गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय

गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने भारताचा शहरी पुनरुत्थानाचा प्रवास उंचावण्यासाठी 2 प्रमुख उपक्रम सुरू केले

Posted On: 28 DEC 2022 6:54PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 डिसेंबर 2022

 

संसाधनांची जुळवाजुळव , खर्च संबंधित कामगिरी आणि वित्तीय प्रशासन प्रणाली या तीन आर्थिक मापदंडांमधील सामर्थ्याच्या आधारे शहरी स्थानिक संस्थांचे मूल्यांकन करणे, निवड करणे आणि पुरस्कृत करणे"' हे शहर वित्त क्रमवारी  2022' चे उद्दिष्ट आहे असे  केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार आणि पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप एस. पुरी म्हणाले. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंत्रालयाचे दोन प्रमुख उपक्रम- ‘शहर वित्त क्रमवारी  2022’ आणि ‘शहर सौंदर्य स्पर्धा ’- सुरु  करण्यात आले.  गृहनिर्माण आणि शहर  व्यवहार मंत्रालयाचे सचिव मनोज जोशी आणि मंत्रालयातील इतर वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. 

ते म्हणाले की, मे 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यभार स्वीकारला , तेव्हा त्यांनी शहरीकरणाकडे वळण्याचा निर्णय घेतला. त्यांनी शहरीकरण हे आव्हान म्हणून स्वीकारले आणि ते साध्य करून दाखवले.  स्वच्छ भारत मिशन सारख्या महत्वाकांक्षी योजना लोकचळवळ बनली. प्रधानमंत्री आवास योजना आणि स्वच्छ भारत अभियान 2.0 सुरू करण्यात आले आहेत. 2014 पासून कचरा प्रक्रिया आणि व्यवस्थापनात लक्षणीय वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले. “भारताने जगातील सर्वात महत्वाकांक्षी शहरी पुनरुत्थानाची योजना हाती घेतली आहे.” असे ते पुढे म्हणाले.

आज प्रारंभ  झालेल्या या उपक्रमांमागील कल्पनेबद्दल बोलताना हरदीप एस. पुरी म्हणाले की, पंतप्रधानांनी या वर्षी जूनमध्ये सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांची भेट घेतली तेव्हा त्यांना हा विचार सुचला आणि त्यांनी या बैठकीदरम्यान आर्थिक बाबतीत महापालिका संस्थांमध्ये निरोगी स्पर्धेला चालना देण्यासाठी देशातील शहरांच्या  क्रमवारीची रूपरेषा आखली.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वाढती जाणीव आहे की जर तुमच्याकडे उत्तम  वित्त सहाय्य  असेल, तुमची कार्यपद्धती पारदर्शक असेल तर जमिनीचे मूल्य वाढते आणि हेच या उपक्रमाचे सौंदर्य आहे, असे ते म्हणाले.

“शहर सौंदर्य स्पर्धा ’’ उपक्रमाबद्दल बोलताना मंत्री म्हणाले की, सुंदर, नाविन्यपूर्ण आणि सर्वसमावेशक सार्वजनिक जागा निर्माण करण्याच्या दिशेने भारतातील शहरे आणि प्रभागांनी केलेल्या परिवर्तनात्मक प्रयत्नांना प्रोत्साहन आणि मान्यता देण्यासाठी  हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

 

‘‘शहर वित्त क्रमवारी  2022’ ’:

‘भारतातील शहरांचे (शहरी स्थानिक संस्था किंवा शहरी स्थानिक संस्था ) त्यांच्या सध्याच्या आर्थिक आरोग्य दर्जाच्या  आधारे मूल्यांकन करणे, निवड करणे  आणि पुरस्कृत करणे तसेच आर्थिक कामगिरीमध्ये कालांतराने सुधारणा करणे हे शहर वित्त क्रमवारी  2022’  चे उद्दिष्ट आहे’.

शहर/राज्य अधिकारी आणि निर्णयकर्त्यांना , महानगरपालिका वित्त सुधारणांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रेरित करणे हे या क्रमवारीने उद्दिष्ट आहे. सहभागी शहरी स्थानिक संस्थांचे  मूल्यमापन तीन प्रमुख नगरपालिका वित्त मूल्यांकन मापदंडांच्या  15 निर्देशकांच्या आधारे  केले जाईल, ते म्हणजे: (i) संसाधन जुळवाजुळव , (ii) खर्च संबंधी कामगिरी आणि (iii) वित्तीय प्रशासन. खालील चार लोकसंख्या श्रेणींपैकी कोणत्याही एका श्रेणी अंतर्गत शहरांना त्यांच्या गुणांच्या  आधारावर राष्ट्रीय स्तरावर स्थान दिले जाईल: (i) 4 दशलक्षांपेक्षा अधिक  (ii) 1-4 दशलक्ष दरम्यान (iii) 1 लाख  ते 1 दहा लाख  (iv)  100,000 पेक्षा कमी

प्रत्येक लोकसंख्या श्रेणीतील अव्वल  3 शहरांना राष्ट्रीय स्तरावर तसेच प्रत्येक राज्य/राज्य क्लस्टरमध्ये पुरस्कृत केले जाईल. सहभागी युएलबीना www.cityfinance.in वर तयार केलेल्या ऑनलाइन सुविधेद्वारे आवश्यक डेटा/दस्तऐवज (ऑडिट केलेली  खाती, वार्षिक अंदाजपत्रक आणि स्वयं-अहवाल कामगिरी  मेट्रिक्ससह) सादर  करण्यासाठी आमंत्रित केले जाईल.

शहर वित्त क्रमवारी हा शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांचे  विश्लेषण आणि त्यांच्या आर्थिक कामगिरीमधील क्षेत्रे ओळखण्यात सहाय्य करण्याचा प्रयत्न आहे. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था आपल्या नागरिकांना दर्जेदार पायाभूत सुविधा आणि सेवा प्रदान करण्यासाठी  आणखी सुधारणा करू शकतात.शहर/राज्य अधिकार्‍यांना महानगरपालिका आर्थिक सुधारणांची अंमलबजावणी सुरू ठेवण्यासाठी ही  क्रमवारी सतत प्रोत्साहन देणारी  ठरेल. ही क्रमवारी राज्य- आणि राष्ट्रीय-स्तरावर, महानगरपालिकांनी साध्य केलेले  परिणाम  अधोरेखित करेल आणि प्रमुख धोरणकर्त्यांना शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आर्थिक स्थितीबद्दल महत्वाचा सूक्ष्म दृष्टीकोन  प्रदान करेल.

वित्तीय क्रमवारीत भाग घेऊन शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना  खूप फायदा होऊ शकतो  यामुळे या स्थानिक स्वराज्य  संस्था इतर शहरांच्या तुलनेत त्यांच्या स्वत:च्या कामगिरीचे स्वयं-मूल्यांकन करू शकतील यामुळे  त्यांची भविष्यात स्वयं-सुधारणा होण्यास मदत होईल.सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधील सर्व 4500+ शहरी /नागरी  स्थानिक स्वराज्य  संस्थांना (युएलबी ) शहर वित्त क्रमवारी  2022.मध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल.

‘शहर वित्त क्रमवारी 2022’ आर्थिकदृष्ट्या निकोप, पारदर्शक आणि शाश्वत शहरांना चालना देण्यासाठी एक बळकट महानगरपालिका वित्तीय व्यवस्था विकसित करण्यासाठी पोषक वातावरण तयार करेल.

 

'शहर सौंदर्य स्पर्धा':

सुंदर, नाविन्यपूर्ण आणि सर्वसमावेशक सार्वजनिक स्थळे निर्माण करण्यासाठी भारतातील शहरे आणि प्रभागांनी केलेल्या परिवर्तनाच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देणे आणि हे प्रयत्न ओळखणे  हे ‘शहर सौंदर्य स्पर्धा'’चे उद्दिष्ट आहे.

शहरांचे प्रभाग आणि सार्वजनिक स्थळांचे (i) प्रवेशयोग्यता (ii) सुविधा (iii) उपक्रम  (iv) सौंदर्य  आणि (v) पर्यावरण  हे पाच व्यापक स्तंभ लक्षात घेऊन परीक्षण केले जाईल. शहर सौंदर्य स्पर्धा शहर स्तरावरील सर्वात सुंदर प्रभाग आणि सुंदर सार्वजनिक स्थळांचा सन्मान करेल. निवड झालेल्या प्रभागांना शहर आणि  राज्य स्तरावर गौरवण्यात  येणार आहे. शहर स्तरावर, शहरांमधील सर्वात सुंदर सार्वजनिक स्थळे  उदा. जलस्रोतांलगतचे क्षेत्र  , हरित स्थळे , पर्यटन/वारसा स्थळे  आणि बाजारपेठ/व्यावसायिक स्थळांना प्रथम राज्यात पुरस्कार दिला जाईल आणि नंतर राष्ट्रीय स्तरावर पुरस्कारासाठी निवडण्यात येईल.

प्रभाग आणि शहरांमधील ही निकोप स्पर्धा शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या मूलभूत पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी प्रोत्साहित करेल आणि शहरी स्थळे सुंदर, शाश्वत आणि समावेशक बनवेल, अशी अशा आहे.

प्रभाग आणि शहरांद्वारे आलेल्या प्रवेशिकांचे   मूल्यमापन एका स्वतंत्र परीक्षकांद्वारे  केले जाईल ज्यात शहरी नियोजन,रचना , अभियांत्रिकी, संस्कृती तज्ञ, पर्यावरणवादी आणि इतर यासारख्या विविध क्षेत्रातील तज्ञांचा समावेश असू शकतो.

प्रभाग आणि शहर स्पर्धक शहर सौन्दर्य  पोर्टलवर त्यांच्या प्रवेशिका सादर करतील. ज्याची रचना मंत्रालयाच्या माहिती सहयोगी -भारतीय  प्रशासकीय कर्मचारी महाविद्यालयाद्वारे केली जाईल. प्रभाग/सार्वजनिक स्थळे  निर्देशक संचासह आवश्यकता पूर्ण करतात हे प्रवेशिका सादर केलेल्यांनी  स्थापित करणे आवश्यक आहे . प्रवेशिकांचे परीक्षण परीक्षकांद्वारे केले जाईल. परीक्षकांच्या  सोयीसाठी, तिसऱ्या पक्षाचे स्वतंत्र मूल्यांकन देखील केले जाईल. विजयी प्रवेशिकांवर परीक्षकांचा  निर्णय अंतिम असेल.

शहर सौंदर्य स्पर्धेतील सहभाग ऐच्छिक आहे. निकोप  स्पर्धा निर्माण होण्यासह  समुदाय स्वामित्वाची  आणि अभिमानाची भावना देखील जागृत होण्याच्या दृष्टीने या स्पर्धेत सर्व प्रभाग आणि शहरांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे . समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन करतानाच  कार्यक्षम सुंदर सार्वजनिक स्थळे  निर्माण करण्याच्या दिशेने  राबवण्यात येणारे उपक्रम आणि हस्तक्षेप प्रदर्शित करण्यासाठी पुढे येण्याच्या अनुषंगाने गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या या  उपक्रमामुळे प्रभाग आणि शहरांना प्रोत्साहन मिळेल.

 

* * *

S.Patil/S.Kane/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1887128) Visitor Counter : 313