कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

प्रशासन गाव की ओर 2022 ने व्हिजन इंडिया@2047 वर लक्ष्यित राज्ये/केंद्रशासित प्रदेशात आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय कार्यशाळा, सार्वजनिक तक्रारींचे निवारण आणि सेवा वितरण अर्ज निकाली काढण्यात साधली लक्षणीय प्रगती

Posted On: 27 DEC 2022 5:17PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 डिसेंबर 2022

 

सरकारने 19-25 डिसेंबर 2022 हा आठवडा अमृत काल कालावधीतील दुसरा सुशासन सप्ताह म्हणून साजरा केला.

डॉ. जितेंद्र सिंह  यांनी "प्रशासन गाव की ओर" ही दुसरी राष्ट्रव्यापी मोहीम 19 डिसेंबर 2022 रोजी सुरू केली होती. या कार्यक्रमात 36 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे जिल्हाधिकारी, मुख्य सचिव/अतिरिक्त मुख्य सचिव आणि एआर सचिव, केंद्रीय मंत्रालये/विभागांचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासह 2700 अधिकारी उपस्थित होते. सुशासन सप्ताह 2022 मध्ये सार्वजनिक तक्रारींचे निवारण आणि सेवा वितरण सुधारण्यासाठी दुसरी  राष्ट्रव्यापी मोहिम राबवण्यात आली.

प्रशासन गाव की ओर 2022 ने लक्षणीय प्रगती साधली आहे – 53.80 लाख सार्वजनिक तक्रारींचे निवारण करण्यात आले, 310 लाख सेवा वितरण अर्ज निकाली काढण्यात आले, शासनातील 949 नवकल्पनांचे दस्तऐवजीकरण करण्यात आले आणि 257 व्हिजन इंडिया@2047 जिल्हास्तरीय दस्तऐवज GGal22 पोर्टल वर अपलोड करण्यात आले.

भारतातील सर्व 768 जिल्ह्यांमध्ये 23 डिसेंबर 2022 रोजी, नवोन्मेष आणि व्हिजन इंडिया@2047 वर विचारमंथन करण्यासाठी जिल्हास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. जिल्हास्तरीय कार्यशाळेचे अध्यक्ष एक वरिष्ठ सेवानिवृत्त सनदी अधिकारी होते  त्यांनी त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून काम केले होते. राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी/ केंद्रशासित प्रदेशातील नायब राज्यपालांनी नियमित संदेश आणि ट्विटद्वारे प्रशासन गाव की ओर मोहिमेला पाठिंबा दिला होता. कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाच्या संसदीय स्थायी समितीने आपल्या 121 व्या अहवालात प्रशासन गाव की ओर मोहिमेच्या अभूतपूर्व यशाची प्रशंसा केली आहे. अशा मोहिमा वारंवार आयोजित केल्या पाहिजेत अशी शिफारसही केली आहे.

प्रशासन गाव की ओर मोहीम आणि सुशासन सप्ताह 2022 हे कार्यक्रम संपूर्ण सरकारी दृष्टिकोनाच्या  सामर्थ्याचे प्रतीक आहे. यात केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी राज्य सरकारी अधिकारी आणि जिल्हा अधिकारी यांच्यासोबत तहसील स्तरापर्यंत काम केले तसेच राष्ट्राचे "कमाल शासन - किमान सरकार" हे प्रारुप पुढे नेण्यात यश मिळवले.

 

* * *

S.Kane/V.Ghode/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1886902) Visitor Counter : 277


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu