गृह मंत्रालय
मणिपूरमधील शांतता प्रक्रियेला अधिक लक्षणीय चालना देण्यासाठी भारत सरकार आणि मणिपूर सरकार यांनी मणिपूरमधील झेडयुएफ या बंडखोर गटासोबत कारवाई समाप्ती करार केला
प्रविष्टि तिथि:
27 DEC 2022 7:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 डिसेंबर 2022
‘बंडखोरी मुक्त आणि समृद्ध ईशान्य प्रदेश’ निर्मितीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने पाऊल टाकत केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनानुसार, केंद्र सरकार आणि मणिपूर सरकार यांनी नवी दिल्ली येथे आज झेडयुएफ म्हणजेच झेलियानग्राँग युनायटेड फ्रंट या गटाशी कारवाई समाप्ती बंदी करार केला. हा बंडखोर गट गेल्या एक दशकाहून अधिक काळ मणिपुरमध्ये सक्रीय होता. आज या करारावर स्वाक्षऱ्या झाल्यामुळे मणिपुरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रक्रियेला मोठी चालना मिळाली आहे. केंद्रीय गृह मंत्रालय आणि मणिपूर राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी तसेच झेडयुएफचे प्रतिनिधी यांनी मणिपूरचे मुख्यमंत्री एन.बिरेन सिंग यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
आज झालेल्या करारातील अटींची अंमलबजावणी योग्य रीतीने करुन घेण्यासाठी एका संयुक्त निरीक्षक गटाची स्थापना करण्यात आली आहे.
* * *
S.Kane/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1886948)
आगंतुक पटल : 308