजस्य करार केला आहे. स्टार्टअप्सना वन स्टॉप शॉप उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रीय तंत्रज्ञान हस्तांतरण संस्था स्थापन करण्याच्या उद्देशाने आणि आंतरराष्ट्रीय विपणन विभागाच्या स्थापनेसह, राष्ट्रीय संशोधन विकास महामंडळ भविष्यातल्या भव्य विस्तारासाठी सज्ज आहे.

***

N.Chitale/S.Kane/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1887776) Visitor Counter : 228