राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रपती हिवाळी वास्तव्यासाठी सिकंदराबाद येथील राष्ट्रपती निलयम येथे जाणार

Posted On: 25 DEC 2022 9:03PM by PIB Mumbai

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या 26 ते 30 डिसेंबर 2022 या कालावधीत तेलंगणामध्ये सिकंदराबाद येथील राष्ट्रपती निलयम येथे हिवाळी वास्तव्यासाठी जाणार आहेत.

26 डिसेंबर 2022 रोजी आंध्र प्रदेश मधल्या श्रीशैलम मंदिराला राष्ट्रपती भेट देतील आणि केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या 'प्रसाद' योजनेअंतर्गत श्रीशैलम मंदिराच्या विकास कामांशी संबंधित प्रकल्पांचे उद्घाटन करतील. राष्ट्रपती निलयम इथे पोचण्यापूर्वी त्या श्रीशैलम येथील श्री शिवाजी स्फूर्ती केंद्रमलाही भेट देतील. 27 डिसेंबर 2022 रोजी राष्ट्रपती हैदराबाद येथील केशव मेमोरियल शैक्षणिक सोसायटीचे विद्यार्थी तसेच शिक्षकांना संबोधित करतील. त्याच दिवशी त्या सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीलाही भेट देतील आणि भारतीय पोलीस सेवेच्या नियमित सेवा भरतीच्या चौऱ्याहत्तराव्या तुकडीच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना संबोधित करतील. हैदराबाद येथे मिश्र धातू निगम लिमिटेडच्या वाईड प्लेट मिलचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते होईल. 28 डिसेंबर 2022 रोजी राष्ट्रपती भद्राचलमच्या श्री सीतारामचंद्र स्वयंवरी देवस्थानला भेट देतील आणि प्रसाद योजनेअंतर्गत पर्यटनासंबंधीच्या विकास कामांचे आणि मूलभूत सुविधांसाठीच्या कामांची पायाभरणी करतील. 29 डिसेंबर 2022 रोजी तेलंगणाच्या वनवासी कल्याण परिषदेने आयोजित केलेल्या सम्मक्का सरलम्मा जनजाती पुजारी संमेलनाचेही त्या उद्घाटन करतील, त्याचप्रमाणे आदिवासी व्यवहार मंत्रालयाने कोमारम भीम असिफाबाद आणि महबुबाबाद या तेलंगणाच्या दोन जिल्ह्यांमधील एकलव्य आदर्श निवासी शाळांचेही त्या आभासी पद्धतीने उद्घाटन करतील. 

राष्ट्रपती महिलांसाठी असलेल्या जी नारायणम्मा तंत्रज्ञान आणि विज्ञान संस्थेचे विद्यार्थी तसेच शिक्षकांशी संवाद साधतील त्याचप्रमाणे हैदराबाद येथील बीएम मालानी परिचारिका महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांशीही त्या संवाद साधतील, तसेच महिला दक्षता समितीच्या सुमन ज्युनियर कॉलेज च्या विद्यार्थ्यांशी आणि कर्मचाऱ्यांशीही त्या संवाद साधतील. त्याच दिवशी त्या शम्सबादमधल्या श्रीरामनगरम येथील समता पुतळ्याला भेट देतील.

राष्ट्रपती 30 डिसेंबर 2022 रोजी वीर नारी आणि इतर आमंत्रितांसाठी राष्ट्रपती निलयम येथे  भोजन समारंभ आयोजित करतील आणि त्यानंतर दिल्लीला परततील.

***

R.Aghor/V.Sahajrao/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1886569)