माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स (एव्हीजीसी) कृती दलाच्या अहवालात अर्थसंकल्पीय तरतुदीसह राष्ट्रीय स्तरावर एव्हीजीसी- एक्स आर अभियानाची शिफारस


भारतासाठी आणि जगासाठी भारतात आशय निर्मिती करण्यावर विशेष लक्ष केंद्रित करून कृती दलाने केली "भारतात निर्मिती" (‘Create in India’) या मोहिमेची शिफारस

राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा लाभ घेऊन शालेय स्तरावर सर्जनशील विचार विकसित करण्यासाठी एव्हीजीसी साठी समर्पित अभ्यासक्रम सुरु करावा अशी अहवालात शिफारस

Posted On: 26 DEC 2022 5:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 डिसेंबर 2022

 

अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स क्षेत्राचा सर्वांगीण विकास आणि वृद्धीसाठी अर्थसंकल्पीय तरतुदीसह राष्ट्रीय स्तरावर एव्हीजीसी- एक्स आर अभियान सुरु करावे अशी शिफारस अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स (एव्हीजीसी) कृती दलाच्या अहवालात करण्यात आली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सचिवांच्या नेतृतवाखालील या कृतीदलाने एक विस्तृत अहवाल माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला सादर केला असून त्यात भारतासाठी आणि जगासाठी, भारतात आशय निर्मिती करण्यावर विशेष लक्ष केंद्रित करून "भारतात निर्मिती" (‘Create in India’) या मोहिमेची शिफारस केली आहे.

एकूण 4 श्रेण्यांमध्ये विस्तृतपणे वर्गीकरण केलेल्या कृतीदलाच्या मुख्य शिफारसी खालीलप्रमाणे आहेत:

 1. जागतिक बाजारपेठेत प्रवेश मिळावा यादृष्टीने देशांतर्गत उद्योग विकास
  1. एव्हीजीसी क्षेत्राचा सर्वांगीण विकास आणि वृद्धीसाठी अर्थसंकल्पीय तरतुदीसह  राष्ट्रीय स्तरावर एव्हीजीसी- एक्स आर अभियानाची शिफारस.
  2. भारतासाठी आणि जगासाठी भारतात आशय निर्मिती करण्यावर विशेष लक्ष केंद्रित करून" भारतात निर्मिती" ‘Create in India’ या मोहिमेची शिफारस.
  3. भारताला एव्हीजीसी क्षेत्राचे जागतिक केंद्र बनवण्याच्या उद्देशाने थेट परकीय गुंतवणूक, सह-उत्पादन करार आणि नवोन्मेषावर लक्ष केंद्रित करून एका आंतरराष्ट्रीय एव्हीजीसी मंचाची स्थापना तसेच गेमिंग एक्स्पो चे आयोजन करण्यावर भर.   
  4. भारतातील एव्हीजीसी क्षेत्र कौशल्य, शिक्षण, उद्योग विकास आणि संशोधन आणि नवोन्मेषामध्ये जागतिक स्तरावर मानबिंदू ठरेल यासाठी राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र (नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स) ची स्थापना. स्थानिक उद्योगांना पाठबळ  देण्यासाठी तसेच स्थानिक प्रतिभा आणि आशय यांना अधिकाधिक प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारांच्या सहकार्याने स्थानिक पातळीवर प्रादेशिक उत्कृष्टता केंद्रांची स्थापना.
 2. लोकसांख्यिक लाभांश वैविध्याचा लाभ घेण्यासाठी प्रतिभावंतांची एक व्यवस्था- टॅलेंट इकोसिस्टम विकसित करणे.
  1. एव्हीजीसी क्षेत्राची निवड करियर म्हणून करण्याच्या दृष्टीने जनजागृती निर्माण करणे आणि त्याकरता आवश्यक मूलभूत कौशल्ये विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा लाभ घेऊन शालेय स्तरावर एव्हीजीसी साठी समर्पित अभ्यासक्रम सुरु करावा.
  2. एव्हीजीसी संबंधित क्षेत्रातील पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त पदवीसह मानक अभ्यासक्रमाचा प्रारंभ. एव्हीजीसी क्षेत्राशी संबंधित अभ्यासक्रमांसाठी  प्रवेश चाचण्या प्रमाणित करणे. (उदा, माध्यमे आणि मनोरंजन कौशल्य परिषद एम ई एस सी  द्वारे MECAT).
  3. या दशकात एव्हीजीसी क्षेत्रासाठी 20 लाख कुशल व्यावसायिकांची संभाव्य आवश्यकता लक्षात घेता एम ई एस सी अंतर्गत एव्हिजीसी क्षेत्रासाठी कौशल्य उपक्रम वाढवणे. बिगर -मेट्रो शहरे आणि ईशान्यकडच्या  राज्यांमधील विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या संधी आणि प्रवेश निश्चित करण्याच्या दृष्टीने उद्योगक्षेत्रातील तज्ञांचा सहभाग वाढवण्यावर भर
  4. अटल टिकरिंग लॅबच्या धर्तीवर शैक्षणिक संस्थांमध्ये एव्हीजीसी एक्सीलरेटर्स आणि नवोन्मेष केंद्रांची स्थापना.
 3. भारतातील एव्हीजीसी क्षेत्रासाठी तंत्रज्ञान आणि आर्थिक व्यवहार्यता वाढवणे
  1. एम एस एम ई, स्टार्ट-अप आणि संस्थांसाठी ठराविक कालावधीकरता केल्या जाणाऱ्या सबस्क्रिप्शन-आधारित किंमत प्रारूपाबाबत प्रचार करून एव्हीजीसी तंत्रज्ञान समाजातील सर्व स्तरावर पोहोचवण्यासाठी प्रयत्न
  2. एव्हीजीसी तंत्रज्ञानासाठी संशोधन आणि विकास तसेच बौद्धिक संपदा निर्मितीसह मेड इन इंडिया प्रोत्साहनपर योजनेला प्राधान्य. एव्हिजीसी हार्डवेअर उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी  कामगिरीवर आधारित प्रोत्साहन PLI योजनेचे मूल्यांकन.
  3. एव्हीजीसी क्षेत्रासाठी कर लाभ, आयात शुल्क, चाचेगिरी रोखणे अशा व्यवसायाला अनुकूल, उद्योग सुलभ वातावरणाची निर्मिती
  4. संशोधन आणि विकास तसेच स्थानिक बौद्धिक संपदा निर्मिती संस्कृतीला चालना देण्यासाठी एव्हीजीसी उद्योजकांना तंत्रज्ञान, आर्थिक आणि बाजार पेठेत प्रवेश करण्यासाठी स्टार्ट-अप इंडियाचा लाभ.
 4. भारतीय मानवी शक्तीचे (सॉफ्ट पॉवर)सबलीकरण करत सर्वसमावेशक विकास साध्य करणे. 
  1. जागतिक स्तरावर, भारतीय संस्कृती आणि वारशाचा प्रसार  करण्यासाठी संपूर्ण भारतातून देशांतर्गत सामग्री निर्मितीसाठी समर्पित उत्पादन निधी उपलब्ध करणे.प्रसारमाध्यमांद्वारे उच्च-गुणवत्तेची स्वदेशी सामग्री राखून ठेवत त्यांचे मूल्यांकन करणे.
  2. भारताच्या सर्वसमावेशक विकासासाठी भारतातील द्वितीय आणि तृतीय स्तरावरील शहरे आणि ग्रामीण युवावर्गापर्यंत कौशल्य आणि उद्योगकता विकास पोहोचण्याचे उद्दिष्ट साध्य करणे. ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, आणि काॅमिक्स (AVGC) क्षेत्रातील महिला उद्योजकांसाठी विशेष प्रोत्साहन योजना कार्यान्वित करणे.
  3. बालकांमधे आणि तरुणांमध्ये भारताच्या समृद्ध संस्कृती आणि इतिहासाविषयी जागरुकता वाढवण्यासाठी, त्यांचा स्थानिक स्तरावर मुलांसाठी विविध वाहिन्यांवरून प्रसार करणे.
  4. डिजिटल जगात, बाल हक्क संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी आराखडा तयार करणे.

माहिती आणि प्रसारण (I&B) मंत्रालयाचे सचिव,श्री अपूर्व चंद्रा यांच्या अध्यक्षतेखाली,उद्योग आणि शासनातील प्रमुख भागधारकांसह भारतातील एव्हीजीसी (AVGC) क्षेत्राची पूर्ण क्षमता ओळखून,मदत करण्यासाठी एव्हीजीसी( AVGC) कृती दलाची स्थापना करण्यात आली होती.कौशल्य विकास आणि उद्योजकता विकास मंत्रालय (MSDE),शिक्षण मंत्रालयाचा उच्च शिक्षण विभाग- (MoE), इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (MeITY) आणि उद्योग संवर्धन आणि अंतर्गत व्यापार विभाग (DPIIT) इत्यादी संबंधित केंद्रीय मंत्रालयांचे सचिव या विशेष कृतीदलाचे  सदस्य होते.तसेच त्यात कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा या राज्यांतील सरकारांमधील सदस्यांचाही समावेश होता; अखिल भारतीय तंत्रशिक्षण परीषद (ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन), राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग), यासारख्या शैक्षणिक संस्थांचे प्रमुख आणि प्रसारमाध्यमे आणि मनोरंजन कौशल्य परीषद,फिक्की, भारतीय औद्योगिक महामंडळ (MESC, FICCI,CII)या उद्योग संस्थांचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते.

भारतीय बाजारपेठेतील आणि जागतिक मागणीसाठी, देशांतर्गत क्षमता निर्माण करण्यासाठी, केंद्रीय अर्थसंकल्पात एव्हीजीसी (AVGC) साठी कृती दलाची स्थापना करणार असल्याची घोषणा झाली होती.

एव्हीजीसी -एक्सआर(AVCG-XR) क्षेत्र जागतिक बाजारपेठेत सेवा देऊ शकणार्‍या तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊ शकते आणि भारतीय प्रतिभावंत या क्षेत्रात नेतृत्व करू शकतात, हे पंतप्रधानांचे उद्दिष्ट प्रत्यक्षात साकार करण्याचा कृती दलाची स्थापना हा उत्तम प्रयत्न आहे.

याबाबत तपशीलवार अहवाल माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पुढे दिलेल्या संकेतस्थळावरून वर पाहता येईल.

https://mib.gov.in/sites/default/files/AVGC-XR%20Promotion%20Taskforce%20Report%20-%202022.pdf 

 

* * *

R.Aghor/B.Sontakke/S.Patgaonkar/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1886715) Visitor Counter : 156