पंतप्रधान कार्यालय
गुजरातमधील नवसारी इथे रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीमुळे पंतप्रधान शोकग्रस्त
अपघातग्रस्तांना पीएमएनआरएफमधून सानुग्रह मदत जाहीर
प्रविष्टि तिथि:
31 DEC 2022 10:37AM by PIB Mumbai
गुजरातेतील नवसारी इथे रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. मोदी यांनी ‘प्रधान मंत्री राष्ट्रीय मदत निधी’- (पीएमएनआरएफ) –तून अपघातग्रस्तांना सानुग्रह मदत देण्याचे जाहीर केले आहे.
नवसारी इथे रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीमुळे शोकग्रस्त असल्याचे सांगून पंतप्रधानांनी आपण मृतांच्या कुटुंबांच्या दुःखात सामील आहोत असे ट्विटर संदेशात म्हटले आहे. तसेच, जखमींच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. मृतांच्या कुटुंबाला प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत ‘पीएमएनआरएफ’मधून दिली जाईल, असे पंतप्रधानांनी सांगितले.
पंतप्रधानांचा ट्वीट संदेश पुढीलप्रमाणे,
***
Samarjit T/R. Bedekar/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1887703)
आगंतुक पटल : 221
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam