सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

वर्ष अखेर आढावा- 2022- दिव्यांगजन सक्षमीकरण विभाग

Posted On: 24 DEC 2022 10:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 डिसेंबर 2022

 

दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाने (DEPwD) दिव्यांगांना (PwDs)अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात आणून संरचित कौशल्य विकास यंत्रणा निर्माण करण्याच्या उद्देशाने प्रथमच ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट या कंपन्यांसोबत सोबत सामंजस्य करार केले आहेत.

दिव्यांगजन(अपंग व्यक्तींच्या) सक्षमीकरण विभागाचा दृष्टीकोन, एक सर्वसमावेशक समाज निर्माण करणे हा आहे; ज्यायोगे दिव्यांगजन व्यक्तींना त्यांच्या वाढीसाठी आणि विकासासाठी पुरेशा सक्षमतेने उत्पादनक्षम, सुरक्षित आणि प्रतिष्ठित जीवन जगू शकतात. जिथे आवश्यकता असेल तिथे शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक विकास आणि पुनर्वसनाच्या कार्यक्रमांद्वारे पीडब्ल्यूडींजना समर्थन देणे आणि त्यांना सक्षम करणे हे या विभागाचे उद्दिष्ट आहे.

दिव्यांग व्यक्तींचे सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या उपेक्षित व्यक्तींचे (दिव्यांगजन) सक्षमीकरण हे या विभागाचे उद्दिष्ट आहे.

अपंग व्यक्तींचे सक्षमीकरण आणि त्यांचा समाजात सहजतेने समावेश करण्याच्या उद्देशाने सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या अंतर्गत दिव्यांगजन सक्षमीकरण विभाग (DEPwD) मे 2012 मध्ये स्थापन करण्यात आला होता आणि अशा व्यक्तींच्या सर्व विकास कार्यक्रमांवर लक्ष ठेवण्यासाठी, एक नोडल एजन्सी म्हणूनही हा विभाग कार्यरत आहे.

दिव्यांगजनांचे सक्षमीकरण ही एक बहुविध- प्रक्रिया आहे, ज्यामध्ये प्रतिबंध, लवकर लक्षणे ओळखणे, हस्तक्षेप (उपचार) करणे, शिक्षण, आरोग्य, व्यावसायिक प्रशिक्षण, पुनर्वसन आणि सामाजिक एकात्मिकता अशा विविध पैलूंचा समावेश होतो.

 

या विभागाची उद्दिष्टे, ध्येय आणि धोरणे पुढीलप्रमाणे आहेत:

उद्दिष्ट : ज्या समाजामध्ये दिव्यांगांच्या वाढीसाठी आणि विकासासाठी समान संधी प्रदान केल्या जातील, असा एक सर्वसमावेशक समाज तयार करणे जेणेकरून ते कार्यक्षम, सुरक्षित आणि सन्मानाचे जीवन जगू शकतील

ध्येय: दिव्यांगांचे विविध कायदे/संस्था/संस्था आणि योजनांद्वारे पुनर्वसन आणि सशक्तीकरण करणे जेणेकरून अशा व्यक्तींना समान संधी मिळतील, त्यांच्या हक्कांचे संरक्षण होईल आणि त्यांना समाजात स्वतंत्र आणि उत्पादनक्षम घटक म्हणून सहभागी होण्यासाठी सक्षम करणारे वातावरण निर्माण होईल.

 

दिव्यांग व्यक्तींच्या (दिव्यांगजन सक्षमीकरण विभाग, D/O) सक्षमीकरणासाठी प्रमुख सुविधा पुढीलप्रमाणे आहेत:

  • 3 डिसेंबर रोजी दिव्यांगजन आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त राष्ट्रपतींनी दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केले
  • भारतभर 3200 ठिकाणी सांकेतिक भाषा दिन साजरा/प्रत्येक जिल्ह्यात सांकेतिक भाषेचा दुभाषी
  • कर्तव्य पथ, इंडिया गेट, नवी दिल्ली येथे भव्य दिव्य कला मेळा आयोजित केला गेला.
  • दिव्य कला शक्ती; दिव्यांगांच्या क्षमतांचा साक्षीदार- कला आणि संस्कृतीच्या क्षेत्रात दिव्यांगजनांमधील जन्मजात कलागुणांचे प्रदर्शन करण्यासाठी एक अभिनव व्यासपीठ
  • केवडिया आणि इंदूर येथे अनुक्रमे 4 मार्च आणि 15 सप्टेंबर,2022 रोजी दोन दिवसीय संवेदनशीलता संवर्धन कार्यशाळा/ शाश्वत सर्वसमावेशक विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी लोकांमध्ये दिव्यांगजनांसाठी अनुकूल प्रवृत्ती विकसित करण्यासाठी सक्रिय उपाययोजना आवश्यक आहेत: टेंट सिटी केवडिया येथील आपल्या भाषणात डॉ. वीरेंद्र कुमार यांचे प्रतिपादन
  • दिव्यांगत्व या विषयावर कॅब, म्हणजे केंद्रीय सल्लागार मंडळाची (CAB) 5 वी बैठक
  • प्रथमच, ई-कॉमर्स क्षेत्रात दिव्यांग व्यक्तींच्या (पीडब्ल्यूडी) समावेशासाठी ई-कॉमर्स कंपन्या फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉन यांच्या सहकार्याने फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉन/दिव्यांगजन विभाग (Amazon आणि Flipkart / DEPwD) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला; या सामंजस्य कराराचा उद्देश संरचित कौशल्य विकास तयार करणे आहे तसेच दिव्यांग व्यक्तींना (पीडब्ल्यूडी) अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात जलद मार्गाने आणण्यासाठी प्रयत्न आणि यंत्रणा तयार करणे. खाजगी कंपन्यांनी पीडब्ल्यूडींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊन त्यांना स्वावलंबी बनवून सक्षम करण्यासाठी संधी उपलब्ध कराव्यात.
  • राष्ट्रीय संस्था/व्यामिश्र प्रादेशिक केंद्रांच्या इमारतींचे उदघाटन करण्यात आले आणि त्यांच्या सेवा वितरण प्रणालीचा विस्तार करण्यासाठी आणि विनाअडथळा, मुक्त वातावरणात उत्तम पुनर्वसन सेवा प्रदान करता येतील अशा केंद्रांची पायाभरणी करण्यात आली.
    • अधिक तपशील:- व्यामिश्र केंद्र (CRC) कोझीकोडे, व्यामिश्र केंद्र देवनगिरी, व्यामिश्र केंद्र राजनांदगाव, व्यामिश्र केंद्र शिलाँग, कटक ओदिशा येथे नी-एसव्हीनिरतर (NI- SVNIRTAR) (100 खाटांच्या नव्या पुनर्वसन इमारतीचे बांधकाम आणि रुग्णालयाचे उदघाटन)
  • SVNIRTAR, कटक येथे 100 खाटांच्या नव्या पुनर्वसन इमारतीचे उदघाटन
  • सामाजिक न्याय आणि सबलीकरण (SJ&E) मंत्री, डॉ. वीरेंद्र कुमार यांनी 22 डिसेंबर 2022 रोजी डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र, नवी दिल्ली येथे T20 अंध विश्वचषक-2022 ( Blind World Cup 2022) जिंकून आणणाऱ्या भारतीय राष्ट्रीय अंध क्रिकेट संघातील विजेत्यांचा सत्कार केला आणि त्यांच्याशी संवाद साधला.
  • 3 डिसेंबर रोजी दिव्यांग व्यक्तींच्या आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त राष्ट्रपतींनी दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केले.

 

दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी वर्ष 2021 आणि 2022 साठी राष्ट्रीय पुरस्कार पुढील श्रेणींमध्ये देण्यात आले:-

  1. सर्वश्रेष्ठ दिव्यांगजन;
  2. श्रेष्ठ दिव्यांगजन;
  3. श्रेष्ठ दिव्यांग बालक/बालिका;
  4. सर्वश्रेष्ठ व्यक्‍ति – दिव्यांगजनांच्या सशक्तिकरणासाठी कार्यरत व्यक्तीसाठी;
  5. सर्वश्रेष्ठ पुनर्वसन व्यावसायिक कार्यकर्ता (पुनर्वसन व्यावसायिक/कार्यकर्ता) – दिव्यांगजनांच्या क्षेत्रात कार्यरत व्यक्तीसाठी;
  6. सर्वश्रेष्ठ संशोधन/नवप्रवर्तन/उत्पादन विकास –दिव्यांगजनांच्या सबलीकरण क्षेत्रातील कार्यकर्ता ;
  7. दिव्यांग सबलीकरणासाठी कार्यरत सर्वश्रेष्ठ संस्था (खाजगी संस्था, स्वयंसेवी संस्था);
  8. दिव्यांगजनांसाठी सर्वश्रेष्ठ नियुक्त संस्था (सरकारी संस्था/ PSE/ स्वायत्त संस्था/खाजगी क्षेत्रातील);
  9. दिव्यांगजनांना उपजिविका उपलब्ध करणारी सर्वश्रेष्ठ प्लेसमेंट एजन्सी – सरकार/राज्य सरकार/स्थानिक संस्था वगळून;
  10. सुगम्य भारत अभियानाचे कार्यव्ययन/बंधमुक्त वातावरणात सृजन करणारे सर्वश्रेष्ठ राज्य/ केंद्रशासित प्रदेश/जिल्हा;
  11. सर्वश्रेष्ठ सुगम्य संचारण साधन/माहिती आणि प्रसारण व्यावसायिक संस्था (सरकारी/खाजगी संस्था);
  12. दिव्यांगजनांचे अधिकार/UDID इव्हेम दिव्यांग सशक्तिकरणासाठी अन्य योजनांची कार्यवाही करणारे सर्वश्रेष्ठ राज्य/केंद्रशासित प्रदेश/जिल्हा;
  13. दिव्यांगजन अधिकार अधिनियम, 2016 नुसार राज्यात कार्यवाही करणारे सर्वश्रेष्ठ राज्य आयुक्‍त दिव्यांगजन.
  14. व्यावसायिक पुनर्वसन विकास साध्य करण्यासाठी कार्यरत सर्वश्रेष्ठ संघटना

 

भारतभरात 23 सप्टेंबर 2022 रोजी 3200 ठिकाणी सांकेतिक भाषा दिन साजरा केला गेला/प्रत्येक जिल्ह्यात सांकेतिक भाषा दुभाषी

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाअंतर्गत येणारी स्वायत्त संस्था,भारतीय सांकेतिक भाषा संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र (ISLRTC), यांच्या वतीने 23 सप्टेंबर 2022 रोजी सी.डी.देशमुख सभागृह, इंडिया इंटरनॅशनल सेंटर (IIC), नवी दिल्ली येथे 'सांकेतिक भाषा, जोडी आम्हांला '(साईन लॅंग्वेज युनाईट्स अस) या संकल्पनेवर आधारीत सांकेतिक भाषा दिन साजरा करण्यात आला.

केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण (SJ&E) मंत्री, डॉ. वीरेंद्र कुमार यांनी 22 डिसेंबर 2022 रोजी डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर, नवी दिल्ली येथे टी-20 अंध विश्वचषक जिंकणाऱ्या (T20BlindWorldCup2022) भारतीय अंध क्रिकेट संघातील विजेत्यांचा सत्कार केला आणि त्यांच्याशी संवाद साधला.

 

* * *

S.Thakur/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1886822) Visitor Counter : 289