आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 अद्यायावत माहिती
चीन, हाँगकाँग, जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर आणि थायलंड येथून भारताकडे प्रवास करणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांनी प्रस्थान करण्यापूर्वी आरटीपीसीआर चाचणी करुन घेणे अनिवार्य, 1 जानेवारी 2023 पासून हवाई सुविधा पोर्टलवर त्याबाबतचा अहवाल प्रवासाआधी अपलोड करावा लागणार
भारतात येणाऱ्या 2% आंतरराष्ट्रीय प्रवाशांची चाचणी करण्याव्यतिरिक्तचे हे पाऊल
Posted On:
29 DEC 2022 5:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 डिसेंबर 2022
चीन, हाँगकाँग, जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर आणि थायलंड येथून भारतात प्रवास करणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना संबंधित देश/गंतव्यस्थान येथून निघण्यापूर्वी आरटीपीसीआर चाचण्या करणे अनिवार्य असेल आणि 1 जानेवारी 2023 पासून आरटीपीसीआर चाचणीचा कोविड निगेटिव्ह अहवाल हवाई सुविधा पोर्टलवर अपलोड करावा लागेल. भारतासाठीचा प्रवास सुरू करण्याआधी 72 तासांच्या आत ही चाचणी करावी.
भारतात येणाऱ्या 2% आंतरराष्ट्रीय प्रवाशांची चाचणी करण्याव्यतिरिक्तचे हे पाऊल आहे असे आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने आज जारी केलेल्या एका पत्रकात म्हटले आहे.
जगभरातील, विशेषतः उपरोक्त देशांमधील, वाढत असलेल्या कोविड-19 परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ही खबरदारी घेतली जात आहे.
* * *
G.Chippalkatti/V.Ghode/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1887342)
Visitor Counter : 332