सांस्कृतिक मंत्रालय
वर्ष अखेर आढावा 2022: सांस्कृतिक मंत्रालय
Posted On:
14 DEC 2022 2:53PM by PIB Mumbai
आजादी का अमृत महोत्सव:
भारतीय स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करण्यासाठी तसेच जनता, संस्कृती आणि विजयाच्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण करण्यासाठी भारत सरकारने ‘आझादी का अमृत महोत्सव’ (एकेएएम) हा उपक्रम हाती घेतला आहे.
‘आझादी का अमृत महोत्सव’ या उपक्रमाचा अधिकृत प्रवास स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या 75 आठवडे आधी म्हणजे 12 मार्च 2021 रोजी सुरू झाला आणि त्याची त्यानंतर एक वर्षाने म्हणजे 15 ऑगस्ट 2023 रोजी सांगता होईल.
एकेएएमचे पाच स्तंभ आहेत - स्वातंत्र्य लढा, पंचाहत्तर कल्पना, पंचाहत्तर कामगिरी, पंचाहत्तर कृती आणि पंचाहत्तर संकल्प.
लोकसहभागाच्या माध्यमातून ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा होत असून या 75 वर्षांमधील देशाची कामगिरी जगासमोर आणण्याचा तसेच पुढील 25 वर्षांमधील संकल्पाची रूपरेषा आखण्याचा याचा उद्देश आहे. या मोहिमेअंतर्गत अनेक प्रकारचे उपक्रम देशात तसेच देशाबाहेर राबविले जाणार आहेत.
एकेएएम अंतर्गत 136000 हून अधिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून ‘हर घर तिरंगा, वंदे भारतम्, कलांजली यासारख्या कित्येक मोठ्या कार्यक्रमांचा त्यात समावेश आहे.
प्रधानमंत्री संग्रहालयाचे उद्घाटन:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिल 2022 रोजी प्रधानमंत्री संग्रहालयाचे उद्घाटन केले. आजादी का अमृत महोत्सव दरम्यान उद्घाटन झालेल्या या संग्रहालयात स्वातंत्र्यानंतरच्या भारताची गाथा आतापर्यंतच्या पंतप्रधानांबद्दल माहिती आणि त्यांचे योगदान या माध्यमातून वर्णन करण्यात आली आहे.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना:
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या 3D प्रतिमेचे अनावरण इंडिया गेटनजीकच्या घुमटावर पंतप्रधानांच्या हस्ते झाले. येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा ग्रॅनाईटमधील पुतळा बसविण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली.
8 सप्टेंबर 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. हा 28 फूट उंच पुतळा म्हणजे देशातील सर्वात मोठ्या, हुबेहूब, मोनोलिथीक आणि हाताने घडवलेल्या पुतळ्यांपैकी एक आहे.
हर घर तिरंगा मोहीम आणि तिरंगा उत्सव :
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाने देशभर जागृत केलेली राष्ट्रप्रेमाची भावना उंचावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष साजरे करताना नागरिकांना आपापल्या घरांवर राष्ट्रध्वज फडकावता यावा, यासाठी 22 जुलै 2022 रोजी ‘हर घर तिरंगा’ या मोहिमेचा आरंभ केला. राष्ट्रध्वज हा भारतीय जनतेची आशा आणि आकांक्षेचे प्रतीक असून राष्ट्रीय अभिमानाचे महत्त्वपूर्ण चिन्ह आहे. ही मोहीम 23 कोटी घरापर्यंत पोहोचली आणि 6 कोटी तिरंग्यासोबतच्या सेल्फींची डिजिटल नोंदणी झाली. अधिकृत संकेतस्थळावर असणाऱ्या 'पिन अ फ्लॅग' या उपक्रमामध्ये 5 कोटींहून अधिक प्रवेशिका जमा झाल्या.
- भारत आंतरराष्ट्रीय बौद्ध संस्कृती केंद्राचा शिलान्यास झाला
- भगवान बुद्धांच्या पवित्र कपिलवस्तु अवशेषांचे मंगोलियामध्ये 11 दिवस प्रदर्शन
पंतप्रधान स्मृतिचिन्हांचा लिलाव:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या प्रतिष्ठित आणि स्मरणीय भेटवस्तूंच्या ई-लिलावाची चौथी बोली केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2022 या दरम्यान आयोजित केली होती. अंदाजे 1200 स्मृतिचिन्हे आणि भेटवस्तूंचा ई-लिलाव करण्यात आला. यावेळी अनेक मान्यवर, दिव्यांगजन तसेच सामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जी 20 आणि रोषणाई:
भारताने प्रतिष्ठित जी 20 चे अध्यक्षपद 1 डिसेंबरपासून स्वीकारल्यानंतर सांस्कृतिक मंत्रालयाच्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने 1 ते 7 डिसेंबर यादरम्यान देशभरातील 100 स्मारकांवर जी 20 बोधचिन्हाची रोषणाई केली.
***
S.Thakur/N.Mathure/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji /PIBPanaji /pib_goa pibgoa[at]gmail[dot]com /PIBGoa
(Release ID: 1885013)
Visitor Counter : 952