पंतप्रधान कार्यालय
राष्ट्रीय गंगा परिषदेला पंतप्रधानांची दूरदृश्य माध्यमातून उपस्थिती
Posted On:
30 DEC 2022 10:21PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय गंगा परिषदेच्या आज (30 डिसेंबर) झालेल्या बैठकीचे अध्यक्षपद दूरदृश्य माध्यमातून भूषवले.
नमामि गंगे अभियान अधिक परिणामकारक करण्यासाठी ही चर्चेची चांगली संधी असल्याचे पंतप्रधान म्हणाले. लहान शहरांमध्ये मैला व सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या व्यवस्थांची व्याप्ती वाढवण्यासह स्वच्छता राखण्यासाठीच्या प्रयत्नांत वाढ करण्याच्या विविध पर्यायांबाबत परिषदेत चर्चा झाली.
गंगेच्या काठावर औषधी वनस्पतींची शेती करण्याच्या मुद्द्यावर पंतप्रधानांनी या बैठकीत भर दिला. आपल्या ट्विटर संदेशात पंतप्रधानांनी या बाबींचा उल्लेख केला आहे. तसेच, नदीच्या काठावर पर्यटनाला चालना देणाऱ्या पायाभूत सुविधांच्या उभारणीची गरज व्यक्त करून त्यामुळे लोकांना उपजीविकेच्या संधी मिळतील, असे म्हटले आहे.
जल, आरोग्य, स्वच्छतेशी संबंधित विविध प्रकल्पांची पायाभरणी व लोकार्पण पंतप्रधानांनी यावेळी दूरदृश्य माध्यमातून केले.
पंतप्रधान ट्वीट संदेशात म्हणाले:
***
Samarjit T/R. Bedekar/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1887685)
Visitor Counter : 222
Read this release in:
Kannada
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam