युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

वर्ष अखेर आढावा: युवा व्यवहार विभाग

Posted On: 26 DEC 2022 11:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 डिसेंबर 2022

 

वर्ष 2022 मधील युवा कार्य विभागाचे प्रमुख कार्य पुढीलप्रमाणे आहेत:

राष्ट्रीय युवा संसद महोत्सव

जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर विचारविनिमय करून तरुणांचे विचार जाणून घेणे, सार्वजनिक समस्यांशी जोडले जाण्यासाठी तरुणांना प्रोत्साहित करणे, सामान्य माणसांच्या मतांद्वारे त्यांचा दृष्टिकोन समजून घेणे आणि ते स्पष्टपणे व्यक्त करणे, नव भारताच्या संकल्पनेबाबत त्यांचे मत जाणून घेऊन त्याचे दस्तऐवजीकरण करणे हा या महोत्सवामागचा उद्देश आहे. 

3rd National Youth Parliament Festival (NYPF) begins in New Delhi

राष्ट्रीय युवा संसद महोत्सव 2021-2022 चे आयोजन “नव्या भारताचा आवाज व्हा” तसेच “उत्तरे शोधा आणि धोरणात योगदान द्या” या संकल्पनेवर आधारित होते.

Prime Minister Narendra Modi.  https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0014STD.jpg

https://lh6.googleusercontent.com/d77cmleQ92fx2g6JymUR2w1uPY3N7kNwrie_ANkJnh807g-LgLC644u5KNi1QFRrv-KiWWmU1zaHM9fEsuW6ih6RDyG87q_-IseudSoUEX8cdZUQciDoyhnc5YZvSOeTNzRc8Uo3dVlCsuWeEyMIEKVp75rRCxWPw8Gs-cQWs1WjC-ZBacaFj29AMrHVWWOEQkMd337Cew   https://lh4.googleusercontent.com/uPQZ-DiO8jz2iOsLUXAiX0jaArZre6bpreb_Kh0CG4TRedevUtkrRInXqytYQ9bNyTdjrmkYIk3jeyMm6TQMh449zTMkx9WTmscFmV8xiDpqj6cI-g89IFYt8cajErW8YnaVdk5L5BFHwrwaiAZuBMiVkYzX59HVmEYoESBzJgHqPSIp3WepDpH1RKTGXbv3PXbPxBgqdw

 

तिसरा राष्ट्रीय युवा संसद महोत्सव (NYPF) नवी दिल्लीत संपन्न

राष्ट्रीय युवा दिन (12 जानेवारी, 2022): नेहरू युवा केंद्र संघटन (NYKS) ने 12 जानेवारी 2022 रोजी स्वामी विवेकानंद यांची जयंती, देशभरातील 623 जिल्हा नेहरु युवा केंद्रामध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा भाग म्हणून गाव-आधारित युवा क्लब आणि सांस्कृतिक मंत्रालयाची विविध क्षेत्रीय सांस्कृतिक केंद्रे, श्री रामकृष्ण मिशन तसेच विवेकानंद केंद्र या संस्थासारख्या इतर भागधारकांच्या पाठिंब्याने साजरी केली.

जलशक्ती मंत्रालय आणि राष्ट्रीय जल मिशन यांनी संयुक्तपणे राबवलेला 'पावसाचे पाणी जेंव्हा आणि जिथे पडेल तेंव्हा- तिथे अडवा उपक्रम'

युवा नेते, स्वयंसेवक, कुटुंबे आणि गावातील समुदायांना विविध समस्यांबाबत तसेच गरजांबद्दल जागरूक आणि शिक्षित करणे; जलसंवर्धन आणि पावसाचे पाणी साठवणे तसेच लोकांना या कृतींचा सराव करण्यासाठी शिक्षित करण्यात तरुणांना प्रमुख भूमिका स्वीकारता यावी यासाठी सक्षम करणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे.

या प्रकल्पाच्या प्रमुख उपक्रमांमध्ये नेहरु युवा केंद्र संघटन अधिकार्‍यांचे संवेदीकरण; राष्ट्रीय स्तरावरील लाँचिंग; जिल्हा स्तरावरील लाँचिंग; जलसंधारणाची शपथ; युवा नेते आणि स्वयंसेवकांची अभिमुखता आणि प्रेरणा; जलसंवर्धन जागरूकतेसाठी शिक्षण, समुदायाचा सहभाग आणि समर्थन यांचा पुरस्कार तसेच पर्यावरण उभारणी ; जल चर्चा आणि संवाद; ज्ञान स्पर्धा आणि स्वयंसेवी आधारावर सामुदायिक कार्य शिबिरे यांचा समावेश आहे.

 

जागतिक सायकल दिन 2022

शारीरिक तंदुरुस्ती आणि सहनशक्तीला चालना देण्याच्या उद्देशाने आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या उद्देशाने, नेहरू युवा केंद्र संघटन (NYKS) ने 3 जून 2022 रोजी जागतिक सायकल दिन साजरा केला. या आयोजनाच्या राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमाची सुरुवात माननीय केंद्रीय युवा व्यवहार मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी केली. अनुराग ठाकूर यांनी 750 तरुण सायकलस्वार आणि इतर मान्यवरांसह दिल्लीतल्या मेजर ध्यानचंद स्टेडियम येथून 7.5 किमी अंतर सायकलवर पार केले. याशिवाय, नेहरू युवा केंद्र संघटन (NYKS) द्वारे 35 राज्ये /केंद्रशासित प्रदेश आणि देशभरातील 75 प्रतिष्ठित ठिकाणी 1,23,149 सायकलस्वारांच्या सहभागासह पॅन-इंडिया सायकल रॅलीचे आयोजनात सुमारे 8.06 लाख किलोमीटर अंतर पार करण्यात आले होते.

  

  

 

8 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन : सामान्य जनांमध्ये योग लोकप्रिय करण्यासाठी नेहरू युवा केंद्र संघटन (NYKS) ने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात 21 जून 2022 रोजी "मानवतेसाठी योग" या संकल्पनेसह मोठ्या उत्साहात आणि आनंदात देशभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला.

 

हर घर तिरंगा:

स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करण्यासाठी तसेच स्वा स्मरणार्थ आणि भारत अमृत कालात प्रवेश करत असताना, नेहरू युवा केंद्र संघटन द्वारा 1 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत हर घर तिरंगा मोहीम राबवली. या मोहिमेने “जन भागीदारी आणि जनआंदोलन” ची भावना प्रतिबिंबित केली. भारतातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील जवळपास सर्व जिल्ह्यांमधील 2.26 लाख गावांमध्ये हर घर तिरंगा मोहीम राबविण्यात आली होती.

https://lh5.googleusercontent.com/awIQZsREnElYfWjw42iMYQJE4LYoqItUQII2MVtNmRhP8kUyPL25m0ZoykAPWWQfJHtNyPw0gBteLt4TA7q_ttJsNs3ABK3QnVIrP9CCyaw_DreFpv61ICe0khjPTM0CvsT-k8pAxpdKIfgZ-3uTFQJJQIeXUzzVUR0Es7EIu2eKg2KZ-skFnyXK3Dcxl7lijFbfv9fF-w https://lh3.googleusercontent.com/-fU0BzY3NUveHwDJD4nrrXLrbp-P4E82mUYpiOkqdjHBv8gYapCx0RslBgrvlmapg6GiLYAvj0zP66PxUaoupzBAWS-Efp4iJvkxE45MRcpU6N2kcPVPTi_m2cflu-gVuB5ji5y5A_uZ8OTf_bpsE9GcKeaHKqO-oadYCVlr_rUD38F_tzIEdgzx5ZNch0hMFbGv5g2h5Q

  

स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष आणि हर घर तिरंगा कार्यक्रमाविषयी जागृती पसरवणाऱ्या 6 लाख युवा नेते आणि स्वयंसेवकांद्वारे 3.70 कोटी घरांपर्यंत सर्वव्यापी संपर्क साधणे हा या समारंभाच्या विविध पैलूंपैकी महत्वपूर्ण पैलू आहे. या प्रक्रियेत युवा स्वयंसेवकांनी, भारतातील 9.38 कोटी नागरिकांना त्यांच्या घरांवर तिरंगा फडकवण्यास प्रवृत्त केले आणि 13-15 ऑगस्ट 2022 दरम्यान 2 कोटींहून अधिक कुटुंबांनी स्वयंस्फूर्तीने त्यांच्या घरांवर तिरंगा फडकावला.

 

स्वच्छता पंधरवडा आयोजन: स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि स्वच्छता मोहीम हाती घेण्यासाठी तरुणांना पुढाकार घेण्यास प्रवृत्त करणे तसेच स्थानिक संसाधने एकत्रित करून स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि अंमलबजावणी सुलभ करणे या उद्देशाने, नेहरू युवा केंद्र संघटन (NYKS) ने देशव्यापी सघन स्वच्छता मोहीम आयोजित केली. स्वच्छता पंधरवडा अंतर्गत 1 ते 15 ऑगस्ट, 2022 पर्यंत देशभरात नेहरु युवा केंद्र स्वयंसेवक, संलग्न युवक क्लब, स्थानिक युवक आणि इतर प्रमुख भागधारकांच्या सहभागाने ही मोहीम राबविण्यात आली.

  https://lh6.googleusercontent.com/8g9nAL9YaahcvUpDYKJ58T3l3JrzFikumFs98Rze_x5R4p67F62vTBnVDvGvi0VYEje6P2dc1_Aqyts3wzq9d7X6E2EO_GnBXnhI4oapP9hoE36JU473nmZ1rXpmxzp2Z5vnEDGm6AtA_Y9fMJ89VyCtilUfqp1jQhtzvxCzI2IGp6mReNqOZWBMkEQewQ76EoRgyyI2Yw

WhatsApp Image 2022-08-17 at 3.09.11 PM.jpeg

 

राष्ट्रीय पोषण माह आयोजन: पोषणाचे महत्त्वाबाबत जागरूकता तसेच कुटुंबे त्यांच्या मुलांसाठी आणि गरोदर/ स्तनपान करणार्‍या मातांना पोषक आहार पुरवण्यासाठी सरकारी सेवांचा लाभ कशा प्रकारे मिळवू शकतात याबद्दल जागरूकता निर्माण करणे हे या आयोजनाचे प्राथमिक उद्दिष्ट होते.

https://lh5.googleusercontent.com/0P8qWQsfHznP2MKuPfqoJ18O2iJhpR16vVduK-R9Dh5MMezS2Wm9He7dGDpsZo5KAyawepvTi2Cd1ppHMldOEloYBzXqThkZLtsz_vLfyYVwL2vt0a3y71qDLo_FS6kL6zxD_GVTa8OU0TDxBDC9DovmQGPqvo9InB6gQ7kI6qAhGhbttNqrjPwCg2MQmubVed50lhtI1A A group of children sitting at a tableDescription automatically generated with low confidence

 

देशभरात पोषण माह कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी नेहरू युवा केंद्र संघटन 2018 पासून एक प्रमुख भागीदार आहे. पोषण माह कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासन आणि अंगणवाडी, आशा वर्कर यांच्या सहकार्याने जिल्हा नेहरू युवा केंद्रांनी कुपोषण, संतुलित आहाराचे महत्त्व, पारंपारिक आहार याबाबत ग्रामस्थांना जागरुक करण्यासाठी नेहरू युवा केंद्र स्वयंसेवक आणि युवा क्लबला प्रोत्साहित केले.

 

स्वच्छ भारत 2.0: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून युवा व्यवहार मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली नेहरू युवा केंद्र संघटनच्या (NYKS) युवा कार्य विभागाने 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2022 या कालावधीत “स्वच्छ भारत 2.0” उपक्रमात अंतर्गत विविध कार्यक्रम आयोजित केले होते. कार्यक्रमाचा उद्देश जनजागृती करणे, लोकांचे एकत्रीकरण आणि स्वच्छ भारत उपक्रमात त्यांचा सहभाग सुनिश्चित करणे हाच होता. या उपक्रमात लोकांनी अद्वितीय सहभाग नोंदवला.

  https://lh6.googleusercontent.com/gzmOLiIabXIXK1vsyVS0-AbK8gtBypveBSpYg1wCytAWZee4G5dWny8QM5F46YMJjVHIVYwG4AKGmE4XHawUXI8thCcnRw2SI-NY2CZIu3lnvKWtPqCY0wPNkwAdaq0WIEMQMt1NKFByu7dsd07I8fBe6HE1Yjk16nB_zexPSXPMwNujsv0AQqbgkRm5r6otOVW2fjlilQhttps://lh3.googleusercontent.com/DHY_Fxz_OJoCIlTtUT0To3J6HvIlTE2a5pg-YVBcD9d22A-DF1tsjoFj9vZFssTdpjaYLnCeydjIRJujFTa6R2IP6nXBB8lUUY9vAgkHX8Ksoepy-Q4JxZt_ULWsLRjZGnvQH7XxTmB9Unb2HOduyYKMulEn5MECzre2vYldoBjJC5KhnCHsBwCt7izHyaoyAG0nALUtzQ  

01 ऑक्‍टोबर ते 31 ऑक्‍टोबर 2022 या कालावधीत स्वयंसेवी कार्य शिबिरांद्वारे संपूर्ण देशभरात स्वच्छतेचे उपक्रम राबवणे; घन कचरा संकलन विशेषतः एकल वापर प्लास्टिक गोळा करणे; ऐतिहासिक वास्तू आणि वारसा स्थळे, सामुदायिक केंद्रे, युथ क्‍लब/महिला मंडळ इमारती यांची देखभाल आणि सुशोभीकरण करणे, शाळेच्या इमारती आणि पंचायतीची इमारतींची स्वच्छता आणि पारंपारिक जलस्रोतांची देखभाल करणे हा या आयोजनाचा हेतु होता. जनभागीदारी ते जनआंदोलन या रणनीतीने या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

 

'राष्ट्रीय एकता दिवस' 31 ऑक्टोबर 2022: नेहरू युवा केंद्र संघटन (NYKS) ने 31 ऑक्टोबर 2022 रोजी, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा भाग म्हणून, सरदार वल्लभभाई पटेल यांची 147 वी जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी केली. या महान नेत्याने जोपासलेली मूल्ये आणि विचार येणाऱ्या पिढ्यांना आपल्या देशाची एकता, अखंडता अबाधित राखण्यासाठी प्रोत्साहन देतात, तसेच देशाच्या सुरक्षेसाठी असलेल्या वास्तविक आणि संभाव्य धोक्यांना तोंड देण्यासाठी आपल्या देशाच्या अंतर्निहित शक्ती आणि लवचिकतेची पुन: पुष्टी करतात.

https://lh5.googleusercontent.com/RbI1mufWer_ziy8WWjn7vHNM6UIgTTMjlmR6ERHprdhX1G5c0SaoAEPv0qVFKpxuGfwIx6DU-MteOV3kQjliBnmLWf0XooucAPcH37rfLAtZSQLJsNQq7pCM739ibOHklirbLCy8XHAZBB7N4nkHkKBw6DV4kxLA0-RujNeOHNWVpMfqvi6kohbDdegseQzgYtNWyB2iyg  https://lh6.googleusercontent.com/SzBOQm5VZPXj33KbL2XPriQ4dN23e04V-uUIztOfgB5JfL1gOWuoyCw5SCTPJFuxNc-CwMt0CdsHngtfvnDIBxsfVEeh-Lgc2I7hzn5VjpJljgTXmxIUYzhI8S_qfk2rVvLk4r0qBpddwjmA9QR_JOyXtf0uZAIA82EJKJ16_a0-ZwSY7nyT-Zm2xTsjatv5hBWsGA7SnQ

 

नमामि गंगेमध्ये युवकांचा सहभाग: “नमामि गंगेमध्ये युवकांचा सहभाग” हा प्रकल्प राष्ट्रीय स्वच्छ गंगा मिशन (NMCG), जलसंपदा विभाग, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन, जलशक्ती मंत्रालय, नेहरू युवा केंद्र संघटन, युवा व्यवहार विभाग, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला. गंगा नदीचे संवर्धन आणि पुनरुज्जीवनला चालना देण्यासाठी "नमामि गंगे" हा उपक्रम राबवण्यात आला.

“हरघर तिरंगा” च्या धर्तीवर, नेहरू युवा केंद्र संघटनने “नमामि गंगे कार्यक्रमात युवकांचा सहभाग” या प्रकल्पाअंतर्गत “हरघाटतिरंगा” ची कल्पना मांडली. गंगा खोऱ्यातील 5 राज्यांतील 51 जिल्ह्यातील 224 घाट आणि इतर ठिकाणी एकूण 574 ध्वजारोहण उपक्रम राबविण्यात आले ज्यात एकूण 30,918 भागधारक, युवा स्वयंसेवक, युवा क्लब सदस्य तसेच गंगा दूत, स्थानिक ग्रामस्थ आदींनी स्वेच्छेने सहभाग घेतला. 

नेहरू युवा केंद्र संघटनने (NYKS) ने 31 ऑक्टोबर 2022 रोजी 5 राज्यांतील 9 जिल्ह्यांतील 14 ठिकाणी/ घाटांवर अनावश्यक वस्तूंची विल्हेवाट लावण्यासाठी विशेष स्वच्छता मोहीम आयोजित केली होती. ज्यामध्ये 808 तरुणांनी सहभागी होऊन एकूण 1029 किलो कचरा गोळा करुन त्याची विल्हेवाट लावण्यात आली.

 

राष्ट्रीय सेवा योजना प्रजासत्ताक दिन संचलन शिबिर, 2022: राष्ट्रीय सेवा योजनेच्या 147 (74 मुले आणि 73 मुली) जणांच्या दलाने 26 जानेवारी 2022 रोजी राजपथ, नवी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिन संचलनामध्ये भारतातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व केले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना पंतप्रधान आणि युवा व्यवहार तसेच क्रीडा मंत्र्यांना भेटण्याची संधी मिळाली.

राष्ट्रीय सेवा योजना (NSS) पुरस्कार प्रदान-2021-22: वर्ष 2020-21 साठी NSS पुरस्कार भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते 24 सप्टेंबर 2022 रोजी राष्ट्रपती भवनात सर्वोत्कृष्ट विद्यापीठांना (2 पुरस्कार), सर्वोत्कृष्ट युनिट्स/कार्यक्रम अधिकारी (10 पुरस्कार) आणि सर्वोत्कृष्ट स्वयंसेवक (30 पुरस्कार) प्रदान करण्यात आले.

 

एक भारत श्रेष्ठ भारत: विविध राज्यांतील विद्यार्थी तरुणांमध्ये देशभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना जागवून तीची जोपासना करण्यासाठी एक भारत श्रेष्ठ भारत अंतर्गत 15 राष्ट्रीय एकात्मता शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या राष्ट्रीय स्तरावरील शिबिरांमध्ये देशभरातून टीम लीडर्ससह 3,150 राष्ट्रीय स्वयंसेवक सहभागी झाले होते.

 

शहीदी दिवस-2022: देशात सुरू असलेल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून, देशभरातील राष्ट्रीय सेवा योजना युनिट्सनी शहीदी दिवस साजरा केला. या कार्यक्रमात, देशभरातील 457 विद्यापीठातील 10,926 संस्थांनी भाग घेतला.

या स्वयंसेवकांना देशभक्तांवरील चित्रपट दाखवण्यात आले. काही ठिकाणी देशभक्तीपर गीते, प्रेरक कविता, क्रांतिकारी मूल्य, साहस कथा, भाषण या विषयांवर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या उपक्रमात एकूण 9,31,933 स्वयंसेवक आणि इतर तरुणांनी प्रत्यक्ष तसेच दूरदृश्य प्रणाली मार्फत भाग घेतला.

Related links:

https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1859315

https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1850311

https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1872786

https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1869161

https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1872301

https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1864221

 

* * *

S.Thakur/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1887269) Visitor Counter : 151


Read this release in: English , Kannada