वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
आर्थिक वर्ष 22-23 च्या एप्रिल-नोव्हेंबर या कालावधीत कृषी आणि प्रक्रिया-युक्त खाद्य उत्पादनांची निर्यात 16 टक्क्यांनी वाढून 17.43 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी झाली
Posted On:
30 DEC 2022 6:02PM by PIB Mumbai
चालू आर्थिक वर्ष 2022-23 च्या सुरुवातीच्या आठ महिन्यांत (एप्रिल-नोव्हेंबर) कृषी आणि प्रक्रिया -युक्त खाद्य उत्पादनांची निर्यात आर्थिक वर्ष 2021-22 च्या याच कालावधीच्या तुलनेत 16 टक्क्यांनी वाढली आहे.
वाणिज्य गुप्तवार्ता आणि सांख्यिकी महासंचालकानीं दिलेल्या अंदाजित आकडेवारीनुसार, एप्रिल-नोव्हेंबर 2022 दरम्यान कृषी आणि प्रक्रिया -युक्त खाद्य उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाच्या (APEDA) उत्पादनांची एकूण निर्यात अमेरिकन डॉलर्समध्ये 16 टक्क्यांनी वाढली आहे.गेल्या आर्थिक वर्षातील याच कालावधीतील 15.07 अब्ज अमेरिकन डॉलर्स वरून ती 17.43 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी झाली आहे.
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणार्या कृषी आणि प्रक्रिया –युक्त खाद्य उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाने हाती घेतलेल्या नव्या योजनांमुळे चालू वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यांत एकूण निर्यात उद्दिष्टांच्या 74 टक्के इतकी साध्य करण्यात मदत झाली आहे.
वाणिज्य गुप्तवार्ता आणि सांख्यिकी महासंचालकानीं दिलेल्या आकडेवारीनुसार, प्रक्रिया युक्त फळे आणि भाज्यांनी 32.60 टक्के (एप्रिल-नोव्हेंबर 2022) वाढ नोंदवली, तर ताज्या फळांनी मागील वर्षाच्या याच महिन्यांच्या तुलनेत चार टक्के वाढ नोंदवली.
तसेच, कडधान्ये आणि विविध प्रक्रिया -युक्त अन्न उत्पादनांमध्ये मागील वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यांच्या तुलनेत 28.29 टक्के वाढ नोंदवली गेली.
गेल्या आर्थिक वर्षातील याच महिन्यांच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षाच्या आठ महिन्यांत डाळींच्या निर्यातीत 90.49 टक्के वाढ झाली आहे.
India’s Export Comparative Statement: APEDA Products
|
Product Head
|
April-Nov, 2021
|
April-Nov, 2022
|
% Change (April-Nov, 2022)
|
USD Million
|
Fruits & Vegetables
|
954
|
991
|
3.90
|
Cereal preparations & Miscellaneous processed items
|
2232
|
2863
|
28.29
|
Meat, dairy & poultry products
|
2665
|
2709
|
1.65
|
Basmati Rice
|
2063
|
2873
|
39.26
|
Non Basmati Rice
|
3930
|
4109
|
4.57
|
Other products
|
3228
|
3890
|
17
|
Total
|
15072
|
17435
|
15.68
|
Source: DGCIS Principal commodities data April-November, 2022) (Provisional data)
***
S.Kane/S.Patgaonkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1887583)
Visitor Counter : 194