संरक्षण मंत्रालय
संपूर्ण जगाला भारताच्या लष्करी ताकदीचा परिचय झाला आहे : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
Posted On:
30 DEC 2022 8:50PM by PIB Mumbai
शिवगिरी मठाचे नारायण गुरु यांच्या ‘उद्योगातून समृद्धी’' यावर आधारित ‘आत्मनिर्भर भारत’ बनविण्यासाठी केंद्र सरकारने केलेल्या प्रयत्नांमुळे आता संपूर्ण जगाला भारताच्या लष्करी सामर्थ्याचा चांगलाच परिचय झाला आहे, असे प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज केले. ते केरळमधील नारायण गुरू शिवगिरी मठ येथे आयोजित तीर्थदानम महोत्सवासाठी जमलेल्या संत आणि ज्येष्ठ विद्वान मंडळींसमोर बोलत होते.
संत सैनिक संकल्पनेला चालना देत राजनाथ सिंह म्हणाले की, संरक्षण मंत्री या नात्याने ते सैनिकांच्या शौर्य आणि पराक्रमाच्या बळावर देशाच्या भौगोलिक सीमा सुरक्षित करत आहेत, त्याचप्रमाणे संत सैनिक देशाच्या संस्कृतीचे रक्षण करत आहेत.
स्वावलंबन हा भारताच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे, असे सांगून राजनाथ सिंह पुढे म्हणाले की, नारायण गुरुजींनी आपल्या शिकवणीतून स्वावलंबनाचा हा संदेश जनमानसात पोहोचवला आणि आज शिवगिरी मठही तो अखंडपणे पुढे नेण्याचे काम करत आहे.
***
S.Kane/S.Bedekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1887651)
Visitor Counter : 185