सहकार मंत्रालय

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते कर्नाटकमधील मंड्या येथे मेगा डेअरीचे उद्घाटन

Posted On: 30 DEC 2022 6:20PM by PIB Mumbai

 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज कर्नाटकात मंड्या येथे मेगा डेअरीचे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन केले. यावेळी मंड्या येथील आदिचुंचनागिरी महासंस्थान मठाचे 72वे मठाधिपती निर्मलानंदनाथ महास्वामीजी, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा आणि केंद्रीय संसदीय कामकाज आणि कोळसा आणि खाण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते

उद्घाटन करण्यात आलेल्या मेगा डेअरीसाठी 260 कोटी रुपये खर्च आला असून तिथे दररोज 10 लाख लिटर दुधावर प्रक्रिया करण्याची क्षमता असून ही क्षमता 14 लाख लिटर पर्यंत वाढवता येऊ शकते, असे केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले. ज्यावेळी 10 लाख लीटर दुधावर प्रक्रिया होईल, त्यावेळी लाखो शेतकऱ्यांपर्यंत समृद्धी पोहोचेल, असे ते म्हणाले. कर्नाटकात सहकारी दुध चळवळ चांगल्या प्रकारे सुरू आहे, असे शाह म्हणाले. कर्नाटकात गाव पातळीवर 15,210 सहकारी दूध डेअऱ्या आहेत, ज्यामध्ये सुमारे 26.22 लाख शेतकऱ्यांकडून आलेले दूध दररोज संकलित केले जाते आणि जिल्हा स्तरावरील 16 डेअऱ्यांच्या माध्यमातून दररोज 26 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 28 कोटी रुपये जमा होतात

केंद्रीय सहकार मंत्री म्हणाले की गुजरात मध्ये धवलक्रांतीने शेतकऱ्यांचे नशीब बदलले आणि अमूलच्या माध्यमातून दर वर्षी 36 लाख महिलांच्या बँक खात्यात 60,000 कोटी रुपये जमा करण्यात येतात.

कर्नाटकमधील प्रत्येक गावात प्राथमिक डेअरी स्थापन करण्यासाठी अमूल आणि नंदिनी एकत्र काम करतील आणि पुढील तीन वर्षात कर्नाटकमधील एकही गाव असे नसेल जिथे प्राथमिक डेअरी नाही अशी हमी आपण सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींना देत आहे, असे ते म्हणाले.

देशभरातील दूधउत्पादक शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी गुजरात आणि कर्नाटक एकत्र काम करू शकतात, असे त्यांनी सांगितले.

***

S.Kane/S.Patil/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1887590) Visitor Counter : 198