विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

कंबोडियातील तिसऱ्या आसीयान इंडिया ग्रासरूट्स इनोव्हेशन फोरममध्ये स्पर्धा जिंकून भारतातील एका नवोन्मेषी संशोधकाने देशाची मान अभिमानाने उंचावली

Posted On: 22 DEC 2022 7:24PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 डिसेंबर 2022

तिसर्‍या आसियान इंडिया ग्रासरूट्स इनोव्हेशन फोरममधील ग्रासरूट्स इनोव्हेशन स्पर्धेत ‘मॉडिफाइड वॉकर विथ अ‍ॅडजस्टेबल लेग्ज’ या नवोन्मेषासाठी भारताच्या शालिनी कुमारी यांना प्रथम पारितोषिक  मिळाले.देशात अस्थिआजाराशी संबंधित उत्पादनांचे आघाडीचे उत्पादक, विस्को रिहॅबिलिटेशन एड्स, उद्योगांना हस्तांतरित केलेले हे तंत्रज्ञान ब्रिक आणि मोर्टार स्टोर्सच्या माध्यमातून तसेच  देशातील  सर्वसामान्यांसाठी ॲमेझॉन इंडीयाच्या माध्यमातून खरेदीसाठी उपलब्ध आहे.

विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषा वरील  समिती (सीओएसटीआय) कंबोडिया के अध्यक्ष तसेच किंगडम ऑफ कंबोडियाचे  उद्योग, विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष मंत्रालयाचे (एमआयएसटीआय)  महासंचालक माननीय डॉ. हुल सिंघेंग यांच्या हस्ते शालिनी कुमारी यांना पुरस्कार देण्यात आला. शालिनी कुमारी यांनी प्रथम पुरस्काराच्या रुपात 1,500 अमेरिकी डॉलर्सचे रोख पारितोषिक जिंकले आहे.

विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (डीएसटी), भारत सरकार आणि राष्ट्रीय नवोन्मेष संस्था (एनआयएफ) – भारत यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषावरील आसियान समिती (सीओएसटीआय) द्वारे आयोजित तीन दिवसीय तिसऱ्या आसियान इंडिया ग्रासरूट्स इनोव्हेशन फोरमचा समारोप  नोम पेन्ह, कंबोडिया येथे कंबोडीयाचे उद्योग, विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष मंत्री माननीय किट्टी सेथा पंडिता चाम प्रसिध यांच्या उपस्थितीत आज झाला. तीन दिवसीय प्रदर्शनात 9 देशांतील सुमारे 100 तंत्रज्ञान प्रदर्शनात ठेवण्यात आले होते.

फिलीपिन्स आणि म्यानमारमधील  नवसंशोधकांनी अनुक्रमे 1000 अमेरीकी डॉलर्स आणि 500 अमेरिकी डॉलर्सचे दुसरे आणि तिसरे पारितोषिक जिंकले आहे.  नऊ राष्ट्राच्या एकूण 45 ग्रासरूट नवोदितांनी या स्पर्धेत भाग घेतला.

Grassroots Innovation Competition

1st Prize

India - Ms Shalini Kumari

Modified walker with adjustable legs

2nd Prize

Philippines - Mrs Meriam Bouquia

Multi purpose Fiber Stripper

3rd Prize

Myanmar - Mr. Myo Thaw

GreenToddy’s Plamyra palm coconut

Student Innovation Competition

1st Prize

Thailand - Ms. Napaschol Inthapan

ORA (Osteoarthritis Rehabilitation Assistant)

2nd Prize

Thailand - Mr. Tanapat Charunworaphan

The HealthTech that keeps your heart in checked

3rd Prize

Lao PDR - Mr. Phonsena Chanthavong

Intelligent boat for a cleaner river

 

 

 

N.Chitale/V.Ghode/P.Malandkar

 

 

 

 

 

 



(Release ID: 1885843) Visitor Counter : 152