कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग भारत सरकारचा प्रमुख मनुष्यबळ केंद्र म्हणून उदयाला येत आहे- केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह


दिल्लीमध्ये सीएसओआय सभागृहात(19 ते 25 डिसेंबर 2022) सुशासन सप्ताहाच्या समारोप समारंभामध्ये प्रमुख भाषणामध्ये केंद्रीय मंत्र्यांचे मार्गदर्शन

Posted On: 25 DEC 2022 7:34PM by PIB Mumbai

 

मोदी सरकारच्या गेल्या 8 वर्षांच्या कार्यकाळात कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्तीवेतन विभाग कार्मिक आणि सामान्य माणूस या दोघांच्याही सेवेसाठी समर्पित असलेले सुविधा उपलब्ध करणारेमंत्रालय झाले आहे.

डॉ. जितेंद्र सिंह यांनी सुधारित ई-एचआरएमएस 2.0 पोर्टल सुरू केले जे कर्मचाऱ्यांना डिजिटल स्वरुपात खालील सुविधा उपलब्ध करणार आहे - बदली (फिरती/परस्पर), नियुक्ती,एपीएआर, आयपीआर, आयजीओटी प्रशिक्षण, दक्षता स्थिती, नियुक्ती संधी, सेवा पुस्तिका आणि रजा, टूर, खर्चाची भरपाई इ. सारख्या मूलभूत एचआर सेवा.

कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग भारत सरकारचा प्रमुख मनुष्यबळ केंद्र म्हणून उदयाला येत आहे, असे केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण, निवृत्तीवेतन, अणुउर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले आहे.  ते आज दिल्लीमध्ये सीएसओआय सभागृहात(19 ते 25 डिसेंबर 2022) सुशासन सप्ताहाच्या समारोप समारंभामध्ये प्रमुख भाषणामध्ये आपले विचार व्यक्त करत होते. मोदी सरकारच्या गेल्या 8 वर्षांच्या कार्यकाळात कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्तीवेतन विभाग कार्मिक आणि सामान्य माणूस या दोघांच्याही सेवेसाठी समर्पित असलेले सुविधा उपलब्ध करणारेमंत्रालय झाले आहे, असे त्यांनी सांगितले.

कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग, निवृत्तीवेतन आणि एआरपीजी विभागाने हाती घेतलेल्या सुधारणांमुळे गेल्या 8 वर्षात अधिक जास्त पारदर्शकता, जास्त उत्तरदायित्व आणि तंत्रज्ञानाधारित परिवर्तन निर्माण झाले आहे आणि पंतप्रधानांनी निर्धारित केलेले कमाल शासन, किमान सरकारहे अंतिम ध्येय साध्य करण्यासाठी डॅशबोर्ड यंत्रणेच्या माध्यमातून कालमर्यादेकडून वास्तविक काळाच्या दिशेने वाटचाल करत आहे, ही बाब जितेंद्र सिंह यांनी अधोरेखित केली.  माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त सुशासन दिन साजरा केला जातो. यावर्षी आपण भारताच्या स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापन दिन साजरा केला तसेच याच वर्षात भविष्यातील जागतिक समस्या आणि आव्हानांवर तोडगा काढण्यासाठी G-20 चे अध्यक्षपदही स्वीकारले, या कारणांमुळे या वर्षीचा सुशासन दिन खास असल्याचे अटलबिहारी वाजपेयी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना डॉ जितेंद्र सिंग म्हणाले.

या वर्षी मिशन कर्मयोगी एका नवीन स्तरावर पोहोचले आहे आणि आता ते मोबाईल ॲपच्या माध्यमातून कोठूनही, कधीही शिकण्यासाठी उपलब्ध आहे, म्हणूनही यावर्षीचा कार्यक्रम लक्षणीय आहे, असे डॉ जितेंद्र सिंग म्हणाले. 22 नोव्हेंबर 2022 रोजी पंतप्रधान मोदींनी रोजगार मेळ्याच्या दुसऱ्या आवृत्तीत कर्मयोगी प्रारंभ मॉड्यूल सुरु केल्यानंतर मिशन कर्मयोगी देखील पुढच्या टप्प्याकडे वळले आहे, असेही त्यांनी सांगितले. शासकीय सेवेत नव्याने प्रवेश करणाऱ्यांना भविष्यातील आपल्या भूमिकेची परिपूर्ण तयारी करण्यासाठी प्रारंभ मॉड्यूलची खूप मदत होईल, असेही ते म्हणाले.

यापूर्वी डॉ जितेंद्र सिंग यांनी सुधारित e-HRMS 2.0 पोर्टलचा शुभारंभ केला. कारण e-HRMS ची पूर्वीची आवृत्ती मर्यादित असल्यामुळे कर्मचाऱ्यांना मर्यादित सेवांचा लाभ मिळू शकत होता तसेच ते इतर मनुष्यबळ अॅपशी जोडलेले नव्हते. परिणामी, कर्मचार्‍यांना डिजिटल सेवा वितरण आणि सरकारच्या उपक्रमांचा अखंड आणि पूर्ण लाभ मिळू शकत नव्हता.

भारतासाठी व्यावसायिक, उत्तम प्रशिक्षित आणि भविष्यात सज्ज नागरी सेवा निर्माण करण्याच्या उद्देशाने कर्मयोगी भारत (SPV) द्वारे iGoT कर्मयोगी पोर्टलचे मोबाईल अॅप्लिकेशन देखील सिंग यांनी यावेळी सुरू केले.

***

R.Aghor/S.Patil/S.Mukhedkar/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1886547) Visitor Counter : 227