विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

वर्ष अखेर आढावा 2022- विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय)

Posted On: 28 DEC 2022 2:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 डिसेंबर 2022

 

पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली सीएसआयआर सोसायटी बैठक

पंतप्रधान आणि CSIR अध्यक्ष नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली 15 ऑक्टोबर 2022 रोजी सीएसआयआर सोसायटीची बैठक पार पडली. केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) विज्ञान आणि तंत्रज्ञान, डॉ जितेंद्र सिंह जे सीएसआयआरचे उपाध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री आहेत. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, सीएसआयआप सोसायटीच्या इतर सदस्यांसह बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत प्रख्यात शास्त्रज्ञ, उद्योगपती आणि सरकारमधील वैज्ञानिक आणि इतर मंत्रालयांचे सचिव यांची उपस्थिती होती. सचिव, डॉ एन कलैसेल्वी यांनी सीएसआयआरच्या अलीकडील उपलब्धी आणि योगदान यावर सादरीकरण केले. त्यांनी सीएसआयआर व्हिजन 2030 चा आराखडा देखील सादर केला जो राष्ट्रीय महत्वाकांक्षा आणि व्हीजन@2047 शी संरेखित आहे.

पंतप्रधानांनी सीएसआयआरच्या गेल्या 80 वर्षांतील प्रयत्नांचे कौतुक केले आणि सीएसआयआरला 100 वर्षे पूर्ण होत असताना 2042 चे व्हिजन विकसित करण्याचे आवाहन केले. गेल्या 80 वर्षांच्या प्रवासाचे दस्तऐवजीकरण करण्याचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले.

 

जागतिक विज्ञान आणि तंत्रज्ञान निर्देशांकात भारताची क्रमवारी सतत वाढत आहे.

ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स (GII) 2022 नुसार भारत आता जागतिक स्तरावर अव्वल नाविन्यपूर्ण अर्थव्यवस्थांमध्ये 40 व्या स्थानावर आहे. राष्ट्रीय विज्ञान फाऊंडेशनच्या (NSF) डेटाबेसनुसार वैज्ञानिक प्रकाशनात; पीएचडी धारकांच्या संख्येनुसार उच्च शिक्षण प्रणालीत तसेच स्टार्ट-अपच्या संख्येच्या बाबतीत देश पहिल्या 3 देशांमध्ये आहे.

 

एक भक्कम स्टार्ट-अप आणि नवोन्मेषी परिसंस्था तयार करणे

नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर डेव्हलपिंग अँड हार्नेसिंग इनोव्हेशन्स (NIDHI) कार्यक्रमांतर्गत देशभरात टेक्नॉलॉजी बिझनेस इनक्यूबेटर्स (TBI) आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान नवउद्योजक पार्क्स (STEP) चे जाळे स्थापन करण्यात विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय अग्रेसर आहे. नवोन्मेषी परिसंस्थेच्या सर्व पैलूंद्वारे व्यवसायीकरणासाठी स्टार्ट-अप्सच्या शोध आणि मार्गदर्शनावर याचा मोठा परिणाम झाला, ज्यामध्ये नवोन्मेष पिरॅमिडचा पाया लक्षणीयरीत्या भक्कम करणे, काटकसरी आणि तळागाळातील नवकल्पनांना वर्धित समर्थन देणे यांचा समावेश आहे.

ज्ञानाचा साठा म्हणून काम करणाऱ्या निधी- सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना करण्याच्या उद्देशाने आणि राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय भागीदारांशी संबंध संरेखित करण्यात मदत करण्यासाठी तेलंगणामधल्या हैदराबाद येथे टी-हब मधे सुरू करण्यात आलेल्या नवीन सेंटर ऑफ एक्सलन्सच्या सक्रिय सहकार्याने 2022 मध्ये 8 नव्या सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना करण्यात आली. 2022 मध्ये देशभरात सुरू असलेल्या 30 प्रयास केंद्रासह 13 नव्या प्रयास केंद्रांना समर्थन देण्यात आले. ही प्रयास केंद्र तरुण नवोदितांना त्यांच्या कल्पनांना प्रोटोटाइपमध्ये बदलण्यासाठी मदत करतात. वर्षभरात सध्या कार्यरत असलेल्या 18 नवीन उद्योजक-निवास (EIR) केंद्रांसह नव्या 10 नवीन उद्योजक-निवास (EIR) केंद्रांना समर्थन देण्यात आले. ही नवीन उद्योजक-निवास (EIR) केंद्र 18 महिन्यांच्या कालावधीत एका आशादायक तंत्रज्ञान व्यवसाय कल्पनेचा पाठपुरावा करण्यासाठी लक्षणीय क्षमता असलेल्या महत्त्वाकांक्षी किंवा नवोदित उद्योजकांना समर्थन देतात.

 

भारत सुपरकंप्युटिंग क्षमतेत नवीन उंची गाठत आहे

पाच संस्थांमध्ये (IIT खरगपूर, NIT त्रिची, IIT गांधीनगर, IIT गुवाहाटी, IIT मंडी) उच्च-कार्यक्षमता संगणकांची नवीन प्रतिष्ठापना. या मिशन अंतर्गत प्रशिक्षित मनुष्यबळाची आकडेवारी 17,500 वर पोहोचली आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), रोबोटिक्स, IOT सारख्या सायबरफिजिकल क्षेत्रात संशोधन आणि नवोन्मेष हब्सच्या माध्यमातून तंत्रज्ञानाच्या विकासाला चालना देणे

केंद्रीय मंत्रिमंडळाने डिसेंबर 2018 मध्ये, पाच वर्षांच्या कालावधीसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाद्वारे (DST) अंमलात आणल्या जाणार्‍या एकूण 3660 कोटी रुपये किंमतीच्या राष्ट्रीय मिशन ऑन इंटरडिसिप्लिनरी सायबर फिजिकल सिस्टीम (NM-ICPS) ला मान्यता दिली. देशभरातील नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये तयार करण्यात आलेल्या 25 तंत्रज्ञान नवोन्मेष हब (TIHs) द्वारे हे अभियान राबविण्यात येत आहे. हे तंत्रज्ञान नवोन्मेष हब या मिशनची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी काम करत आहेत. भारतीय विज्ञान संस्था (IISc) बंगलोर येथील आर्टपार्क ने एक्सरे सेतू नावाचा कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे चलित प्लॅटफॉर्म विकसित केला. या प्लॅटफॉर्मने WhatsApp वर पाठवलेली छायाचित्रे पाहून छातीचा एक्स-रेचे स्पष्टीकरण करण्यात मदत केली आणि ज्या डॉक्टरांकडे एक्स-रे मशीन उपलब्ध नाही अशा डॉक्टरांना कोविड 19 च्या जलद तपासणीद्वारे लवकर उपचार सुरू करण्यात मदत केली. भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) बॉम्बे मधील शास्त्रज्ञांच्या चमूने भारतीय तंत्रज्ञान संस्था, जोधपूर येथील तंत्रज्ञान नवोन्मेष हबच्या सोबतीने (TIH) समर्थित प्रयत्न, उपायात्मक कृती, नॉलेज स्किमिंग आणि समग्र विश्लेषण अंतर्गत कोविड-19 चे स्क्रीनिंग करण्यासाठी टेपेस्ट्री पद्धत विकसित केली आहे.

 

आंतरराष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्र सहभागात भारताची स्थिती मजबूत करणे

1 डिसेंबर 2022 रोजी भारताने G20 अध्यक्षपद स्वीकारले आणि 2023 मध्ये देशात प्रथमच G20 नेत्यांची शिखर परिषद आयोजित केली जाईल. त्याच विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचा भाग म्हणून विज्ञान-20 (S20) आणि भारताच्या G20 अध्यक्षपदाच्या काळात 2023 मध्ये आयोजित संशोधन इनोव्हेशन इनिशिएटिव्ह गॅदरिंग (RIIG) च्या क्रियाकलापांचे समन्वय साधण्याची जबाबदारी स्वीकारते. भारताने पहिल्या टप्प्यात क्वांटम कॉम्प्युटिंगमध्ये व्हर्च्युअल नेटवर्क सेंटरची स्थापना करुन 20 क्यूबिट्स सुपरकंडक्टिंग आधारित क्वांटम कॉम्प्युटर संयुक्तरीत्या विकसित करण्यासाठी फिनलँडशी हातमिळवणी केली. भारताने दुसऱ्या टप्प्यात ही संख्या 54 क्यूबिट्सपर्यंत वाढवली.

 

तंत्रज्ञानाच्या व्यापारीकरणासाठी नवीन पंख

हे वर्ष उत्तम होते कारण या वर्षी, 29 जानेवारी 2022 रोजी बिटींग रिट्रीट सोहळ्याच्या संध्येला 1000 स्वदेशी ड्रोनच्या समुहाच्या उड्डाणाचे आकाश देखील साक्षीदार झाले होते. महिलांच्या नेतृत्वात चालणाऱ्या मेसर्स बोटलॅब डायनॅमिक्सच्या ड्रोन शोने जागतिक स्तरावर भारताला चौथ्या क्रमांकावर अभिमानाने स्थान मिळवून दिले तसेच माननीय पंतप्रधानांच्या कौतुकास पात्र ठरले. मेसर्स स्वजल वॉटर प्रायव्हेट लिमिटेड, गुरुग्राम या टेक स्टार्टअप कंपनीने केवळ प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर कमी करण्याचा प्रस्ताव ठेवला नाही तर शुद्ध पाण्याची किंमत 25 पैसे प्रति लीटर इतकी कमी करण्याची क्षमता देखील दर्शविली. मेसर्स स्कायशेड डेलाईट प्रायव्हेट लिमिटेड, हैदराबादने कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी भारतातील पहिल्या एकात्मिक, केंद्रीकृत डे लाइटिंग सिस्टीमचा प्रस्ताव दिला आहे. या प्रणालीमुळे AC लोड देखील कमी करता येतो ज्यामुळे आपल्या पर्यावरण आणि हवामानाचे संरक्षण होते. हा दिवसाचा प्रकाश अगदी तळघरांपर्यंत पोहोचू शकतो. मेसर्स सॅपीजेन बायोलॉजीक्स प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद यांनी एक कोविड-19 प्रतिबंधक नाकाद्वारे घेता येणारी लस तयार केली आहे. ही लस श्लेष्मल रोगप्रतिकारक प्रतिक्रिया निर्माण करून लसीकरण केलेल्या व्यक्तीच्या श्वसन संस्थेच्या उर्ध्व आणि अधो भागाचे संरक्षण करते. यामुळे संसर्ग आणि संक्रमणाचे चक्र खंडित होते.

 

पंतप्रधानांच्या राष्ट्रीय हायड्रोजन मिशनच्या (NHM) दृष्टीकोनाच्या अनुषंगाने, मेसर्स मल्टी नॅनो सेन्स टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड, महाराष्ट्र या कंपनीने स्वदेशी हायड्रोजन सेन्सर्सची निर्मिती करण्याची योजना आणली आहे. प्रधानमंत्री अटल भुजल योजनेच्या (अटल जल) प्रत्यक्ष फायद्यासाठी, झारखंडमधील स्टार्टअप मेसर्स क्रिटस्नाम टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड 'धारा स्मार्ट फ्लोमीटर' विकसित करत आहे - जी वास्तविकरित्या पाणी वितरणाचा मागोवा घेण्यासाठी तयार करण्यात आलेली ऑनलाइन मॉनिटरिंग एकीकृत प्रणाली आहे.

 

विज्ञानातील करिअरचा पाठपुरावा करण्यासाठी सर्वोत्कृष्ट टॅलेंट पूल्सना आकर्षित करणे

आधारभूत आणि नैसर्गिक विज्ञानांमध्ये स्नातक आणि स्नातकोत्तर शिक्षणासाठी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी (SHE) 10833 विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक आधारावर निवडण्यात आले होते. स्पर्धात्मक पद्धतीने निवडण्यात आलेल्या सोळा INSPIRE SHE स्कॉलर्सना ऑगस्ट 2022 मध्ये दक्षिण कोरियामध्ये आयोजित आशियाई विज्ञान शिबिरात सहभागी होण्याची संधी प्रदान करण्यात आली आणि भारतीय सहभागींपैकी एकाला पोस्टर मेकिंग स्पर्धेत तिसरे पारितोषिक प्राप्त झाले. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात डॉक्टरेट पदवी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी 845 विद्यार्थ्यांना इन्स्पायर फेलोशिप देण्यात आली. SERB-नॅशनल पोस्ट-डॉक्टरल फेलोशिप वर्षभरात 300 विद्यार्थ्यांना देण्यात आली.

 

राज्य विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये संशोधन क्षमता वाढवणे

राष्ट्रीय संशोधन आणि विकास परिसंस्थेमध्ये योगदान देण्याच्या दृष्टीने आणि गुणवत्ता वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी संशोधन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत संशोधन उत्कृष्टतेचा क्षैतिज प्रसार सुनिश्चित करण्यासाठी राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये विद्यमान संशोधन क्षमतांची वृद्धी आवश्यक आहे. 

खाजगी विद्यापीठांसह राज्य विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये एक भक्कम संशोधन आणि विकास परिसंस्था निर्माण करण्यासाठी विज्ञान आणि अभियांत्रिकी संशोधन मंडळाने (SERB) राज्य विद्यापीठ संशोधन उत्कृष्टता (SERB-SURE) ही समर्पित योजना सुरू केली आहे.

 

नॅनो सायन्स

नॅनो विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेच्या (INST) शास्त्रज्ञांनी पहिल्यांदाच पॉलिमर (PVDF) नॅनोपार्टिकल्समध्ये पायझोइलेक्ट्रिक डेल्टा फेज नावाचा गुणधर्म प्रवृत्त करण्याचा एक कार्यक्षम मार्ग प्रस्तावित केला आहे ज्यामुळे ते स्पर्श सेन्सर, ध्वनिक सेन्सर आणि पायझोइलेक्ट्रिक नॅनोजनरेटर्समधील वापरासाठी उपयुक्त ठरेल. शास्त्रज्ञांनी PVDF नॅनो पार्टिकल्स वापरुन एक उपकरण बनवले आहे जे फिल्मसारख्या समकक्षांच्या तुलनेत खूपच उत्कृष्ट पीझोइलेक्ट्रिक प्रतिसाद प्रदर्शित करते.

इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड स्टडी इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी (IASST) च्या शास्त्रज्ञांनी बायोडिग्रेडेबल, बायोपॉलिमर नॅनोकॉम्पोझिट विकसित केले आहे जे सापेक्ष आर्द्रता शोधू शकते जे विशेषत्वाने खाद्य उद्योगासाठी स्मार्ट पॅकेजिंग साहित्य म्हणून वापरले जाऊ शकते. आर्द्रतेविरूद्ध फॅब्रिकेटेड नॅनोकंपोझिट फिल्म हा फ्लूरोसेन्स ‘ऑन-ऑफ’ यंत्रणेवर आधारित उत्कृष्ट स्मार्ट सेन्सर होता.

 

हवामान आणि पर्यावरण

सुरु नदी पात्र, लडाख आणि पश्चिम हिमालय या भागातील हिमनद्यांमध्ये सागरी समस्थानिक अवस्था (MIS) ते छोटे हिमयुग (LIA) या काळात मोठ्या प्रमाणात स्थित्यंतरे होत आली आहेत, असे वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन जिऑलॉजी (WIHG) च्या अभ्यासात आढळून आले आहे. अशा अर्ध-शुष्क प्रदेशातील हिमनद्यांची कालगणना भूतकाळातील हवामान बदल समजून घेण्यास आणि भविष्यातील हवामान बदलांच्या प्रभावांचे मूल्यांकन करण्यात मदत करू शकते.

 

आरोग्य

जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर ॲडव्हान्स्ड सायंटिफिक रिसर्च (JNCASR) च्या शास्त्रज्ञांनी कृत्रिम सक्रिय पदार्थ प्रणालीच्या काचेसमान गतिशीलतेचा अभ्यास केला. सक्रिय लंब कण असलेल्या प्रणालींमध्ये आकृतीबंध तयार होऊ शकतात ज्यामुळे ते काचेसमान ठीसूळ पदार्थ तयार होणे टाळण्यास मदत होते, असे या अभ्यासात आढळून आले. कणांच्या अभिमुखतेतील दोषांमुळे अनुबंध तयार होण्यास उत्तेजन मिळाले होते आणि यामुळे कणांना हालचाल सुरू ठेवण्यास मदत झाली आणि या प्रणालीला ठराविक काचेसमान वर्तन करण्यापासून रोखले गेल्याचे त्यांच्या फिजिकल रिव्ह्यू लेटर्समध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनातून दिसून आले.

 

काही प्रमुख क्षेत्रांमध्ये धोरण तयार करणे

वर्षभरात दोन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आणि दोन प्रमुख धोरणे तयार होण्याच्या अंतिम आहेत.

  1. वैज्ञानिक संशोधन पायाभूत सुविधा शेअरिंग मेंटेनन्स अँड नेटवर्क्स (SRIMAN) मार्गदर्शक तत्त्वे
  2. वैज्ञानिक सामाजिक जबाबदारी (SSR) मार्गदर्शक तत्त्वे
  3. विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोपक्रम (STI) धोरण
  4. राष्ट्रीय भूस्थानिक धोरण

 

* * *

S.Thakur/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1887020) Visitor Counter : 488