कृषी मंत्रालय
भोपाळच्या आयसीएआर-एनआयएचएसएडी संस्थेने कोंबड्यांसाठी विकसित केलेल्या एच9एन2 (बर्ड फ्लू) विषाणूविरोधी प्रतिबंधक लसी’च्या तंत्रज्ञानाचे हस्तांतरण
Posted On:
27 DEC 2022 6:21PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 डिसेंबर 2022
भोपाळच्या आयसीएआर-एनआयएचएसएडी संस्थेतील संशोधकांनी कोंबड्यांसाठी विकसित केलेल्या एच9एन2 (बर्ड फ्लू) विषाणूविरोधी प्रतिबंधक लसी’च्या तंत्रज्ञानाचे आज, सिकंदराबाद येथील ग्लोबीऑन इंडिया, पुणे येथील वेंकटेश्वरा हॅचरीज, गुरगाव येथील इंडोव्हॅक्स आणि अहमदाबाद येथील हेस्टर बायोसायन्सेस या कंपन्यांकडे हस्तांतरण करण्यात आले. नवी दिल्ली येथील एनएएससीच्या अग्रीनोव्हेट इंडिया या कंपनीने हे हस्तांतरण सुलभरीत्या होईल याची दक्षता घेतली.

एच9एन2 विषाणू प्रतिबंधक पहिली स्वदेशी लस विकसित करण्यासाठी आयसीएआर-एनआयएचएसएडी संस्थेतील संशोधकांनी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांबद्दल अग्रीनोव्हेट इंडिया कंपनीचे अध्यक्ष डॉ.हिमांशू पाठक यांनी त्यांचे कौतुक केले आहे. तसेच या लसीच्या विकसनाचे तंत्रज्ञान उद्योग क्षेत्राकडे हस्तांतरित करण्यासाठी यशस्वी प्रयत्न केल्याबद्दल त्यांनी अग्रीनोव्हेट इंडिया या कंपनीच्या व्यवस्थापनाची देखील प्रशंसा केली आहे. ही लस देशी तसेच परदेशी बाजारांतील लस विषयक मानकांची पूर्तता करेल असा विश्वास प्राणीशास्त्र विभागाचे डीडीजी डॉ.बी.एन.त्रिपाठी यांनी व्यक्त केला. या आजारामुळे मृत्यू पावणाऱ्या पक्षांमुळे सोसावा लागणारा तोटा कमी होऊन कुक्कुटपालक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यात ही लस लक्षणीय योगदान देईल.
* * *
S.Kane/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1886923)
Visitor Counter : 213