इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान तसेच कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर केरळमधील थामरसेरी येथे युवा भारतीय आणि विद्यार्थ्यांशी साधणार संवाद


प्रविष्टि तिथि: 29 DEC 2022 2:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 डिसेंबर 2022

 

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान तसेच कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर महिन्याभरात दुसऱ्यांदा केरळला भेट देणार आहेत. या भेटीत ते विद्यार्थी आणि युवा भारतीयांशी संवाद साधणार आहेत. शुक्रवारी ते केरळमधील कोझिकोड या दक्षिणेकडील किनारपट्टीवरील शहराच्या दौऱ्यात दोन कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.

थामरसेरी येथील कॅथोलिक बिशप हाउसच्या परिसरात ‘न्यू इंडिया फॉर यंग इंडिया- टेकएड ऑफ ऑपॉर्च्युनिटीज’(Techade) या उपक्रमांतर्गत आयोजित कार्यक्रमात राजीव चंद्रशेखर केरळमधील 20 महाविद्यालयांतील 1000 हून अधिक विद्यार्थी आणि तरुणांशी संवाद साधतील. भारताची डिजिटल अर्थव्यवस्था झपाट्याने विस्तारत असताना, नवीन नोकऱ्या आणि उद्योजकतेच्या संधी निर्माण करत आहे. तरुण भारतीयांना डिजिटल क्षेत्रात नवकल्पनांचे मार्ग शोधण्यासाठी प्रोत्साहित करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.

 

* * *

G.Chippalkatti/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1887272) आगंतुक पटल : 192
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Tamil , Telugu , Kannada , Malayalam