दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
फायबर नेटवर्कची पर्याप्तता
Posted On:
23 DEC 2022 6:16PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 डिसेंबर 2022
देशात उत्तम बँडविड्थ असलेली लवचिक आणि उच्च व्हॉल्यूम कनेक्टिव्हिटीची वाढती मागणी सुलभ करणारी,एकूण 35.5 लाख किलोमीटर लांबीची ऑप्टिकल फायबर केबल (OFC) दिनांक 30.09.2022 पर्यंत, टाकण्यात आलेली आहे. या ऑप्टिकल फायबर केबलमध्ये 5G कनेक्टिव्हिटी हाताळण्याची प्रचंड क्षमता आहे. त्याचप्रमाणे दूरसंचार पायाभूत सुविधांची अंमलबजावणी जलद आणि सहजसुलभ करण्यासाठी, सरकारने 17 ऑगस्ट 2022 रोजी भारतीय टेलिग्राफ राइट ऑफ वे नियम, 2016 मध्ये सुधारणा केली आहे. या सुधारणांमुळे 5G स्माॅलसेल आणि ऑप्टिकल फायबर केबल या रस्त्यावरील पायाभूत सुविधांवरून तैनात करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सरकार तसेच दूरसंचार कंपन्यांनी केवळ ग्रामीण भागात नव्हे तर शहरी आणि दुर्गम भागातील कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यासाठी ऑप्टिकल फायबर केबल टाकल्या आहेत. राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील प्रमुख शहरे आणि शहरे यामुळे पुरेशा प्रमाणात जोडली गेली आहेत.
देशातील सर्व ग्रामपंचायतींना (GPs) फायबर कनेक्टिव्हिटी देण्यासाठी भारतनेट प्रकल्प टप्प्याटप्प्याने कार्यान्वित केला जात आहे.भारतनेट प्रकल्पाची व्याप्ती देशातील ग्रामपंचायतींव्यतिरीक्त असलेल्या सर्व वस्तीं तसेच गावांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
दूरसंवाद राज्यमंत्री देवुसिंह चौहान यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
S.Kakade/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1886124)
Visitor Counter : 149